Grapes Farming and management, द्राक्ष बागेतील फुलोरा ते सेटिंग अवस्थेमधील समस्या वरील उपाय योजना,फुलोरा गळ,मनी गळ,सेटिंग अवस्थेच्या आधिच करावयाची उपाय योजना, कात्रीच्या साह्याने पाकळ्यांची थीनिंग करणे
Grapes Farming and management:- नमस्कार आज आपण पाहणार आहोत द्राक्ष बागेत फुलोरा ते सेटिंग वसमत येणाऱ्या समस्या आणि त्याचे उपाय योजना. मित्रांनो आपलं माहित आहे दरवर्षीप्रमाणे द्राक्ष बागेत उत्तम प्रतींच्या घराच्या उत्पादन घेण्यासाठी रात्रंदिवस झटत असतो. त्याला त्याच्या मेहनतीचे फळ भेटताना दिसत नाही कधी नैसर्गिक अडचणी येतात. तर कधी फुलोरा आणि मनी गळून पडतात. आज आपण अशा समशेवर्ती मात करणाऱ्या काही उपाययोजना पाहणार आहोत
द्राक्ष बागेतील फुलोरा ते सेटिंग अवस्थेमधील समस्या वरील उपाय योजना
Grapes Farming and management:- द्राक्ष बागेतील उत्तम घडण्यासाठी पुरेसा प्रकाश उदार तापमान जमिनीतील ओलावा आणि पोषक तत्वे यांचे नितांत आवश्यक असते. द्राक्ष वेलीची फुले ही अत्यंत नाजूक असतात या अवस्थेमध्ये अवकाळी पाऊस वारा थंड तापमानाच्या संपर्कात आल्यास फुलांची गळती होते. तसेच वातावरणामध्ये आद्रता वाढल्यास त्याचा परिणाम विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरतो. फुलोरा ते सेटिंग अवस्था ही पाच दिवसांची असून याच दिवसांमध्ये फुलांच्या गळतीचे प्रमाण जास्त असते. ज्या दिवसांमध्ये मनी जळ व मनी गड फुलोरा गड अशा समस्या येतात.
फुलोरा गळ
- वातावरणातील बदलाचा परिणाम वेलीतील अन्नसाठा, जमिनीतील पाण्याचा कमी जास्त पणा आणि संजीविकाचा वेलीतील समतोल या घटकांवर दिसून येतो
- फुलोरा गळ ही स्थिती स्थानिक वातावरण अवलंबून असते.
- जर द्राक्ष वेलीचे कॅनोपी खूपच दाट असेल तर अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही.त्यामुळे फुलोरा गळ मनी गळ दिसून येते.
मनी गळ
- मनी गड हा प्रकार फुलोरा अवस्था मध्ये दिसून येतो
- घरांना व मन यांना योग्य प्रमाणात अन्नपुरवठा न मिळाल्यामुळे गडाला धक्का लागला तरी न फुललेले मनी गळून पडू लागतात.त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होते.
- मनीगळ ही विकृती बागेला दिलेल्या पाण्याचा ताण तसेच पाण्यात असणारे क्षारेच प्रमाण, जमिनीत असणारे फॉस्फरसचे जास्त प्रमाण, आणि पोटॅशियम सारख्या अन्नद्रव्याचे कमतरता ही अवस्था दिसून येते.
फुलरोबा मनी गळ यावर परिणाम करणारे घटक
- दिवस व रात्र ज्यामधील तापमान मध्ये असणारे फरक.
- वेलीतील ॲपसिसिक ऍसिडचे जास्त प्रमाण आणि जमिनीतील फॉस्फरस चे जास्त प्रमाण.
- एका वेळेवर कॅनोपी चे प्रमाण जास्त असणे
उपायोजना
- वेलीवर गडांची संख्या मर्यादित ठेवावी.
- वेलीचे विस्तार व्यवस्थापन योग्य असल्यास योग्य प्रमाणात कॅनोपी तयार होते. त्यामुळे वेळेला भरपूर सूर्यप्रकाश मिळून बेलीच्या पोस्टसाठी पुरेसा अन्नसाठा तयार होईल.
- बागेला पाण्याचा जास्त ताण देऊ नये
- गडाचा विकास व्यवस्थित झाला असल्यास फुलरा अवस्थेत अधिक रसाने एकत्रित मिसळून वेळेला देऊ नयेत.
- जीए प्लस बुरशीनाशक क्लास पीएच कमी करण्याचा रसायन फुलोरा अवस्थेत आधी एकत्रित द्यावे.
- रोग व किडींच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी योग्य पद्धतीने उपायोजना करून घ्याव्यात
- द्राक्षमणी तीन ते चार मिलिमीटर आकाराचे झाल्यानंतर रासायनिक देवता येऊ शकतात त्याच्यामध्ये जीए प्लस बुरशीनाशक प्लस पीएच कमी करणारे रसायन क्लास सीपीयू आधी देऊ शकतो
सेटिंग अवस्थेच्या आधिच करावयाची उपाय योजना
- वांज फुटी काढणे
- पाकळ्यांची व गडांची थीनिंग करणे
- रसायनाच्या साह्याने थिनिंग करणे
- कात्रीच्या साह्याने पाकळ्यांची थीनिंग करणे
वांजफुटी काढणे
वन्सफटी काढणी ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. सर्वप्रथम बागेतून वांजफुटी काढून घ्याव्यात . असे केल्याने घडांची संख्या कमी होऊन योग्य पोषण होईल. बागेतील गर्दी कमी केल्याने हवा खेळती राहते त्यामुळे बागेतील आद्रता कमी होते.त्यामुळे बागेत कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.
पाकळ्यांची व घडांची थीनिंग करणे
- पाकळ्यांचे वगडांचे थेनिंग केल्यामुळे इतर द्राक्ष घड्यांचे पोषण व व्यवस्थापन योग्य प्रमाणे करता येते. त्यामुळे द्राक्ष वेलीवर घडांची संख्या जास्त नसावी. साधारणता दीड फुटावर एक घडा असावा. 350 ग्रॅम वजनाचा घड हा निर्यातक्षम घड मानला जातो. एका वेलीवर 40 ते 45 घट राहतील याची काळजी घ्यावी आणि त्याप्रमाणे त्याची थिनिंग करून घ्यावी. द्राक्ष घडाचे अपेक्षित आकारमान मिळविण्यासाठी एका घरामध्ये शंभर ते 120 इतके मनी ठेवावेत मण्यांची संख्या योग्य ठेवल्यामुळे गडामध्ये हवा खेळती राहते व रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते
- थिनिंग करण्याआधी घडांमध्ये साधारणता 500 पेक्षा जास्त मनी असतात त्यामुळे मनी लहान राहून मण्यांचा विकास होत नाही म्हणून आपण फिनिंग करणे खूप आवश्यक आहे. थिनिंग करण्यासाठी कात्रीचा किंवा रसायनाचा वापर करू शकतो.
रसायनाच्या साह्याने थिनिंग करणे
- द्राक्ष वेलीच्या घडाची फिनिंग करण्यासाठी आपण रसायनाचा उपयोग करू शकतो त्यासाठी आपण जीएचा वापर करतो. त्यासाठी फुलोरा अवस्थेमध्ये असताना 40 ppm इतकी फवारणी करावी पन्नास टक्के फुले उमलण्याआधी मणिगळ करणे शक्य होते. तसेच पाण्याची नियोजन करताना जमिनीचा प्रकाराने वाढीचे अवस्था याचा विचार करावा
- आपल्या जमिनीचा प्रकार (हलका किंवा भारी जमीन) याचा विचार करूनच पाण्याचे नियोजन करावे. बागेला पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. जास्त ताण पडल्यास फुल गळ होऊन अख्खा घड रिकामा होण्याचे दाट शक्यता असते.
- जीए चा वापर हा संतुलित व नियंत्रित करावा. जी एच ए फवारणी योग्य अवस्थेत न झाल्यास त्याचे दुष्परिणाम बागेत दिसू लागतात मनी लहान मोठे होणे, शॉर्ट बेरीज, जास्त प्रमाणात फुलगळ होणे असे दुष्परिणाम दिसून येतात.
कात्रीच्या साह्याने पाकळ्यांची थीनिंग करणे
- जीए रसायनाचा वापर करूनही 100% विरळणी होत नसल्यामुळे आपल्याला कात्रीच्या साह्याने मण्यांची संख्या कमी करावी लागते विरळणी पूर्ण झाल्यानंतर व मन यांचा घड सेट झाल्यानंतर गडाची लांबी जास्त असेल तर अर्धा फूट लांबी एवढा किंवा विदभर लांब बाई ठेवून शेंडा मारावा.
हे सुद्धा वाचा द्राक्ष शेती व्यवस्थापन आणि उपाययोजना
शेतकरी मित्रांनो या लेखातून तुम्हाला नक्कीच फुलोरा ते सेटिंग अवस्थेमध्ये समस्येवर उपाय योजना समजले असतील अशी मी अपेक्षा करतो आणि भरघोस उत्पन्न मिळो ही इच्छा व्यक्त करतो हा लेख संपूर्ण वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार
टीप
- मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीटकनाशकांचा वापर टाळावा.
- पिक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा
3 thoughts on “द्राक्ष बागेतील फुलोरा ते सेटिंग अवस्थेमधील समस्या वरील उपाय योजना”