द्राक्ष शेती व्यवस्थापन आणि उपाययोजना

द्राक्ष शेती व्यवस्थापन आणि उपाययोजना, Grape Farming Management and Solutions, Grapes Organic Farming, द्राक्ष वेलीची काडी परीक्षण

द्राक्ष शेती व्यवस्थापन आणि उपाययोजना

द्राक्ष शेती व्यवस्थापन आणि उपाययोजना,आज आपण पाहणार आहोत द्राक्ष बागेचे व्यवस्थापन कसे करायचं आपण दरवर्षी अनुभवत असतोच की पावसाचं प्रमाण हे कधी कमी तर कधी जास्त असतो परंतु अशा वातावरणामध्ये आपण आपल्या शेतीची मेघा कशी राखायची याबद्दल आपणाला जास्त माहिती नसते आणि त्यामुळे आपणाला काही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते किंवा आपल्या बागेपासून उत्पादन कमी मिळण्याचे शक्यता आपणास जास्त असत.
आज असाच एक मुद्दा मी घेऊन आलो आहे तो तुम्ही संपूर्ण वाचाल अशी अपेक्षा करतो त्यातून मिळालेले माहिती तुम्हाला नक्कीच तुमच्या शेती व्यवस्थापनामध्ये उपयोगी येईल अशी अशा व्यक्त करतो
पावसाळा आला की वातावरणामध्ये खूप सारे बदल होत असतात तसाच आपण वातावरणाचा अंदाज घेऊन पावसाची शक्यता आपण अंदाजे लावत असतो परंतु आपल्या अंदाजाप्रमाणे नेहमीच पाऊस कमी किंवा जास्त पडत असतो जर पाऊस जास्त झाला तरी त्याचा फटका शेतीवर होतो आणि जरी कमी झाला तरी त्याचे नुकसान आपल्याला झेलावे लागते तर चला तर पाहूया आपण की कोणती काळजी घ्यायला पाहिजे

सर्वप्रथम आपण पाहूया

  • अन्नद्रव्य व्यवस्थापन
  • माती परीक्षण
  • पाणी परीक्षण
  • द्राक्ष वेलीची काडी परीक्षण

अन्नद्रव्य व्यवस्थापन

द्राक्ष शेती व्यवस्थापन आणि उपाययोजना, Grape Farming Management and Solutions, Grapes Organic Farming, द्राक्ष वेलीची काडी परीक्षण

तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे ज्या भागांमध्ये ज्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी असते त्या ठिकाणी द्राक्ष बागेमध्ये अडचणी येत असतात तर अडचणी कोणत्या असतात. पाण्याची अडचण तर असतेच सोबतच पाण्यातील क्षार हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे अडचण आहे.
जेव्हा आपण बागेला पाणी देत असतो त्यावेळेस दिलेल्या पाण्यासोबत क्षारही वेलीच्या मुळाशी अवतीभवती जमा झालेले असतात. परंतु क्षार जमा होणे ही काही समस्या नाही. परंतु ही समस्या कधीही होऊ शकते जेव्हा पावसाचं प्रमाण कमी असते कारण जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस पावसाच्या पाण्यासोबत जे काही जमा झालेले क्षार आहेत ते पावसाच्या पाण्यासोबत पाहून जातात. आणि आपली जमीन पुन्हा पुन्हा क्षार विरहित होते हा जो क्रम आहे हा नित्य नियमाने दरवर्षी होत असतो जर पावसाच्या प्रमाण कमी झाले किंवा वेळेत पाऊस नाही पडला तर जमा झालेले क्षार हे तिथेच राहतात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला बागेवरती पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणती निगा घेतली पाहिजे किंवा कोणत्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत जेणेकरून हा त्रास या त्रासापासून आपल्याला बागेचं रक्षण करता येईल. क्षार जमा झाले तर त्याचे परिणाम झाडाच्या पानांवरती दिसतात तसेच वेलीची वाढ खुंटते पाणी करतात पानसुकतात अशा प्रकारच्या दिसायला लागतात सोबतच अजूनही वेगवेगळे परिणाम आपल्याला बागेत पाहायला मिळतात फुटेंच्या फेरीतील अंतर कमी राहणे पानांचा आकार एक सारखा नसणे किंवा काडीची वाढ न होत असते लवकर परिपक्व होणे तसेच सूक्ष्म घडनिर्मिती जास्त प्रमाणात होणे अशा प्रकारचे दुष्परिणाम क्षार जमा झाल्यामुळे बागेत पाहायला मिळतात. आता आपण पाहूया या की या या येणाऱ्या अडचणी पासून आपल्याला कसं वाचता येईल किंवा काय उपाययोजना करता येत

उपाय योजना

  • बागेत छाटणी घेण्यापूर्वी बोद व्यवस्थितरित्या खोदून घ्यावेत.
  • बोदा मध्ये छोटी चारी तयार करावी
  • बोदामध्ये तयार केलेल्या चारीत पाणी अशाप्रकारे सोडावे की बोदा मधील पूर्ण पाणी बाहेर निघून जाईल( जसे पावसाचे पाणी वाहून जाते )
  • चारीतून वाहून जाणाऱ्या पाण्यासोबत क्षारही वाहून जातात
  • क्षार वाहून गेल्यामुळे वेलीच्या मुळाच्या बहुतांंचं वातावरण स्वच्छ होईल

बोद कसे तयार करायचे

शेतकरी मित्रांनो जर पाऊस जास्त झाला तर पावसाच्या पाण्यासोबत पाण्यासोबत क्षारही वाहून जातात परंतु जी जमीन सपाट आहे किंवा ज्या जमिनीतून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही अशा जमिनीमध्ये मात्र पाऊस होऊनही परिणाम दिसून येत नाहीत. अशा जमिनीमध्ये किंवा बागेमध्ये बोध तयार करून घेणे गरजेचे असतात.
द्राक्ष बागेत छाटणीपूर्वी बोद तयार करून घ्यावेत.
बोट तयार करण्यासाठी दोन ओळींमध्ये नांगराच्या साह्याने व्यवस्थित चारी खोदून घ्यावी. जेणेकरून चारीतून क्षारयुक्त पाणी व्यवस्थित वाहून जाईल

हे ही वाचा कृषी शेत्रातील रोजगार संधी

चुनखडीयुक्त माती आणि उपाय योजना

द्राक्ष शेती व्यवस्थापन आणि उपाययोजना, Grape Farming Management and Solutions, Grapes Organic Farming, द्राक्ष वेलीची काडी परीक्षण

मित्रांनो जर आपली जमीन हे चुनखडीयुक्त असेल तरीसुद्धा आपल्याला खूप साऱ्या उपाययोजना करणे गरजेचे असते करण चुनखडी युक्त माती ही द्राक्ष बागेसाठी तेवढी उपयुक्त ठरत नाही त्यामुळे अशा मातीमध्ये थोडीशी जास्त जास्त मेहनत आणि उपाययोजना करणे गरजेचे असते अशा द्राक्ष बागांमध्ये पावसाचं प्रमाण जरी जास्त असले तरीसुद्धा त्याचा जास्त फायदा होताना दिसत नाही. अशा मातीमध्ये पलाश ची कमतरता असू शकते.त्यामुळे फळ छाटणीनंतर मनी सेटिंग एकसारखे होत नाही तसेच एकाच घडात मन्यांचा आकार कमी जास्त दिसून येतो तसेच फुटव्याची वाढ ही व्यवस्थित होत नाही. पानांचा आकारही कमी राहतो वेली वरती पानांची संख्या कमी असल्यामुळे अन्नद्रव्यांचा साठा निर्माण करता येत नाही तसेच काही बागेमध्ये पान हे सुकुडलेले दिसून येतात.

उपाय योजना

  • चुनखडी युक्त मातीतील बागेत छाटणी पूर्वीच शेणखतांमध्ये सल्फर मिसळून बोद तयार करावेत.
  • पलाश ची कमतरता दूर करण्यासाठी योग्य प्रमाणात सल्फर मिसळून घेणे
  • बागेत पलाश व मॅग्नेशियम यांच्या प्रत्येकी चार ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे चार दिवसांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या फवारण्या कराव्यात असे केल्यास वेलीची वाढ नियंत्रणात राहते
  • कोणत्याही प्रकारचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्याला सर्वप्रथम पाणी आणि माती परीक्षण करणे खूप गरजेचं असतं.
  • माती आणि पाणी परीक्षणामुळे आपल्याला मातीमध्ये आणि पाण्यामध्ये काय कमी जास्त आहे याची पूर्वकल्पना मिळते त्यामुळे आपल्याला पुढील उपाययोजना करण्यास उपयुक्त आणि सोयीस्कर ठरते.

माती परीक्षण

द्राक्ष शेती व्यवस्थापन आणि उपाययोजना, Grape Farming Management and Solutions, Grapes Organic Farming, द्राक्ष वेलीची काडी परीक्षण

फळ छाटणी पूर्वी जर माती परीक्षण केल्यास आपल्याला येणाऱ्या अडचणीवर मात करणे शक्य आहे. माती परीक्षण करणे गरजेचे असतात.प्रत्येक भागामध्ये चुनखडीचे प्रमाण वेगवेगळे असते. चुनखडीचे प्रमाण 3%- 22% पर्यंत आढळून येते

  • माती परीक्षणासाठी नमुना घेतेवेळी ड्रीपर पासून दहा सेंटीमीटर लांब एक फूट खोल खड्डा घेऊन त्यातील माती घ्यावी
  • एका एकरातून वरील सांगितल्याप्रमाणे पाच ते सहा खड्ड्यांमधील माती घ्यावी
    घेतलेली माती सर्व एकत्र मिसळून घ्यावे
  • मिसळून घेतलेल्या मातीतील अर्धा किलो माती प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवावी

पाणी परीक्षण

पाणी परीक्षण करणे गरजेचे असं कारण पाण्यामधील क्षरारेचे प्रमाण करण्यास मदत होते होणाऱ्या नुकसानापासून बागेला वाचवता येतं.पाण्याचा नमुना घेण्यासाठी सुरुवातीचे पंधरा ते वीस मिनिटे पंपाचे पाणी न घेता ते तसेच सोडून द्यायचे
त्यानंतर पाणी एका बाटलीमध्ये घ्यायचे
हे जमा केलेले पाणी परीक्षण परीक्षणासाठी प्रयोग शाळेमध्ये पाठवून द्यायचे

माती आणि पाणी परीक्षण केल्यामुळे बागेतील पाणी आणि माती यांचे सध्याची परिस्थिती काय आहे याची पूर्वकल्पना आपल्याला मिळू शकते त्यामुळे त्या पुढील उपाययोजना काय करायला हव्यात ठरवायला मदत होते

काडी परीक्षण

द्राक्ष शेती व्यवस्थापन आणि उपाययोजना, Grape Farming Management and Solutions, Grapes Organic Farming, द्राक्ष वेलीची काडी परीक्षण

आपण वरती पाहिल्याप्रमाणे बागेत येणाऱ्या त्रुटींपासून आपण कसे वाचता येईल यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना आणि माती परीक्षण असो पाणी परीक्षण असो कशासाठी करायचा आहे हे पाहिलेला आहे तसेच आपल्याला जर भरघोस उत्पादन तर काडी परीक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे कारण फळ छाटणी पूर्वी काडी तपासणी केल्यास टाळता येते

  • एका एकरातून पाच ते सहा ठिकाणावरून काड्या गोळा कराव्यात
  • प्रत्येक काडीची जाडी सहा ते आठ आठ ते दहा आणि दहा ते बारा मिलिमीटर असावी
  • प्रत्येक ठिकाणाहून सात ते आठ काड्या तळापासून एक डोळा सोडून कापून घ्याव्यात
  • गोळा केलेला काड्या एका ओल्या पोत्यामध्ये गुंडाळून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवाव्यात
  • तपासणीसाठी पाठविलेल्या ओल्या राहतील याकडे लक्षात ठेवावे जेवढी काळी ओली तितका डोळा तपासणी सोपे होते

द्राक्षवेल काडी परिपक्वता

शेतकरी मित्रांनो आता आपण पाहिला सगळ्या उपाययोजना उपाययोजना जेणेकरून आपण आपले बागेला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने निगा राखू शकतो परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पिकातून किंवा बागेतून मिळणारे उत्पादन आणि चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर आपल्याला द्राक्ष वेलीच्या काडीची परिपक्वता जपणे गरजेचे आहे
पावसाळ्यामध्ये बागेची वाढ चांगल्या झपाट्याने होत असते आणि पुढील काळात गाडी परिपक्वतेचा असतो. चांगल्या जमिनीत पाणी जास्त का टिकून राहत असल्यामुळे ओलावा जास्त का टिकून राहतो. त्यामुळे बेलीची वाढ ही तितक्यात जोमाने होते आणि त्यामुळे दिल्लीच्या काडीची परिपक्वता लांबणीवर जाते. काडी जितकी तपकिरी रंगाची होईल तितका चांगला घड निघण्याची शाश्वती वाढते पाऊस किंवा ढगाळी वातावरणात वेलीची वाढ नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे ठरते

उपाय योजना

  • काडीचा शेंडा मारणे
  • डबल फूटवे काढणे
  • ठिबक द्वारे देणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवणे
  • पलाश ची गरज नुसार फवारणी करणे तसेच जमिनीतून देणे
  • 0-0-50 हे खत चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे तीन ते चार फवारण्या तीन दिवसांतून एक अशा पद्धतीने फवारून घ्याव्यात असे केल्याने बेलीतील सायटोकायनींचे प्रमाण वाढेल

सूचना

कीडनाशकांचा वापर करताना मधमाशी मित्र कीटकांना हानिकारक अशी कीटकनाशके वापरू नयेत.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि या माहितीचा तुम्हाला या माहीतच तुम्हाला तुमच्या बागेत उपयोग होईल अशी आशा व्यक्त करतो आणि हा लेख पूर्ण वाचल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार
धन्यवाद