दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी घडसंख्येचे नियोजन (Grape management)

दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी घडसंख्येचे नियोजन, Grape management, कॅनॉपी प्रमाणे घडसंख्या नियोजन, घड संख्या नियोजनाचे टप्पे, घडांची वेलीवरील निवड करण्याची पद्धती, घडातील द्राक्ष जाती, Organic Grapes Farming,

द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी दर्जेदार आणि गोड द्राक्ष आणि घडसंख्येचे नियोजन खूप महत्त्वाचा आहे बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात द्राक्ष येतात कारण द्राक्ष उत्पादन सगळीकडे वाढले आहे त्यामुळे बाजार भाव घसरतात द्राक्ष जर चांगले असतील तर ग्राहक त्यांना चांगल्या दराने खरेदी करतात त्यामुळे काय होते हलक्या द्राक्षांची विक्री कमी होते आणि त्यांना दरही कमी भेटतो
अशावेळी दाक्षांचा दर्जा सुधारणे खूप महत्त्वाचे असते चांगली राहणारी टिकाऊ गोड चवदार द्राक्ष 4ते6 दिवस काढणीनंतर शीतगृहाशिवाय मोकळ्या वातावरणात चांगले राहतात चांगल्या दर्जाची द्राक्ष तयार करण्यासाठी घडातील संख्यांचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे कॅनॉपी व्यवस्थापन सिंचन व्यवस्थापन संजीवके व्यवस्थापन कीड रोग व्यवस्थापन या गोष्टी महत्त्वाच्या असतात

हे सुद्धा वाचा द्राक्ष शेती व्यवस्थापन आणि उपाययोजना

कॅनॉपी प्रमाणे घडसंख्या नियोजन

  • मंडप किंवा वाय पद्धतीच्या मांडवात सूर्यप्रकाश पानातून जमिनीवर पडतो साधारणतः 75 टक्के पानावर सूर्यप्रकाश पडतो एकरी 12 टन उत्पादन या दर्जेदार मालाचे बागेतून मिळणे आवश्यक आहे पण जर वेलीवर पाने कमी आहेत व फक्त 50 टक्के सूर्यप्रकाश जमिनीवर पडतो तर एकरी नऊ ते दहा टन उत्पादन घेणे महत्त्वाचे राहील तेवढेच घड संख्या ठेवणे गरजेचे आहे तरच दर्जेदार द्राक्ष उत्पादन मिळू शकत.
  • जमिनीवर 25 टक्के पेक्षा कमी सूर्यप्रकाश पडत असेल व कॅनोपी जास्त असेल तर ज्यादा पाने काढावीत कारण गरजेपेक्षा जास्त पाने असतील तर पानाचे अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते त्यामुळे साधारणपणे 75 टक्के सूर्यप्रकाश पानावर व 25% जमिनीवर पडेल अशा प्रकारे कॅनाॅपी व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे
  • चार तास पानावर जर दिवसभरात सूर्यप्रकाश पडत असेल तर 18 ग्राम वजनाचे द्राक्ष पान तयार करते

घड संख्या नियोजनाचे टप्पे

  • वांज फुटी काढताना घड संख्या एकाच वेळी नियंत्रित करणे अयोग्य ठरते जादा घड जर सुरुवातीला कमी केले तर घडांचा दांडा लांबत नाही त्यामुळे घडात मनी हे कमी ठेवावे लागतात अशा प्रकारचे घड 400 ते 600 पेपर वजणाचे होणे ऐवजी 150 ते 200 ग्रॅम वजनाचे होऊन वजनात घट होते तसेच बाग फुलोरात असताना मनीगाळ होऊन घर संख्या कमी होते व नुकसान होते
      डाऊनी साठी अनुकूल परिस्थिती असल्यास द्राक्ष घड जळून जातात वांझफुटी काढत असताना एका कोडीस दोन फुटी व त्यावर दोन घड ठेवावेत डाऊनी आणि मणीगाळ कमी झाल्यावर घडातून फुलांचा दांडा किती त्याचप्रमाणे घडाचा आकार पाहून वजनाचा अंदाज घ्यावा त्याप्रमाणे मनी चार ते सहा मीमी झाल्यावर ज्यादा घड कमी करावे आणि 25 टक्के ज्यादा घड ठेवावे
  • त्याचप्रमाणे फुगवण चांगली झाल्यास भगवती चा अंदाज घेऊन 25% ज्यादा घड कमी करावेत भगवान कमी असेल तर जादा घड कमी करू नये जेणेकरून बागेत पुरेशा वजनाचे घड मिळू शकतील

घडांची वेलीवरील निवड करण्याची पद्धती

वेळेवरील घड सर्वत्र पसरून ठेवावेत प्रथम एप्रिलच्या एका किडीस ज्यादा घड कमी करून एक घड ठेवावा त्यानंतर फुगवणीत मागे पडलेले ज्यादा घड कमी करावे त्याचप्रमाणे ज्यादा घड असल्यास सूर्यप्रकाशात असणारे घड कमी करून टाकावेत तीव्रप्रकाशामुळे घडावर डाग पडून त्त्याची फुगवण कमी होऊ शकते घडाचा आकार मोठा असल्यास सहा ते सात इंच लांबीच्या पाकळीनुसार तळातून जादा लांबीचा भाग काढून टाकावा

हे सुद्धा वाचा वाढते तापमान आणि द्राक्ष बागेतील उपायोजना

घडातील द्राक्ष जाती

  • *सोनाका व सोनाका उपजाती
  • *थॉमसन व सुधाकर सिडलेस
  • *नानासाहेब पर्पल जम्बो द्राक्ष जाती

1 thought on “दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी घडसंख्येचे नियोजन (Grape management)”

Leave a Comment