केळीवर प्रक्रिया करून कमवा लाखो रुपये

केळीवर प्रक्रिया करून कमवा लाखो रुपये, केळी प्रक्रिया उद्योग, केळी भुकटी, केळी जॅम, केळी चिप्स, केळी रस, केळी सुकेळी

केळीवर प्रक्रिया करून कमवा लाखो रुपये

मूल्यवर्धित उत्पादन हे केळी प्रक्रिया मुळे होते त्यास खूप चांगली मागणी आहे. आणि नंतर फळांचे जे 25 ते 30 टक्के नुकसान होते. ते या उद्योग प्रक्रियेमुळे टाळू शकतो असेच खोडापासून धागा निर्मिती होते.

केळी प्रक्रिया उद्योग

  • केळी रस
  • केळी भुकटी
  • केळी जॅम
  • केळी सुकेळी
  • केळी चिप्स

केळी रस :

केळी प्रक्रिया उद्योग(Banana Juice)
केळी प्रक्रिया उद्योग (Banana juice )

*पल्पर यंत्राच्या सहाय्याने पूर्ण पक्व खेळाचे घर काढले जातात. केळीचा रस हा सर्वसाधारणपणे काढता येत नाही कारण, त्याचे गर घट्ट असतात. त्यासाठी पेक्टीनेज एंन्झाइम हे पाच मिली प्रति किलो प्रमाणात मिसळून दोन तास ठेवल्यामुळे स्वच्छ रस आपणास सहज मिळतो.

*रसा चा गोडवा हा 24 ते 26 डिग्री ब्रिक्स असा असतो. यामध्ये आवश्यकतेनुसार दीडपट पाणी मिसळून त्यामध्ये सायट्रिक आम्ल टाकून आर टी एस बनते. त्याचा गोडवा 15 डिग्री ब्रिक्स व आम्लता 0•3टक्का एवढी असते. आपण हे पेय 85 अंश सेल्सिअस तापमानाला पाश्चराइज करून निर्जंतूक बाटल्या मध्ये आपण भरू शकतो. खूप काळ टिकू शकतो या रसाला सहा महिन्यापर्यंत टिकवता येते 88% रसाचे प्रमाण आपल्याला केळी मधूनच मिळते.

हे ही वाचा

हिवाळ्यात जनावरांचा योग्य आहार आणि आरोग्य व्यवस्थापन

केळी भुकटी :

केळी प्रक्रिया उद्योग (Banana powder)
केळी प्रक्रिया उद्योग (Banana powder)


●परदेशात केळीच्या भुकटीला भरपूर मागणी आहे. पूर्ण पिकलेली केळीच विशेषतः भुकटी तयार करण्यासाठी वापरण्यात येते.

●प्रथमतः स्वच्छ पाण्याने केळी धुवून घ्यावी. मशीनच्या सहाय्याने केळीची साल काढून लगदा तयार करतात.
● भुकटीसाठी विशेषतः स्प्रे ड्रायर फोम मेंट ड्रायर किंवा ड्रम ड्रायर याचा वापर करतात. ही भुकटी निर्जंतुक हवाबंद डब्यात साठवतात, तसेच तिला कोरड्या व थंड जागी सुद्धा साठवतात.
● भुकटी चा उपयोग छोट्या मुलांच्या आहारात केला जातो. या भुकटीचा वापर आईस्क्रीम बिस्किटे बेकरी यामध्ये केला जातो.

केळी जॅम :

केळी प्रक्रिया उद्योग (Banana Jam)
केळी प्रक्रिया उद्योग (Banana Jam)

●जॅम बनवण्यासाठी पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर केला जातो. गराचे वजन जेवढे आहे तेवढे साखर मिसळून हा गर मंद आचेवर शिजवतात. पूर्ण साखर विरघळल्यानंतर ०•५टक्के व ०•३ टक्का सायट्रिक आम्ल व रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे.
●६८ डिग्री ब्रिक्स या मिश्रणाचा ब्रिक्स झाल्यानंतर जाम तयार झालेला असतो. हा तयार झालेला जाम कोरड्या व निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून ठेवावा. एक वर्षापर्यंत हा पदार्थ टिकतो.

केळी सुकेळी :

● टनक व पूर्ण पिकलेली फळे निवडून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर ही फळे उभे चिरून घ्यावी व त्याचे दोन भाग करून पुन्हा आडवे लहान काप करून घ्यावेत. त्या कापांना गंधकाची धुरी ही तीस मिनिटे द्यावी म्हणजे( एक किलो केळीसाठी तीन ग्राम गंधक).
● या धुरी मुळे केळीच्या कापेला सोनेरी कलरच्या आकर्षक छाटा येतात, त्याचप्रमाणे सुकळीची प्रत उंचावली जाते. त्यानंतर हे काप सुकवून घ्यावेत व प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये किंवा निर्जंतुक केलेल्या भरणी मध्ये भरून घ्यावे.

केळी चिप्स :

केळी प्रक्रिया उद्योग (Banana Chips)
केळी प्रक्रिया उद्योग (Banana Chips)

●चिप्स बनवण्यासाठी पूर्ण वाढलेली दहा टक्के परिपक्व केळीची निवड केली जाते. केळी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत त्यानंतर ती कोरड्या फडक्याने पुसून घ्यावी. त्यानंतर स्टीलच्या चाकूने त्यांची साल काढावी.
● केळी सोलन्याचं यंत्र हे ताशी 450 केळी एका दिवसात सोलतो. ०•३ते ०•५मी मी जाडीच्या चकत्या यंत्राच्या साह्याने करून घ्याव्यात. जर आपल्याकडे यंत्र उपलब्ध नाही तर आपण स्टीलच्या चाकूने पातळ गोल काप करावेत. साध्या चाकूने जर आपण काप केले तर ते काळे पडू शकतात. ते काप पांढरीशुभ्र होण्यासाठी 0.1% सायट्रिक ऍसिड किंवा पोटॅशियम मेटाबाय सल्फाइड च्या द्रावणात 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यामुळे ती काळसर पडणार नाहीत. त्यानंतर त्या चकत्या उकळत्या पाण्यामध्ये ४ते ५ मिनिटे थंड करून घावी.प्रति किलो ४ग्रॅम या प्रमाणात गंधक घेऊन त्याची धुरी देऊन घ्यावी.
● ड्रायरच्या सहाय्याने किंवा उन्हात या चकत्यात सुकवाव्यात. जर आपल्याला ड्रायरच्या सहाय्याने चकत्या सुकवायच्या असल्यास त्या ड्रायरचे तापमान हे 50 ते 55 अंश सेल्सिअस एवढे ठेवावे. ह्या चकत्या हाताने दाबल्यानंतर जर मोडल्या तर त्या तयार झाल्यात असं समजावे. आणि सुखावण्याचे काम तिथेच थांबवावे हे तयार झालेले वेफर्स हाय डेन्सिटी पॉलीथीन पिशव्यात घालून हवा बंद डब्यामध्ये साठवतात.

इतर मूल्यवर्धित उत्पादने

● केळीच्या पानापासून कप व प्लेट तयार करतात तसेच खोडापासून धागा निर्मिती करतात.
● बायोगॅस निर्मिती ही खोडाच्या चौथ्या पासून होते कापड उद्योगात स्टेन म्हणून खोडाच्या रसाचा उपयोग होतो.
● इथेनॉल निर्मितीसाठी फळांच्या सालीचा उपयोग होतो.
● कच्ची फळे खोडाचा गाभा व केळफुलापासून भाजी देखील बनवतात. त्याचप्रमाणे त्याच्या दांड्यांपासून टोपल्या चटई पिशवी यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करतात.
● खोड पाने केळफुल जनावरांसाठी खाद्य म्हणून उपयोगात येतात.

हे ही वाचा कृषी शेत्रातील रोजगार संधी

3 thoughts on “केळीवर प्रक्रिया करून कमवा लाखो रुपये”

  1. Купить двери на заказ в Москве
    Изготовление дверей на заказ по индивидуальным размерам
    Советы по выбору дверей на заказ
    Виды и оттенки дверей на заказ
    Услуги по доставке и установке дверей на заказ
    Какие факторы влияют на выбор дверей на заказ? варианты дверей на заказ
    Ламинированные двери на заказ: преимущества и недостатки
    Железные двери на заказ: надежность и безопасность
    Какие двери на заказ подойдут для загородного дома?
    выбор дверей http://www.mebel-finest.ru.

    Reply

Leave a Comment