Problems in vineyard due to unseasonal rains.अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेत येणाऱ्या अडचणी आणि कोणती काळजी घ्यायची.अवकाळी पाऊस परिस्थितीमध्ये बागेमधील उपाय योजना.पानांच्या वाट्या किंवा पानांवर स्क्रॅच अश्या परिस्थितीत करायची उपाय योजना.असमान काडी परिपक्व होण्यास खालील परिस्थिती कारणीभूत असते.काडी एकसारखे परिपक्व करण्यासाठी उपाय योजना.
अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेत येणाऱ्या अडचणी आणि कोणती काळजी घ्यायची.
गेल्या काही दिवसांमध्ये खूप पाऊस झाला काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी हा कमी प्रमाणात झाला. तसेच खूप भागांमध्ये ढगाळ वातावरण देखील दिसून आले. अशावेळी बागेमध्ये खूप प्रकारच्या समस्या आढळून आल्या. काही ठिकाणी द्राक्ष बागेतील पानांवर याचा परिणाम दिसून आला. द्राक्षाच्या बागेमध्ये पावसामुळे दोन वेलींच्या मध्ये पाणी साठून राहिले. ज्यावेळी तिथे वापसा झाला तेव्हा त्या ठिकाणी पांढऱ्या मुळांचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून आले. अन्नद्रव्य शोषणासाठी ही मुळे कार्यरत होती. त्याचप्रमाणे सजीवांची निर्मिती देखील त्यांनी त्यासोबत केली. तसेच वेलीच्या शेंड्यावर सजीविकांना पोहोचवले त्यामुळे वेल जोमात वाढली.वेलीच्या काडीवरच त्यांच्या हालचालीचा वेग नियंत्रणामध्ये असतो. त्यामुळे नेमके काय होते तर सायटोकाइनिनचे प्रमाण जास्त राहिल्यामुळे जिब्रेलिन्स ची मात्रा कमी होते. पण पावसामुळे काय होते परिस्थिती उलट होते. पेऱ्यातील अंतर शेंडा वाढ होत असताना वाढते त्याचप्रमाणे बगलफुटीची वाढ देखील फास्ट होते.याचा परिणाम म्हणजे काडीची परिपक्वता लांबणीवर जाण्याचे समस्या उद्भवते. तसेच बगल फुटीची वाढ झाल्यामुळे डाऊनी मिलड्यूसारखा रोग कॅनोपी मध्ये आद्रतेचे प्रमाण जास्त वाढून होतो.
अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेत येणाऱ्या अडचणी आणि कोणती काळजी घ्यायची.
1) जमिनीचा वापसा होईपर्यंत पाणी बंद करणे.
2) स्फुरद व पालाशयुक्त खतांची फवारणी करणे.
3) त्वरित बगलफुटी काढून घेणे.
4) जास्त शेंडा खुडण्याचे टाळणे.
5) पालाशची फवारणी ही काडी परिपक्व होत
असल्यास करणे.
6) डोळ्याच्या जवळ असलेले छोटे छोटे पाने काढून टाकणे. त्यामुळे काय होईल डोळ्यावर एकसारखा सूर्यप्रकाश पडेल जेणेकरून घड निर्मिती व्यवस्थित होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही.
ज्या ठिकाणी खूप पाऊस होतो अशा ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पानांच्या वाट्या तयार झालेला आपल्याला खूप प्रमाणात आढळतात. त्यामुळे काय होईल आपल्याला काडीभोवती जी पाने आहेत ते अर्धी पक्व आणि अर्धी परिपक्व तयार झालेली दिसतील तर अनेक भागात कोवळी पाने असतील. बागेमध्ये कोणत्या पानाच्या वाट्या होतील हे त्या त्या परिस्थितीनुसारच आपल्याला समजते. त्याचप्रमाणे जमीन कशा प्रकारची आहे यावर देखील ते अवलंबून असते. चुनखडीचे प्रमाण ज्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी अन्नद्रव्याचे वाहन योग्य प्रमाणात होत नाही.आणि त्या ठिकाणी खूप अडचणी निर्माण होतात विशेषतः पालाश लोह आणि मॅग्नेशियम या अन्नद्रव्याचे वाहन होत नाही. त्यामुळे पानांमध्ये खूप कमतरता निर्माण होते आणि ते आपल्याला दिसूनही येते. त्याचप्रमाणे जुन्या पानांवर वाट्या तयार होतात अशा देखील समस्या उद्भवतात. जुन्या पानांवर वाट्या निर्माण झाल्या ते पाने पिवळसर कलरचे दिसून येतात. काही ठिकाणी पानांच्या शिरा गुलाबी व त्याचप्रमाणे हिरव्या देखील दिसतात आणि मध्यभाग पांढरा पिवळसर दिसतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यात अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. पानांची कमतरता ही बागेत चुनखडीचे प्रमाण किती आहे यावर दिसते.
त्याचप्रमाणे आता पावसाळा थांबून उन्हाळा सुरू होईल आद्रतेचे प्रमाण देखील खूप जास्त वाढेल तसेच पानांमध्ये लवचिकता देखील वाढते.
अवकाळी पाऊस परिस्थितीमध्ये बागेमधील उपाय योजना.
1)स्फुरद आणि पालाश या खतांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे पानांच्या वाट्या झालेल्या ठिकाणी करावा.
त्याचप्रमाणे ज्या बागेमध्ये काडी परिपक्व होत आहे त्या ठिकाणी देखील त्यांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
तसेच लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी 3-4 प्रति ग्रॅम लिटर पाण्यात फेरस सल्फेट टाकून दोन ते तीन फवारण्या करून घेणे.
त्याचप्रमाणे ठिबक द्वारे प्रति एकर 10 ते 12किलो फेरस सल्फेट देणे.
2) 3-4 प्रति लिटर मॅग्नेशियम सल्फेट याच्या दोन ते तीन फवारण्या करणे त्याचप्रमाणे 12-15 किलो मॅग्नेशियम सल्फेट हे जमिनीतून ठिबक सिंचनाद्वारे देणे.
3) 30 ते 40 किलो सल्फर जमिनीच्या बोदामध्ये मिसळावे नंतर 25 ते 30 दिवसांनी पुन्हा तितक्याच मात्रांमध्ये सल्फर देणे.
4) पानांच्या वाट्या तयार झालेला असल्यास त्या नवीन फुटेला शेंडा पांढरा कागदावर आपटणे त्यामुळे आपल्याला रस शोषक किडी किती प्रमाणात आहे ते दिसेल.
त्याचप्रमाणे जशी शिफारस असेल त्याप्रमाणे पावसाचे फवारणी करून घेणे. बऱ्याच वेळा पानांवर स्क्रॅच येणे त्याचप्रमाणे पानांच्या वाट्या होणे आणि पानांची कडा जळल्यासारखी दिसणे अशा प्रकारचे लक्षणे आपल्याला आढळून येतात.नव्या व जुन्या अशा दोन्ही प्रकारच्या झाडांवर स्कॅच पडतात. काही वेळा काय होते आपण कीटकनाशके, संजीवके व खतांचा वापर एकत्रितपणे करून फवारणी करतो परंतु ही खूप चुकीची पद्धत आहे. त्याचप्रमाणे जास्त घटक आपण एकत्रित करून जर फवारणी केली तर त्याचा फायदा होण्याऐवजी आपल्याला विपरीत परिणाम पिकांवर दिसून येतो. विविध प्रकारच्या रसायनांची तीव्रता तसेच अनेक घटकांचे एकत्र करण आणि फवारणी दरम्यान वाढलेले तापमान त्यामुळे पानातील पेशींना इजा पोहोचते. त्यामुळे काय होते तो भाग सूप्त आणि जळल्यासारखा दिसतो. अन्नद्रव्याच पोषण चुनखडीचे प्रमाण जमिनीत जास्त असल्यामुळे कमी होते. त्याचप्रमाणे वेलींवर ताण वाढतो आणि खूप ठिकाणी पाऊस झाल्यामुळे आणि बागेत पाणी शिरल्यामुळे पानांच्या लवचिकतेचे प्रमाण वाढते. कोळी किडीचा प्रादुर्भाव हा जुन्या पानांवर जास्त प्रमाणात दिसून येतो. पानातील हरितद्रव्य ही कीड शोषून घेते. पाणी पिवळी पडणे पानांच्या वाट्या तयार होणे काळया जमिनीत पाऊस पडल्यानंतर अचानक ती परिस्थिती उद्भवते.
पानांच्या वाट्या किंवा पानांवर स्क्रॅच अश्या परिस्थितीत करायची उपाय योजना.
1) एका पेक्षा जास्त खतांचे मिश्रण करून फवारणी करणे टाळणे.
2) तापमान कमी असल्यास शक्यतो फवारणी करणे कारण त्यावेळी रसायनिक शोषून घेण्याची क्षमता पानांचे चांगली असते.
3) खरड छाटणीच्या 45 दिवसानंतर आणि पाऊस सुरू होण्यापूर्वी देठाचे परीक्षण करून घेणे. त्यासोबतच जर आपण माती परीक्षण पण करून घेतले तर आपल्याला सध्याची मातीची स्थिती कशी आहे समजेल. त्यामुळे आपल्याला अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात करणे सोपे जाईल.
साधारणतः पावसाळ्यामध्ये काडी परिपक्व होते. फुटीची वाढ यावेळी चांगली होते तर काही ठिकाणी काडीची परिपक्वता सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतील. एखादी सुरुवातीला गुलाबी रंगाची असते आणि त्यानंतर दुधाळ रंगाची होऊन तपकिरी रंगाची होईल.या ठिकाणी तळापासून एक पेरा पुढे सरकत जाते म्हणजेच काडीचा परिपक्वतेला ला या बागेत कोणते अडचण दिसून येत नाही. या पेरामध्ये काही भाग हिरवा तर काही भाग परिपक्व असेल तर काही भाग तपकिरी आणि काही भाग हिरवा दिसेल.आणि तिसरा पेरा परिपक्व झालेला दिसेल त्याला बोट्रीडिपलोडिया असे म्हणतात.
असमान काडी परिपक्व होण्यास खालील परिस्थिती कारणीभूत असते.
1) वेळेला खरड छाटणीनंतर पाण्याचा ताण बसलेला असेल.
2) खराब झालेला जास्त पावसामुळे तान बसलेला असणे.
3) पालाशची कमतरता असणे.
4) करपा रोगाचा प्रादुर्भाव फळ छाटणीनंतर झाला असणे.
5) बागेतील आद्रतेचे प्रमाण जास्त पावसामुळे वाढणे.
अशा परिस्थितीमध्ये जर वेलीला ताण बसला तर अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. आणि वेलीच्या हालचालीवर वेगळा परिणाम होतो. तसेच काडी एकसारखे परिपक्व होताना दिसत नाही त्यामुळे काय होते चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळत नाही.
काडी एकसारखे परिपक्व करण्यासाठी उपाय योजना.
1) दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे ताम्रयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करणे.
2) डायफेनोकोनॅझोल 0•5 ते 0•7 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करून घेणे.
3) ट्रायकोडर्मा 2 ml/Ltr प्रमाणे तीन दिवसाच्या अंतराने तीन-चार फवारण्या करणे. जमिनीतून ट्रायकोडर्मा 2 लिटर प्रति एकर प्रमाणे ठिबक द्वारे सोडणे त्यामुळे काय होईल वेलीची रोगप्रतिकार क्षमता वाढून खूप प्रकारचे रोग टाळता येतील.
हे ही वाचा कृषी शेत्रातील रोजगार संधी