Organic Fertilizers: सेंद्रिय खते, सेंद्रिय खतांचे प्रकार, सेंद्रिय खतांचे फायदे आणि तोटे

Organic Fertilizers, Types , Advantages & Disadvantages. सेंद्रिय खते, सेंद्रिय खतांचे प्रकार, सेंद्रिय खत म्हणजे काय? सेंद्रिय खतांचे महत्त्व.सेंद्रिय खतांचे फायदे आणि तोटे.

 सेंद्रिय खत हा वनस्पतींच्या पोषक तत्वांचा महत्त्वाचा एक स्रोत आहे. सेंद्रिय खते हे रासायनिक खतांपेक्षा खूप वेगळे व उपयोगी असतात ते मातीला निरोगी ठेवण्यास मदत करतात.आपल्या झाडांना पोषक अन्नद्रव्य प्रदान करतात.

 सेंद्रिय पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर असल्यास माती मोकळी आणि हलकी राहते, जास्तीत जास्त पोषणद्रव्ये अन्नद्रव्ये साठवून समजून ठेवण्याचे क्षमता या मातीमध्ये राहते. सेंद्रिय खतांचा वापरामुळे मातीतील सूक्ष्म जीवांच्या वाढीस मदत होते, त्यामुळे जमिनीत उगवणाऱ्या वनस्पतींची आणि  उत्पादन घेणाऱ्या पिकांचे आणि त्यांच्या मुळ्यांचा विकास चांगला होतो.

 सेंद्रिय खत म्हणजे काय?

Organic Fertilizers सेंद्रिय खत म्हणजे नैसर्गिक घटकांचा उपयोग करून निर्माण केलेले खत यामध्ये प्रामुख्याने जनावरांची विष्ठा, जनावरांच्या पदार्थ, मानवी मलमूत्र नैसर्गिक स्रोत, भाजीपाला चा समावेश असतो.

 सेंद्रिय खतांचे महत्त्व

सेंद्रिय खतांचे महत्त्व:  आजच्या  काळात शेतीमध्ये सतत होणाऱ्या विकासामुळे कृषी उत्पादनात सेंद्रिय खतांचे वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा नैसर्गिक पूरक खतांचा वापर करून उत्पादनामध्ये विलक्षण वाढ होते. अश्या पिकांमध्ये नैसर्गिक गुणधर्म जास्त असतात, अश्या उत्पादनामध्ये कमालीची चव असते. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पाणी टिकून राहण्याची क्षमता चांगल्या प्रमाणात दिसून येते.शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचा वापर याविषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे.

 आजकालच्या वाढत्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचे प्रदूषण होत आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे माती नापीक होत आहे. त्यामुळे आपल्याला उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे,तसेच रासायनिक खताचा वापर न करता उत्पादन चांगले घेण्यासाठी सेंद्रिय खतांचा विचार केलाच पाहिजे.सेंद्रिय खतांचा वापर झाल्यास आपणाला रासायनिक खतांचा खर्च कमी करता येतो व जमिनीचा कस वाढवण्यासाठी मदत होते. यासाठी आपण पशुपालन आणि शेती असे संयोजन साधू शकतो. पशुधन आणि कुक्कुटपालन यांचा एकत्रित वापर आपण सेंद्रिय खतांसाठी उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी करू शकतो.

 सेंद्रिय खतांचे प्रकार

  1.  प्राणी आधारित खते
  2.  वनस्पती आधारित खते
  3.  खनिज खाते

 असे तीन प्रकारचे सेंद्रिय खतांचे प्रकार आहेत

 प्राणी आधारित खते

  1.  हाडाचे खते
  2.  रक्ताचे खत
  3.  जनावरांचे खत
  4.  मासे खत
  5. शेलफिश
  6. फिश इमल्शन खत

 हाडांचे खत

 हाडांचे खत बनवण्यासाठी जनावरांच्या हाडांचा वापर केला जातो. हाडाच्या खतामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात, तसेच नायट्रोजनही असते. हाडांच्या खतांचा वापर रोपांच्या वाढीसाठी केला जातो, तसेच फुल वाढण्यास मदत करते. आणि भरपूर उत्पादन मिळू शकते.

 रक्ताचे खत

 रक्तांचे खत बनवण्यासाठी प्राण्यांचे रक्त वापरली जाते. या खतामुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते तसेच झाडे चांगल्या प्रमाणे वाढतात. नायट्रोजनच्या उपलब्धतेमुळे फुलांच्या वाढीस मदत होते तसेच उत्पादन हे चांगले मिळते. रक्तांचे खत खत हे एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणूनही वापरता येते.

 रक्ताचे खत वापरताना घ्यावयाची काळजी म्हणजे या खताचा  कमी प्रमाणात असला पाहिजे. खताच्या जास्त वापरामुळे झाडांची मूळ जळण्याची शक्यता असते.

 जनावरांचे खत

जनावरांचे खत हे विविध पाळीव प्राण्यांपासून बनविले जाते. जनावरांच्या खतांना पशुधन असेही म्हटले जाते. यामध्ये प्रामुख्याने शेणखत, प्राण्यांची विष्ठा याचा समावेश होतो.

 या खताचा वापर आपण तन नियंत्रण करण्यासाठी करू शकतो. तसेच शेणखतामध्ये जमिनीत ओलावा धरून ठेवण्याची क्षमता असते. या जनावरांचा खतांचा वापर केल्याने जमीन भुसभुशीत होते त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते.

 सागरी पक्षांच्या  विष्ठेपासून बनविलेले खत (seabird guano) हे नैसर्गिक बुरशीनाशक व जमिनीतील निमाटोड रोग नियंत्रित करू शकते .

 मासे खत

 मासे खताचा वापर सेंद्रिय खतांमध्ये केला जातो. या खतामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे या खताचा वापर मातीची आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो. खताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि वनस्पतींना वाढण्यास मदत करते.

 फिश इमल्शन  खत (Fish Emulsion )

  फिश इमल्शन (Fish Emulsion ) खत बनवण्यासाठी माशांचा उपयोग केला जातो. या खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण खूप जास्त असते.  फिश इमल्शन खत हे मातीला मुलायम करण्याचं काम करते.  फिश इमल्शन खता ला सोईल कंडिशनर (soil conditioner) सुद्धा म्हटले जाते. या खताचा उपयोग अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. या खताचा वापर करण्याअगोदर आपण या खताचा वापर विषयी माहिती घेणे गरजेचे आहे. हे खत खूप अमली असते. या खताच्या अतिवापरामुळे झाड जळण्याची शक्यता जास्त असते

शेलफिश खत

  शेलफिश खत  बनवण्यासाठी खेकड्यांच्या आणि माशांच्या हाडाचा आणि कवच याचा वापर केला जातो. अशा खतांमध्ये कॅल्शियम चे प्रमाण खूप जास्त असते फॉस्फरस व इतर खनिजे सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात.

 ज्या खतांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस चे प्रमाण जास्त असते, अशी खते फुलांच्या वाढीस आणि वनस्पतींच्या मुळाच्या आरोग्य सुधारण्यास मदत करते

शेलफिश खत या चिटीन असल्यामुळे काही ठराविक कीटकांच्या वाढीस आळा घालते

 वनस्पती आधारित खाते

  •  कंपोस्ट खत
  •  कपाशीची पेंड
  •  सोयाबीनची पेंड
  •  समुद्री शेवाळ

कंपोस्ट खत

 कंपोस्ट खताला उत्कृष्ट माती सुधारक असे म्हणून ओळखले जाते. कंपोस्ट खतांमध्ये पोषक तत्वांचा मुबलक प्रमाणात साठा असतो. या खताचा वापर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी केला जातो.

 कंपोस्ट खतामध्ये पाणी टिकून ठेवण्याची क्षमता असते, त्यामुळे झाडांना वाढीस लागणारे पोषणद्रव्ये प्रदान करण्यामध्ये  मोलाच योगदान असते.

 कपाशीची पेंड खत

 कपाशीची पेंड खत नायट्रोजन तसेच काही प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. याचा वापर एक अच्छादन म्हणून केला जातो, तसेच प्रामुख्याने बागेतील माती झाकण्यासाठी वापर केला जातो.

 सोयाबीनची पेंड

 सोयाबीनच्या पेंडीचा वापर मातीची उत्पादकता टिकवण्यासाठी केला जातो. सोयाबीनची पेंड यामध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रोजन व फॉस्फरस असते. तसेच सोयाबीन पेंड चा पीएच हा नुट्रल असतो.

 समुद्री शेवाळ

समुद्र शेवाळ मध्ये लोह आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. ज्या पिकांना पोटॅशची जास्त आवश्यक असते अशा पिकांसाठी समुद्र शेवटचा वापर केला जातो.

खनिज खाते

  •   ग्रीनसँड
  •  रॉक फॉस्फेट

ग्रीनसँड

  ग्रीनसँड हा ग्लुकोनाइट युक्त ऑलिव्ह हिरवा खडक आहे. ज्यामध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. हे झाडांच्या फुलांना आणि फळांना वाढीस मदत करते. तसेच माती मोकळी करते.

 रॉक फॉस्फेट

 फॉस्फेटचा वापर मातीची आंबटपणा वाढवण्यासाठी करतात.तसेच फॉस्फेटच्या वापरामुळे रोपांच्या वाढीस चालना मिळण्यास मदत होते.

 फॉस्फेट चे मुख्य स्रोत खडक आणि चिकणी माती आहे. 30% पेक्षा जास्त फॉस्फेट आणि ट्रेस मायक्रो न्यूट्रियंट्स असतात.

सेंद्रिय खतांचे फायदे आणि तोटे

सेंद्रिय खताचे फायदे

  •   जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण आणि पोषक द्रव्ये वाढविण्यास मदत करते.
  •  जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढविण्यास मदत करते.
  •  सेंद्रिय खतांचा वापर हा पर्यावरणास अनुकूल असल्यामुळे पाणी दूषित आणि जमिन प्रदूषण होत नाही.

 सेंद्रिय खतांचे तोटे

  • सेंद्रिय खताच्या परिणामकतेसाठी योग्य तापमान आणि पुरेसे पाणी आवश्यक असते.
  •  रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खतांचा परिणाम दिसून येण्यास जास्त कालावधी लागू शकतो.

Leave a Comment