युरोपियन देशात निर्यातीसाठी द्राक्ष बागेची नोंदणी अपेंडा च्या ग्रेपनेट वर करून घ्या.

द्राक्ष बागेची नोंदणी – द्राक्ष निर्याती करता युरोपियन युनियन व इतर देशांना रोगमुक्त व कीड त्याचप्रमाणे अंश हमी देण्यासाठी राज्यामध्ये 2004 पासून ग्रेप नेट प्रणाली द्वारे नोंदणी अपेडाच्या सहकार्याने करतात.

आज राज्यामध्ये अपेडाच्या सहकार्याने द्राक्ष निर्यातीच्या चालणेसाठी संपूर्ण राज्यामध्ये कीड व रोगमुक्त हमी त्याचप्रमाणे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी, ॲगमार्क प्रमाणीकरण तपासणी, फायटर सॅनिटरी प्रमाणिकरण,या सर्व गोष्टी ग्रेटनेट प्रणाली द्वारे अंमलबजावणी करतात.

        द्राक्ष उत्पादनामध्ये राज्यभरात नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. 31 डिसेंबर पर्यंत 2023-24 वर्षासाठी निर्यातक्षम शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे आणि विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ त्यांनी केले. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत द्राक्ष बागेच्या निर्यातीसाठी नोंदणी करून घेणे.
     
     31 हजार 811 निर्यात क्षम द्राक्ष बागेची नोंदणी 2022-23 मध्ये झाली आणि ही ग्रेपनेट प्रणाली द्वारे नोंदणी करतात.2004 पासून राज्यभरात द्राक्ष निर्यात करता युरोपियन युनियन आणि इतर देशांना कीड व रोगमुक्त उर्वरित अंश हमी देण्यासाठी नोंदणी करतात.
     44 हजार 600 द्राक्ष बागांची नोंदणी साठी 2023-24 मध्ये जिल्ह्यांना लक्षांक देण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना स्थानिक बाजारपेठेत निर्याती सोबतच किड व रोग मुक्त फळे व भाजीपाला उपलब्धतेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
     चालू वर्षामध्ये जिल्हास्तरीय कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापले आहे अपेडाच्या ग्रेट नेट प्रणाली मध्ये द्राक्ष बागांच्या नोंदणी युरोपमध्ये द्राक्ष बागांच्या निर्यातीसाठी आवश्यक असते

चालू वर्षी द्राक्ष बागांना खूप अडचणीचा सामना करावा लागला आहे यावर्षी मान्सूनोत्तर पाऊस त्याचप्रमाणे या हंगामात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि गारपीट अशा अनेक अडचणी आल्या त्यामुळे एक महिना द्राक्ष गोडी बहर छाटण्या लांबणीवर गेल्या त्यामुळे एकदम छाटणीचे काम आल्यामुळे अनेक ठिकाणी मजुरांची देखील टंचाई भासून आली
      त्यामुळे शेतकऱ्यांपुढे खूप आव्हाने होती या आव्हानांना शेतकऱ्यांनी सामोरे जात हा हंगाम मोठ्या कष्टाने उभा केला त्याचप्रमाणे गारपिटीमुळे निफाड तालुक्यात खूप नुकसान झाले त्यामुळे यावर्षी दिलेल्या लक्षांक पूर्ण होतो की कमी होतो हे पाहणे खूप अपेक्षित ठरले आहे
  

Leave a Comment