Dryland farming in India and its challenges,भारतातील कोरडवाहू शेती आणि आव्हाने,

Dryland farming in India and its challenges,भारतातील कोरडवाहू शेती आणि आव्हाने,कोरडवाहू शेतीची विविध वैशिष्ट्ये,कोरडवाहू शेतीचे प्रकार,कोरडवाहू शेतीचे महत्व,कोरडवाहू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी उपक्रम,कोरडवाहू शेतीचे प्रमुख प्रक्रिया.

कोरडवाहू शेती ही एक संकल्पना आहे  जी पाण्याची कमतरता आणि कमी पाऊस असलेल्या भागात पिकांची लागवड करण्याची पद्धत आहे.

शेतकरी मित्रांनो आज आपण कोरडवाहू शेती विषयी संपूर्ण माहिती घेत आहोत कोरडवाहू शेतीमध्ये कोणत्या प्रकारची पिके घेतली जाऊ शकतात, तसेच कोरडवाहू शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या उपाययोजना याविषयी आपण चर्चा करणार आहोत.

कोरडवाहू शेती म्हणजे काय

कोरडवाहू शेती म्हणजे अशी शेती पद्धती पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आणि पाण्याची उपलब्धता मर्यादित असते अशा शेतीस कोरडवाहू शेती म्हणतात. कोरडवाहू जमिनीला  जिरायती जमीन  सुद्धा म्हणतात. ओलावा नसलेल्या भागात यासाठी शेतकरी तंत्राचा आणि व्यवस्थापन पद्धतीचा वापर करतात. कोरडवाहू शेती ही बागायती शेतीच्या तुलनेत वेगळी असते.

कोरडवाहू पिकांची उदाहरणे

कोरडवाहू शेतीमध्ये घेतली जाणारी पिक हे कमी पाण्यात येणारे असतात उदाहरणार्थ, बाजरी, ज्वारी,गहू,कडधान्ये, सूर्यफूल आणि तेलबिया इत्यादी. अशा प्रकारची पिके पाण्याच्या कमतरतेतही पिक देऊ शकतात आणि अशा प्रकारचा अनुकूल वातावरणात उत्पादन देऊ शकतात.

कोरडवाहू शेतीची विविध वैशिष्ट्ये

  • कमी आणि अनियमित पाऊस
  • पिक अनुकूलन
  • माती ओलावा संवर्धन
  • पावसाच्या पाण्याचे साठवण
  • जोखीम व्यवस्थापन

कमी आणि अनियमित पाऊस: ज्या भागात सरासरी वार्षिक 750 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो अशा भागात कोरडवाहू शेती केली जाते

पीक अनुकूलन: ज्या पिकांना कमी ओलावा असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेता येतं अशीच पिके कोरडवाहू शेतीमध्ये घेतले जातात उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी,गहू, कडधान्य, हरभरा सूर्यफूल आणि तेलबिया.

माती ओलावा संवर्धन: मातीमध्ये ओलावा टिकून ठेवण्याच्या तंत्राला माती ओलावा संवर्धन असे म्हणतात. मातीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मल्चिंग, कमीत कमी मशागत आणि समोरच्या शेतीचा उपयोग केला जातो

पावसाच्या पाण्याचे साठवण: कोरडवाहू शेतीमध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे पावसाच्या पाण्याचे साठवण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवून ठेवणे गरजेचे आहे.

जोखीम व्यवस्थापन: कोरडवाहू शेतीमध्ये नैसर्गिक आपत्तींचा खूप सामना करावा लागतो. पाण्याचा ताण सहन करावा लागतो तसेच कोरडवाहू भागांमध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता असते. अशा या अडचणी लक्षात घेऊन जोखीम व्यवस्थापन करावे लागते.

कोरडवाहू शेतीचे प्रमुख प्रक्रिया

कोरडवाहू शेती करताना भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी जमिनीतील ओलावा टिकविणे यावर भर दिला पाहिजे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो

  • मशागत
  • मल्चिंग
  • समोच्च शेती 

मशागत: शेतीची मशागत करणे खूप गरजेचे असते. योग्य वेळेस शेतीची मशागत केल्यास पाणी व्यवस्थित मुरते, परिणामी जमिनीत पाणी साठवण्यास मदत होते. यानंतर जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी कमीत कमी मशागत पद्धतीने प्राधान्य दिले पाहिजे.

मल्चिंग: पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी मल्चिंग या पद्धतीचा वापर केला पाहिजे.सेंद्रिय पदार्थांचा वापर करून मातीचा पृष्ठभाग व्यवस्थित झाकून घेणे त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकण्यास मदत होईल.

समोच्च शेती: एक अशी शेती पद्धती आहे ज्यामध्ये पिकांना जमिनीच्या आतील बाजूने लागवड केली जाते त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होतो आणि पाणी जमिनीमध्ये मुरण्यास मदत होते. अशा पद्धतीच्या शेतीमुळे जमिनीत पाण्याचा ओलावा जास्त काळ टिकतो.

कोरडवाहू शेती मध्ये मातीला निरोगी ठेवणं आवश्यक आहे. यासाठी शेतकरी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात

  • सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थापन
  • धूप नियंत्रण

सेंद्रिय पदार्थाचे व्यवस्थापन: सेंद्रिय सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जमिनीत सुधारल्यास जमिनीची पाणी टिकून ठेवण्याची क्षमता सुधारते

धूप नियंत्रण: जमिनीची धूप रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे मातीचे वारा आणि पाण्यापासून दूर संरक्षण करता येते

कोरडवाहू शेतीचे प्रकार

कोरडवाहू शेती पद्धतीचे मुख्य  दोन प्रकार पडतात पारंपरिक शेती पद्धती  आणि आधुनिक  शेती पद्धती

कोरडवाहू शेतीचे महत्व

  • कोरडवाहू शेतीमध्ये बाजरी कडधान्य तेलबिया यांचे उत्पादन घेतले जाते
  • ग्रामीण भागातील लोकांना रोजगार आणि उत्पन्न वाढवण्यास मदत करते.
  • पौष्टिक आणि वैविध्यपूर्ण अन्नधान्याचे उत्पादन करते.
  • कोरडवाहू शेती पद्धतीमुळे पर्यावरणीय संतोष राखता येते.

कोरडवाहू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी उपक्रम

कोरडवाहू शेतीला अधिक बळकट करण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. त्या अनुषंगाने सरकारने विविध उपक्रम राबवत आहे.

  • नॅशनल रेनफेड एरिया ऑथॉरिटी (NRAA)
  • पाणलोट विकास कार्यक्रम
  • शेतकरी सक्षमीकरण

नॅशनल रेनफेड एरिया ऑथॉरिटी (NRAA): NRAA कोरडवाहू शेतीसाठी धोरणे आणि  अंमलबजावणीचे कार्य करते.

पाणलोट विकास कार्यक्रम: या कार्यक्रमांतर्गत ज्या भागात कोरडवाहू शेती केली जाते अश्या भागाला पाणलोट क्षेत्र करण्यावर उपाय योजना केल्या जातात.

शेतकरी सक्षमीकरण: शेतकरी सक्षमीकरण या कार्यक्रमांतर्गत कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. शेतकरी सक्षमीकरण प्रशिक्षण या उपक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना ज्ञान आणि कौशल्य शिकवून सक्षम केले जाते.

Leave a Comment