स्वायत्तपणे शेतामध्ये यंत्रमानव कसे कार्य करतो

शेतामध्ये यंत्रमानव कसे कार्य करतो, यांत्रिक शेती,Robotic farming,

आज आपण स्वायत्त यंत्रमानव शेतातील विविध कामे कशा प्रकारे करतो याची माहिती घेणार आहोत. शेतीतील कामे हे खूप मेहनतीची त्याचप्रमाणे धोकादायक असतात. त्यासाठी यंत्रमानव कशाप्रकारे काम करतो हे आपण लेखात पाहणार आहोत

शेतामध्ये यंत्रमानव कसे कार्य करतो, यांत्रिक शेती,Robotic farming:- यंत्रमानव Robot हा शेतातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतो आणि त्याप्रमाणे कार्य करतो. त्या यंत्रमानवाला स्वायत्त यंत्रमानव Autonomous Robot असे म्हणतात. कृषी क्षेत्रामध्ये हवामान जमीन पीक व व्यवस्थापन ह्या प्रणाली एकमेकांवर अवलंबून असतात. ह्या प्रणाली वेगळ्या आणि गुंतागुंतीच्या असल्यामुळे साहित्य यांच्यामुळे निर्माण करणे आपल्याला खूप अवघड होते. शेतामधील काम हे खूप अवघड आणि धोकादायक असल्यामुळे आपल्याला स्वायत यंत्रमानव निर्माण करणे आवश्यक आहे. स्वायत्त यंत्रमानव शेतातील कामे कशा प्रकारे करू शकतात, हे आपण खालील प्रमाणे पाहू शकतो.

शेतामधील विविध कामे करण्यासाठी स्वायत्त कृषी यंत्रमानव अनेक प्रक्रिया करतात.

  • निदृष्ट प्रणाली व सभोवतालच्या वातावरणाची माहिती गोळा करणे.
  • त्या माहितीचे पृथ:करण करणे.
  • त्याचप्रमाणे त्या माहितीचा योग्य ते निर्णय करणे.
  • त्याचप्रमाणे जो निर्णय घेतलाय त्याप्रमाणे काम करणे.
  • शेतातील काम हे चांगल्या प्रकारे त्याचप्रमाणे काटेकोरपणे करण्याच्या दृष्टीने त्या यंत्रमानवाचे आरेखन करतात.

शेतातील विविध प्रकारची कामे करण्यासाठी ज्या प्रणाली वापरल्या जातात त्यासाठी कृषी यंत्रमानव कशाप्रकारे काम करतो त्याची माहिती आपण घेऊ.

संगणक दृष्टी computer Vision

संगणक दृष्टी प्रणालीचा वापर हा शेतातील पिके कीटक तन व इतर वस्तू ओळखण्यासाठी व त्यातील फरक कोणता आहे. हे जाणून घेण्यासाठी यंत्रमानव कार्य करतात विविध संवेदकांचा वापर ही संगणक दृष्टी प्रणाली करते. त्या प्रणालीला धारणा व संवेदना असे म्हणतात. विविध प्रकारच्या प्रतिमा आज्ञावलीचा वापर संगणकाद्वारे गोळा केलेल्या माहितीचे निश्चित अवस्था जाणून घेण्यासाठी केला जातो त्यालाच विश्लेषण व प्रतीकरण असे म्हणतात.

अ) संवेदना व धारणा


यामध्ये विविध प्रकारची संवेदके ही शेतीतील विविध प्रकारची माहिती मिळवण्यासाठी बसवलेली असतात. त्यामध्ये माती आणि वातावरणाची देखील माहिती घेतात. त्यामध्ये तापमान आद्रता कॅमेरा आणि ओला मोजण्यासाठी विविध प्रकारची संवेदक वापरली जातात. अनेक प्रकारची संवेदके यंत्र मानवत गरजेप्रमाणे अंतर्भूत केलेले असतात. त्यामध्ये आवश्यक असतात विविध संवेदकाद्वारे गोळा केलेली माहिती ही यंत्रणेला पाठवले जातात.

ब) माहिती पृथक्करण व विश्लेषण


विविध संगणकीय आज्ञावली ह्या यंत्रमानवामध्ये असतात आणि त्या यंत्रमानवावरील माहितीचे विश्लेषण करणाऱ्या संवेदकंद्वारे मिळालेले असतात. मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रावर आधारित पद्मावत असतात. यंत्रमानव हा त्याच्या त्याच्यासमोरील शेतीतील घटक तन आहे,कीटक आहे का पिकाचाच भाग आहे याची ओळख पटवतात. कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग आज्ञावली या स्वतः काही गोष्टी शिकत असतात. संगणक दृष्टी प्रणालीस सतत प्रशिक्षित करतात.

उदा. रोगांचा प्रसार वनस्पती व पानांमध्ये होण्यापूर्वी दरवेळी आज्ञावली त्यांचे पॅटर्न लक्षात ठेवते आणि पुढच्या वेळेस रोगाची स्थितीत दिसतात.अचूकतेने त्याविरुद्ध काम करते म्हणजे ते त्यांच्या अनुभवातून प्रतिमा आणि स्थिती शिकते आणि त्यांना हव्या तर सुधारणा करते. त्यालाच मशीन लर्निंग असे म्हणतात. अशाप्रकारे संवेदक किंवा आज्ञावली एकत्रित रित्या यंत्रमानवास पिकाची घनता व मातीची स्थिती वनस्पती पिके अडथळे व त्या संबंधित वेगवेगळे घटक ओळखण्यास मदत करतात.

महत्त्वाचे निर्णय घेणे (Decision Making)


शेतामध्ये यंत्रमानव कसे कार्य करतो, यांत्रिक शेती,Robotic farming:- यंत्रमानव प्रणाली द्वारे व संवेदकद्वारे मिळालेल्या माहितीच्या पृथक्करण व विश्लेषण करते. यात विविध प्रकारची माहिती तयार होत असते. काम करण्यासाठी व आवश्यकते निर्णय घेण्यासाठी तयार होत असलेला माहितीचा व पॅटर्नचा उपयोग केला जातो. तो निर्णय घेण्यासाठी विविध प्रकारच्या संगणक आज्ञावली यंत्रमानावर स्थापित करतात.

स्थानिकीकरण व मॅपिंग


कृषी यंत्रमानव शेतात काम करण्यासाठी सतत फिरतो. फिरताना विविध प्रकारचे घटक शोधणे त्यासाठी योग्य ती स्थान व दिशा तयंत्रमानवास असणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी तया यंत्रमानवावर विविध प्रकारच्या प्रणाली स्थापित केलेले असतात. त्यासाठी जीपीएस किंवा इतर प्रणाली स्थापित असतात, त्याचा आढावा घेऊन यंत्रमानव आपलं लक्ष अचूक गाठू शकतो.

पथ नियोजन


शेतामध्ये विविध प्रकारच्या अडचण येऊ शकतात, अशा प्रकारचे अडथळे टाळून शेतामध्ये काटेकोरपणे फिरता आले पाहिजे. त्यामुळे त्या यंत्रमानवावर पतनियोजन प्रणाली स्थापित केलेली असते.

अन्य प्रणालीशी सुसंगतीकरण व एकीकरण


यंत्रमानव हा कृषी यंत्रे अवजारे व प्रणालीशी सुसंगत असणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळेच यंत्रमानव शेतीतील कामे स्वायत्तपणे करू शकतो. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या पाहिजे त्या प्रणाली स्थापित केलेले असते. हा यंत्रमानव सर्व प्रक्रिया स्वायत्तपणे व सुरक्षित पार पडतो.

माहिती पृथकरण आणि विश्लेषण


कृषी यंत्रमानव या नेत्याच्या कामादरम्यान गोळा केलेल्या माहि तिचे  तात्काळ व साहित्य पणे अंमलबजावणीसाठी वापरत नाही तर नंतर विश्लेषणासाठी संग्रहित करतात त्या विश्लेषणांमधून शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती मिळते त्यामधून त्यांना पिकांची वाढ आरोग्य व अन्य प्रकारची माहिती मिळते भविष्यामध्ये त्यांना त्या माहितीचा खूप उपयोग होऊ शकतो

शेतामध्ये यंत्रमानव कसे कार्य करतो, यांत्रिक शेती,Robotic farming

Leave a Comment