Fungiculture farming in India,भारतातील मशरूम शेती

Fungiculture farming in India,भारतातील मशरूम शेती,मशरूमचे पौष्टिक मूल्य,भारतात मशरूमची लागवड,मशरूमची विविध प्रकार,मशरूम वाण आणि जात,बटन मशरूम लागवड प्रक्रिया.

Fungiculture farming in India,भारतातील मशरूम शेती

भारतातील फायदेशीर कृषी व्यवसायापैकी मशरूम शेती हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. जो तुम्ही कमी जागेत सुरू करू शकता आणि या व्यवसायाला भांडवल ही खूप कमी गुंतवावे लागते. भारतातील लोकांनी मशरूमच्या शेतीला उत्पन्नाचा पर्यायी स्रोत न पाहता मुख्य व्यवसाय या दृष्टिकोनातून व्यवसाय केला पाहिजे. भारतामध्ये उत्तर प्रदेश, त्रिपुरा, केरळ या राज्यांमध्ये मशरूम उत्पादन चांगल्या प्रकारे घेतले जातात

 हंगामी व पर्यावरण नियंत्रित म्हणून भारतात बटन मशरूम चे पीक घेतले जाते. व्हाईट मशरूमला वाढीसाठी 20 ते 280 सेल्सिअस आणि पुनरुत्पादक वाढीसाठी 12 ते 180 सेल्सिअस एवढे तापमान आवश्यक असते. तसेच पीक घेण्यासाठी 80 90% आद्रता आणि पुरेसा ऑक्सिजनची आवश्यकता असते. मशरूमचे पीक हे वर्षातून 8 ते 10 महिने हिवाळ्याच्या हंगामात टेकड्यांवर घेतले जात होते. परंतु आता आधुनिक संसाधनाचा वापर करून मशरूमची लागवड भारतात कोठेही करणे शक्य झाले आहे. मशरूम चे उत्पादन चांगल्या प्रमाणात घ्यायचे असल्यास कीड आणि रोगजनकांचा प्रादुर्भाव रोखला पाहिजे. यासाठी मशरूमची अंडी शुद्ध गुणवत्तेची असावीत.

 

 मशरूमचे पौष्टिक मूल्य

 • फळे आणि भाजप पेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने असतात.
 •  मशरूम मध्ये विटामिन बी, विटामिन सी, विटामिन डी, निकोटिनिक ऍसिड, थायमीन,रिबोफ्लेवीन यासारखे जीवनसत्वे असतात
 • पोटॅशियम, लोह, फॉलिक ऍसिड यासारखे घटक उपलब्ध असतात.

 

 भारतात मशरूमची लागवड

 भारतामध्ये मशरूमची शेती हे दोन  गट पडतात.

 •  हंगामी  शेतकरी
 •  व्यवसायिक शेतकरी

 हंगामी शेतकरी हे शेतकरी मशरूमचे उत्पादन हे अल्प प्रमाणात घेतात व हंगामी तत्वावर  घेतात.

व्यवसायिक शेतकरी व्यावसायिक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात आणि वर्षभर उत्पादन सुरू ठेवतात.

 व्यावसायिक मशरूम शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो,यामध्ये बांधकाम,आधुनिक यंत्र आणि उपकरणे खरेदी करणे, कच्चा माल, विज आणि मजुरी यावर मोठा खर्च होतो.

 मशरूमची शेती करण्यासाठी प्रशिक्षण घेणे खूप गरजेचे आहे.

 भारतामध्ये मशरूम लागवडीला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देत असते.

 राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ अश्या योजनेमार्फत मशरूमची लागवड प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान दिले जाते.

 मशरूम शेती लागवड करण्याआधी खालील गोष्टींची उपाययोजना करून घेणे गरजेचे आहे

 •  पाण्याची उपलब्धता.
 •  कच्च्या मालाची उपलब्धता.
 •  मशरूम शेती प्रकल्प घराजवळ असावे.
 •  रोजच्या कामासाठी लागणाऱ्या मजुरांची मजुरी कमी असावी.
 •  मशरूमच्या शेतीमध्ये खूप सारे विजेवर चालणारे उपकरणे आणि आधुनिक यंत्रे बसवलेले असतात. त्यामुळे विजेची उपलब्धता आणि वीजदर याचा विचार केला पाहिजे.
 •  पाण्याच्या उपलब्धतेसाठी असणे आवश्यक आहे.
 •  सांडपाण्याची योग्य विल्हेवाट  करणे आवश्यक आहे.
 •  भविष्यासाठी वाढत्या शेतीच्या जागेची नियोजन गरजेचे आहे.

 

 मशरूमची विविध प्रकार

जगभरामध्ये मशरूमचे खूपसारे वेगवेगळे वाण उपलब्ध आहेत. त्यापैकी काही निवडकच मशरूमची लागवड भारतात केले जाते.

 1. बटन मशरूम
 2. पोर्टोबेलो मशरूम
 3. ऑयस्टर मशरूम
 4. पॅडी स्ट्रॉ मशरूम

मित्रांनो भारतामध्ये व्हाईट बटन मशरूम ला जास्त मागणी आहे. त्यामुळे भारतातील बहुतेक शेतकरी बटन मशरूम जातीची निवड करतात.

 मशरूम वाण आणि जात

भारतामध्ये प्रामुख्याने दोन मशरूमचे प्रकार आहेत. उटी 1 आणि उटी(BM)2. मशरूमच्या लागवडीसाठी भारतात प्रामुख्याने S11, TM 79,आणि Horst H3 या जातीची लागवड केली जाते.

 बटन मशरूम लागवड प्रक्रिया

Agaricus bisporus ही जात बटण मशरूम लागवडी साठी निवडले जाते. कारण ही प्रजाती उत्पादनच्या बाबतीत खात्रीशीर आहे.

भारतामध्ये ऑक्टोबर ते मार्च हा हंगाम मशरून लागवडीसाठी उत्तम आहे.