अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर करा नियोजित शेतीसाठी




पारंपारिक ऊर्जा स्रोत, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत, सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे, सौर पंप, सोलर टनेल ड्रायर, सोलर चूल, सोलर कॅबिनेट ड्रायर, PDKV सोलार लाईट इंसेक्ट ट्रॅप, सौर दिवे, non-conventional energy sources for planned agriculture. पारंपरिक ऊर्जास्रोत संपले तर काय होईल?


नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर नियोजित शेतीसाठी कसा करता येईल आणि शेतीला फायदा काय होईल मित्रांनो ऊर्जा स्रोतांचे मुख्यतः दोन प्रकार पडतात

  • पारंपारिक ऊर्जा स्रोत
  • अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत

Table of Contents

अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर करा नियोजित शेतीसाठी

पारंपारिक ऊर्जास्रोत म्हणजे काय?

पारंपारिक ऊर्जा स्रोत म्हणजे असे ऊर्जाचे स्रोत जे ऊर्जा स्त्रोत एकदा संपले की ते विशिष्ट कालावधीमध्ये भरून निघत नाहीत किंवा त्यांचा साठा संपतो परंतु ते आपल्याला निसर्गाकडून मिळाले असतात अशा स्रोतांना पारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणतात पारंपरिक ऊर्जा स्रोत हे घातक ऊर्जा स्त्रोत असतात तसेच ते घातक उत्सर्जन हे करतात त्याचा परिणाम सजीवांसोबतच पृथ्वीवरच्या वातावरणावर होताना दिसून येतो तसेच सजीवांच्या आरोग्याच्या स्थिती वरही विपरीत परिणाम दिसून येतो.

पारंपारिक ऊर्जा स्रोत कोणत? पारंपरिक ऊर्जास्रोत संपले तर काय होईल?

पारंपरिक ऊर्जास्रोत संपले तर काय होईल? बऱ्याच काळापासून आपण पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करत आलो आहोत आपण ज्या प्रमाणामध्ये पारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरतो त्या वापराच्या दरामध्ये ते तेवढे निर्माण होऊन साठे भरत नाहीत त्यामुळे हे पारंपारिक ऊर्जा स्रोत दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत

पारंपारिक ऊर्जा स्त्रोत खालील प्रमाणे आहेत

  • दगडी कोळसा
  • खनिज तेल
  • नैसर्गिक वायू

हे वरील ऊर्जा स्रोत प्रदूषणकारी आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात वापराने प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे कारण हे स्रोत मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जित करतात.

अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणजे काय

पवन लहान जल भरती भूऔष्णिक उष्णता आणि बायोमास वापरून निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे अपारंपारिक ऊर्जा अपारंपारिक ऊर्जा स्रोत हे कधीही न संपणारे ऊर्जा स्त्रोत असतात त्यामुळे त्यामुळे आपण ऊर्जा स्रोतांचा किती ही वापर केला तरी ते संपणारे नाहीत. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे पर्यावरण पूरक असतात ते कुठल्याही प्रकारचे प्रदूषण करत नाहीत. अपारंपारिक ऊर्जा ही संसाधने इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात की त्याला कोणतीही सीमा नाही

अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत खालील प्रमाणे आहेत

  • सौर ऊर्जा
  • पवन ऊर्जा
  • जल ऊर्जा( सागरी लाटांचे ऊर्जा)
  • तरंग ऊर्जा
  • जैव ऊर्जा
  • भूगर्भातील उष्णता


हे सर्व ऊर्जा सह सर्व ऊर्जा स्त्रोत अपारंपारिक ऊर्जा स्रोत मध्ये येतात या कधीही न संपणाऱ्या ऊर्जा स्रोत आहेत

शेतकरी मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपल्या शेतीशी निगडित असणाऱ्या उर्जे बद्दल माहिती घेणार आहोत.
सौर ऊर्जा या ऊर्जेचा वापर आपण शेतीमध्ये आपल्या शेतीला नियोजित शेती/ प्रगतशील शेतीकडे वळवण्यास मदत होऊ शकते.

सौर ऊर्जेचा नियोजित शेतीमध्ये वापर…

शेती म्हटलं की विज आलीच कारण शेतीसाठी वीज पुरवठा खूप महत्त्वाचा आहे जर वीज खंडित झाली तर शेतकऱ्यांना खूप नुकसान सहन करावे लागते याच यात समस्येला तोंड देण्यासाठी आपण सौर ऊर्जेचा वापर करून आपली शेती समृद्ध व नियोजित पद्धतीने विकसित केली पाहिजे म्हणूनच आज आपण या लेखांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून नियोजित शेती कशी करता येईल याच्याकडे आपण भर देणार आहोत

सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे

  • सौर पंप
  • सोलर टनेल ड्रायर
  • सोलर चूल
  • सोलर कॅबिनेट ड्रायर
  • PDKV सोलार लाईट इंसेक्ट ट्रॅप
  • सौर दिवे

अशा प्रकारचे उपकरण बाजारपेठेत उपलब्ध आहेत
आज आपण फक्त शेती निगडित असणाऱ्याच उपकरणे विषयी माहिती जाणून घेणार आहोत

सौर पंप

जसे की आपण वरती पाहिल्याप्रमाणे सौर ऊर्जेचा वापर करून आपण आपल्या समस्या सोडवू शकतो कारण शेतीसाठी विजेची गरज अत्यंत गरज असते कारण विजय शिवाय शेती करणं खूपच अवघड आहे शेतीत लागणारे सर्वच्या सर्व उपकरणे हे विजेवर चालत असतात जर काही कारणास्तव विज खंडित झाली तर मात्र शेतकऱ्यांना खूप मोठ नुकसान खूप होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परस्थिती डगमगते.
मित्रांनो हा एक खूप छान असा पर्याय आहे विजेवर चालणारे पंपाला कारण यासाठी आपल्याला महावितरणाच्या विजेवरच्या अवलंबून राहावं लागत नाही आता हल्ली सोलर पंप चा वापर वाढलेला आहे परंतु सोलार पंप जर वैयक्तिक खर्चाने बसवायचा असेल तर तो आवाक्याच्या बाहेर आहे यासाठी सरकारने अनुदान च्या स्वरूपामध्ये सोलर पंप उपलब्ध करून दिले आहे.

विजेवर चालणारे पंप पीएम कुसुम योजनासाठी सविस्तर माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन माहिती घेऊ शकता
पीएम कुसुम योजना 2023

ही एक अशी योजना आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना आणि व्यवसायिकांनाही अनुदाना मार्फत कृषी पंप आणि सोलर पॅनल उपलब्ध करून देत आहे याच्याद्वारे तुम्ही तुमच्या शेतीचे उत्पादन वाढवू शकता तसेच व्यावसायिक म्हणून सुद्धा तुम्ही मोठ्या प्रकल्प उभारणी करू शकता

सोलर टनेल ड्रायर

मित्रांनो सोलर टनेल ड्रायर हे एक हे एक उपकरण आहे जे की आपल्या शेतातील भाजीपाला फळे वाळविण्यासाठी वापर केला जातो सोलर टनेल ड्रायर याच्या नावामध्ये नावाप्रमाणे सौर ऊर्जेचा वापर करून भाज्या,फळे,अन्नपदार्थ, कमी वेळामध्ये वाळविण्यासाठी उपयोग केला जातो.


मित्रांनो माझ्या मते, सोलर टनेल ड्रायर द्राक्ष पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा फायदाच ठरू शकतो. कारण बहुतांश शेतकरी त्यांचे जे द्राक्ष आहे बाजारामध्ये न विकता ते वाळवून त्याच्यापासून मनुके तयार करतात साहजिक आहे द्राक्षाच्या तुलनेमध्ये मनुक्यांना जास्त भाव भेटतो परंतु द्राक्षांपासून मनुके तयार करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे अशा काळात अवकाळी पाऊस आला निसर्गाने साथ दिली नाही किंवा ज्या ठिकाणी आपण ते वाळवणार आहोत त्या ठिकाणी जर व्यवस्थित व्यवस्था नसेल तर मात्र नुकसान होण्याचे संभावना जास्त राहते अशा माझ्या शेतकरी मित्रांना सोलर टनेल ड्रायर हा खूप वरदान ठरू शकतो

या सोलर टनेल ड्रायर मध्ये हळद, मिरची, आवळा कॅन्डी, बटाटा चिप्स, हिरव्या पालेभाज्या, द्राक्षे, तसेच अन्नपदार्थ जसे की पापड,कुरडया, सांडगे, शेवाळ्या, वाळविता येऊ शकतात या यंत्राची वाळविण्याची क्षमता शंभर किलो एवढी आहे

सोलर टनेल ड्रायर संरचना

  • सोलर टनेल ड्रायर हे अर्ध दंडगोलाकार तीन गुणिले सहा मीटर आकाराचा असतो याची उंची दोन मीटर असते
  • 25 मिलिमीटर आकाराचे लोखंडी पाईप अर्धगोलाकार आकारात वाकून सोलर टनेल ड्रायर तयार केला जातो
  • जमिनीलगतचा जो पृष्ठभाग असतो तो सिमेंट काँक्रीटचा बनलेला असतो त्यावर काळा रंग दिला जातो
  • कारण काळा रंग सूर्यकिरणातील जास्त उष्णता शोषून घेतो त्यामुळे आतील तापमान वाढते
  • सोलर नेल ड्रायरच्या आतून उत्तर दिशेला नॉर्थ वॉल बसलेला असतो
  • अल्ट्राव्हायोलेट पॉलिथिन फिल्म (200 मायक्रोन जाडी) अर्धगोलाकार
  • सोलर टनेल ड्रायर मध्ये दिवसा तापमानात बरीच वाढ होते कारण त्याच्या रचनेमुळे ग्रीन हाऊस इफेक्ट तयार होतो
  • सोलर टनेल ड्रायर च्या आतील तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा 15 ते 20 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असते आणि भर दुपारी हे तापमान 60 ते 65 अंश सेल्सिअस पर्यंत आरामात पोहोचते
  • अशाप्रकारे आपण सोलर टनेल ड्रायर वापरून वाढवलेल्या तापमानाचा उपयोग धन्यवाद भाजीपाला फळे अन्नधान्य वाळविण्यासाठी करता येतो
  • ही प्रोसेस पूर्णतः नॅचरल असल्यामुळे पदार्थावर कोणताही परिणाम होत नाही
  • कारण ड्रायरमध्ये अतिनील किरणे आज शिरत नाहीत त्यामुळे पदार्थाची चव रंग व गुणवत्ता
  • ड्रायर मधील गरम हवा आणि सूर्याची किरणे त्यामुळे पदार्थाचे आद्रता लवकरात लवकर कमी होते आणि परिणामी पदार्थ लवकर वाळतात
  • बाहेर सुकवलेल्या तुलनेत कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गवतेचे पदार्थ प्राप्त होतात

सोलर टनेल ड्रायर चे वैशिष्ट्ये

  • अत्यंत कमी खर्चामध्ये तयार करता येतो
  • आपल्या जवळ असलेल्या उपलब्ध साहित्यातून तयार करता येतो
  • उच्च गुणवत्तेचे पदार्थ मिळतात
  • पदार्थ जास्त काळ टिकण्यास मदत होत
  • आपल्या वापराप्रमाणे त्याची हवे तेवढी मोठी किंवा छोटी संरचना करता येते
  • कमी कालावधीमध्ये पदार्थ बाजारात येण्याचं उपलब्ध होतात.

3) सोलार चूल

मित्रांनो सोलार चूल ही आपल्याला वाढत्या महागाईच्या काळात आपल्या खिशाला थोडासा दिलासा देऊ शकते सोलर चुलीमध्ये आपण अन्न शिजवू शकतो पाणी गरम करू शकतो गरम पेय तयार करू शकतो अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या कामासाठी सोलार चुलीचा वापर करू शकतो आणि निश्चित रूपाने आपला थोडासा खर्च कमी करू शकतो तसेच सोलर चुल हे अत्यंत पर्यावरण पर्यावरण पूरक आहे तिच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रदूषण होत नाही

4) सोलर कॅबिनेट ड्रायर

शेतकरी मित्रांनो सोलर कॅबिनेट ड्रायर नावाप्रमाणेच आपल्याला पदार्थ वाळवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो हे सध्या सूर्यप्रकाशावरतीच चालणारे उपकरण आहे आपण या उपकरणाद्वारे शेतीमाल वाळवू शकतो. या उपकरणांमध्ये उष्णता संग्रहक यंत्रणेचा समावेश केलेला आहे

  • या उपकरणाचा उपयोग जेव्हा सूर्यप्रकाश असेल तेव्हाच करता येतो म्हणजे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत
  • दिवसभरामध्ये आपण फक्त सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत म्हणजे फक्त आठ तासापर्यंतच या उपकरणाचा वापर करता येतो
  • या उपकरणाला संध्याकाळी ही वापर करता यावा यावा यासाठी यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये सोलार कॅबिनेट ड्रायव्हरची निर्मिती करण्यात आली विद्यापीठातर्फे करण्यात आलेल्या संशोधनां मध्ये शेतीमाल वाढवण्यासाठी अतिरिक्त अवधी मिळावा यासाठी उष्णता संग्रहक यंत्रणेचा समावेश केला आहे
  • उष्णता संग्रह यंत्रणेमुळे दिवसाच्या शेवटी मिळणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाने सोलर एअर हिटर मधील थंड हवा गरम केली जाते त्यात बसविलेले ॲल्युमिनियम शीट आणि खाली भरलेले गिट्टी व लोखंडी चुरा सुद्धा गरम होतो अशाप्रकारे गिट्टी आणि लोखंडी चुरामध्ये उष्णता साठवून ठेवले जाते
  • जेव्हा सूर्य मावळतो किंवा सूर्याची तीव्रता कमी होते तेव्हा त्यामधील गरम हवा बाहेरच्या कॅबिनेटमध्ये सोडले जाते
  • नंतर सोडलेली गरम हवा साधारणतः दोन तास पदार्थ वाढविण्यासाठी आपला मदत होते
  • अशा पद्धतीने आपण पदार्थ वाढविण्यासाठी वेळेची बचत करू शकतो
  • ही संपूर्ण प्रोसेस पूर्णतः नॅचरल असल्यामुळे पदार्थाच्या गुणवत्तेमध्ये चवीमध्ये आणि रंगांमध्ये कसलाही फरक पडत नाही परिणामी पदार्थ उच्च प्रतीचे मिळतात

सोलर कॅबिनेट ड्रायर वैशिष्ट्ये

  • विविध संरचनेमध्ये सोलर कॅबिनेट ड्रायर बाजारामध्ये उपलब्ध आहेत
  • उष्णता संग्रह यंत्रणेचा वापर केला केला आहे
  • पदार्थ वाढविण्यासाठी दोन तास अवधी जास्त मिळतो
  • पारंपरिक पद्धतीच्या तुलनेने मालाची गुणवत्ता चांगल्या प्रतीची मिळते
  • शेतमालाला वाळविण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होते.

5) PDKV सोलार लाईट इंसेक्ट ट्रॅप (PDKV- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ)

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सोलर सोलर ऊर्जेचा वापर करून कीटक व्यवस्थापनासाठी एक सौर ऊर्जेवर चालणारे स्वयंचलित उपकरण तयार केले आहे ज्याचं नाव आहे PDKV सोलर लाईट इनसेक्ट ट्रॅप.
या उपकरणाचे कार्य करण्याची पद्धती अगदी सोपे आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी फायद्याची खूप मोठी आहे कारण प्रत्येक शेतकरी हा शेतकरी हा कीटक व्यवस्थापनासाठी रात्रंदिवस झगडत असतो कारण हे कीटक पिकावरती रोग आणण्याचं काम करतात परिणामी उत्पन्न कमी होते आणि शेतकऱ्याच्या पदरी मात्र निराशाच पडते. याच त्रासाचा अभ्यास करून विद्यापीठाने हे उपकरण तयार केले आहे.

PDKV सोलार लाईट इंसेक्ट ट्रॅप संरचना

  • या उपकरणांमध्ये एक सोलर पॅनल, रिचार्जेबल लीड ऍसिड बॅटरी, बल्ब, लोखंडी स्टॅन्ड, अर्ध गोलाकार दोन, प्लास्टिकचे ट्रे इत्यादी भाग असतात.
  • या उपकरणाची बॅटरी सूर्यप्रकाशावर चालणाऱ्या सौर पॅनल वरती चार्जिंग केले जाते.
  • या यंत्रामधून निघणारा प्रकाश किडींना आकर्षित करतो हा किडे ने फसवण्यासाठी केलेला एक ट्रॅप आह

अशाप्रकारे ट्रॅप चा उपयोग कीटक व्यवस्थापनावर केला जातो

सोलार लाईट इंसेक्ट ट्रॅप वैशिष्ट्ये

  • सौर उपकरण पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालणारे यंत्र आहे.
  • विजेची आणि वेळेची बचत होते
  • हा ट्रॅप पूर्णतः स्वयंचलित आहे
  • प्रभावशाली कीड व्यवस्थापनासाठी उपयोगी ठरते
  • दोन एकर क्षेत्रामध्ये एकच ट्रॅपची आवश्यकता लागते
  • ट्रॅप ची उंची आपल्या पिकनुसार दहा फुटापर्यंत ठेवता येते
  • हा ट्रॅप बागेत, फळबागेत,शेडनेट, पॉलिहाऊस मध्ये वापरता येतो

PDKV सोलार लाईट इंसेक्ट ट्रॅप व्यवस्थापन

  • पिकाच्या मधोमध हा ट्रॅप ठेवावाट्रॅप ची उंची पिकापेक्षा एक ते दोन फूट उंच असावी
  • ट्रॅप शेतात ठेवण्या अगोदर चालू करून ठेवावा
  • ट्रॅपच्या कीटक भांड्यामध्ये चार ते पाच लिटर पाणी ओतून त्यात दहा ते पंधरा मिली रॉकेल मिसळावे
  • दुसऱ्या दिवशी मेरी लकी टक बाहेर काढून स्वच्छ करून पुन्हा पाणी भरूनठेवावे तसेच सोलर पॅनलचे ही वेळोवेळी स्वच्छता करावी
  • ट्रॅप चे काम झाल्यानंतर व्यवस्थित बंद करून ठेवावे
  • जास्त कालावधीसाठी जर बंद असेल तर वेळ अधून मधून चार्जिंग करून ठेवावी जेणेकरून बॅटरी जास्त काळ टिकेल

6) सौर दिवे

शेतकरी मित्रांनो आपण वरती पाहिल्याप्रमाणे सोलर दिवे ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात कारण शेतकरी वर्ग हा खूप कष्टाळू असतो तो स्वतःच्या जीवाची परवा न करता रात्री अंधारामध्ये शेतीत राबवत असतो अशा वेळेस त्याच्याजवळ जर प्रकाशाचा साधन नसेल तर मात्र अडचणी निर्माण होतात
अशा संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांकडे सौरदिव्य असणे गरजेचे आहे असे सौर दिवे तो त्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी लावू शकतो जसे की विहीर. हे दिवे दिवसभर सूर्याच्या प्रकाशामध्ये चार्ज होतात आणि संध्याकाळी आपल्या प्रकाश येतात.



नमस्कार शेतकरी मित्रांनो हा लेख पूर्ण वाचला असेल अशी अपेक्षा करतो आणि अपारंपारिक ऊर्जांचा उपयोग शेतीत कसा करता येईल याचे विषय आपण संपूर्ण माहिती बघितली आहे अशाच नवीन नवीन माहितीसाठी वाचत रहा किसान सरकारी योजना .कॉम आणि माहिती आवडली असेल तर मित्रांना फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल तसेच आणखीन माहितीसाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता धन्यवाद, भेटू नवीन लेखांमध्ये नवीन मुद्द्यासोबत….

हे ही वाचा कृषि शेत्रातील रोजगार संधी

1 thought on “अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर करा नियोजित शेतीसाठी”

Leave a Comment