वाढते तापमान आणि द्राक्ष बागेतील उपायोजना.

वाढते तापमान आणि द्राक्ष बागेतील उपायोजना, वाढत्या तापमानात जुन्या द्राक्ष बागेतील व्यवस्थापन, बागेतील झालेली लवकर छाटणी आणि व्यवस्थापन, बागेत झालेले नुकतीच छाटणी आणि व्यवस्थापन ॲण्टिस्ट्रेसचा महत्त्वाचा वापर, कॅनॉपी चे महत्वाचे संतुलन, बागेतील वाढ खुंटण्याची समस्या Grapes farming, Rising temperatures and countermeasures in the vineyard.Vineyard and its management in rising temperature. , Grape crop

Grape crop : गेल्या आठवड्यातील तापमान विचारात घेता खूप तितका आणि तापमान हे 35 अंश सेल्सियस पेक्षा जास्त वाढलेले दिसेल तर आदर्श प्रमाण सुद्धा खूप कमी झालेले आहे . द्राक्ष बागेत यावेळी त्याच्या विविध अवस्था दिसून येतील पण येणाऱ्या आठवड्यांमध्ये वाढते तापमान आणि त्यावरील संभाव्य उपाययोजना याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत

आपण सविस्तर माहिती घेणार आहोत

अ) बागेतील झालेली लवकर छाटणी आणि व्यवस्थापन

  • 1) ॲण्टिस्ट्रेसचा महत्त्वाचा वापर
  • 2)बोदावर मल्चिंग करणे
  • 3)कॅनॉपी चे महत्वाचे संतुलन

ब) बागेत झालेले नुकतीच छाटणी आणि व्यवस्थापन

  • 1) त्वरित फेलफुटी काढून घ्यावी
  • 2) वाढीचे नियंत्रण महत्त्वाचे
  • 3) महत्त्वाचे रोग नियंत्रण
  • 4) बागेतील वाढ खुंटण्याची समस्या

हे सुद्धा वाचा द्राक्ष शेती व्यवस्थापन आणि उपाययोजना

अ) बागेतील झालेली लवकर छाटणी आणि व्यवस्थापन

जुलै आणि ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या फळ छाटणी बागेत येणारा वेळेत मनी सेटिंग मुळे द्राक्षमण्यांचा आकार 8 ते 10 मिनिटे पर्यंत होईल. यावेळी वाढलेले तापमान मण्यांच्या विकासाकरता पोषक ठरेल घडांचा विकास जास्त चांगल्या प्रकारे होण्याची शक्यता असेल कॅनॉपी आणि बागेतील पाणी यांचा ताळमेळ वाढता तापमानाचा विचार करता द्राक्ष वेलीत बसवणे गरजेचे राहिल

तापमान वाढीमुळे पानातून होणारे बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्याच प्रमाणे पाण्याची गरज देखील जमिनीतून वाढेल हलकी जमीन किंवा ज्या बागेत पाणी कमी आहे त्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते कारण तिथे मातीच्या कणांची संख्या कमी असते म्हणून त्या ठिकाणी जे पाणी उपलब्ध आहे आणि वेलींची गरज यातील समतोल बिघडतो अशा परिस्थितीत खालील उपाय योजना महत्त्वाचा ठरू शकतील

1) ॲण्टिस्ट्रेसचा महत्त्वाचा वापर

तापमान वाढीमुळे पानातील बाष्पीभवनामुळे पाणी निघून जाईल आणि जमिनीतून पाण्याची गरज वाढेल याचा समतोल न राखल्यास मण्यांचा आकार कमी होईल आणि द्राक्षात लवकर गोड येईल म्हणून ॲण्टिस्ट्रेस ची फवारणी आणि 2 ते 3 प्रति लिटर पाणी वेलीच्या वाढीच्या अवस्थेनुसार करता येईल.


2)बोदावर मल्चिंग करणे

मल्चिंग मुळे बोदा मध्ये ठिबक द्वारे दिलेले पाणी तसेच साठवून राहील व बाष्पीभवन होणार नाही त्याचप्रमाणे बोदातील मुलीचा चांगला विकास होऊन पांढऱ्या मूळची उत्पत्ती देखील तितकाच प्रमाणात होऊ शकते

बागेत महत्त्वाचा वेळ म्हणजे पाणी देण्याचा राहील वाढता तापमानात पाणी हे सकाळी व सायंकाळी दिल्यास कमी पाण्यात वेलीची गरज पूर्ण होईल यासाठी ड्रीप लाईन असली पाहिजे जेणेकरून पाणी पाहिजे त्याच ठिकाणी पोहोचेल इकडे तिकडे जाणार नाही जास्त तापमानात वाऱ्याचा वेग देखील वाढतो


3)कॅनॉपी चे महत्वाचे संतुलन

सध्याच्या स्थितीत ज्या बागेमध्ये कमी पाणी आहे त्यांना येणाऱ्या काळात पाण्याची समस्या जाणवेल अशा काळात महत्त्वाचे म्हणजे कॅनॉपीचे संतुलन आहे शिल्लक पाणी पाहून कॅनोपी आणि घडांची संख्या निश्चित करावी उदा. 10टक्के कॅनॉपी ही 25 टक्के पाणी कमी असल्यास करावी


ब) बागेत झालेले नुकतीच छाटणी आणि व्यवस्थापन

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या बागांमध्ये फळ छाटणी झाली असावी काही ठिकाणी बागेत घड निघून फेलफुटी काढण्याची अवस्था असेल तर काही ठिकाणी प्रीब्लूम ते फुलरा अवस्था असेल कॅनोपी चे व्यवस्थापन हे फेलफुटीच्या बागेत फार महत्त्वाचे असते

दर वर्षी बागेत घड कुजने किंवा डाऊनी मिलड्यू मुळे बागेतील पिकांचे नुकसान होते अशी चर्चा होते बागेत आद्रता कमी असते कारण दिवसाचे तापमान वाढले आहे येत्या आठवड्यात पावसाची शक्‍यता नसल्याने बागेतील आद्रता वाढू शकते तरी पण बऱ्याच ठिकाणी दवा पडून पाणी ओले झालेले दिसतात

दव हे जास्त प्रमाणात असले आणि ते जास्त काळ टिकून राहिले तर ते पानावरून घसरून पडते अशावेळी पानावरून पडलेले पाणी प्रीब्लूम अवस्थेत असलेल्या घडात साचल्यास घड कुजण्याची समस्या होऊ शकते

डाऊनी मिल्ड्यू चे बीजाणू जर पूर्वीचेच बागेत उपलब्ध असल्यास जर दव वाढले तर त्याचा प्रसार घडापर्यंत सहज शक्य होईल या वातावरणात वेलीची वाढ देखील चांगल्या प्रमाणात होऊ शकते हे अनुभवास येईल कॅनॉपी ही प्रीब्लूम अवस्थेत जास्त प्रमाणात दिसेल


त्यासाठी पुढील प्रमाणे उपाय योजना महत्त्वाच्या ठरतील


1) त्वरित फेलफुटी काढून घ्यावी

हवे तेवढे घर ठेवून बाकीचे घर काढून टाकावेत घडाच्या तळातील दोन-तीन पाणी काढून घ्यावीत त्यामुळे रोगाचा प्रसार कमी होईल कारण कॅनोपीत आद्रतेचे प्रमाण कमी होईल फवारणीमुळे रोग नियंत्रण चांगले होईल


2) वाढीचे नियंत्रण महत्त्वाचे

यावेळी वाढीचे नियंत्रण महत्त्वाचे असते त्यासाठी पालायुक्त खताचा वापर आपण करू शकतो 0:40:37 हे 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे 2ते3 फवारण्या तीन दिवसाच्या अंतराने कराव्यात ठिबक द्वारे 0:90:46 एक किलो प्रति एकर प्रति दिवस प्रमाणे 4ते5 दिवस उपलब्ध करावेत वेलीची वाढ लक्षात घेऊन खतांची उपलब्धता कमी जास्त करता येते


3) महत्त्वाचे रोग नियंत्रण

वेलीची पाणी ओले असतील अशा परिस्थितीत बुरशीनाशकांची फवारणी द्रावण पानावरून लवकर निघेल आणि परिणाम नाही मिळणार त्यामुळे पाणी सुकल्यानंतर स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी आधी करावी आणि नंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करावी पाणी ओले असताना जैविक नियंत्रणाचे वापर करणे गरजेचे असते त्यासाठी मांजरी वाईनगार्ड 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे 3 दिवसाच्या अंतराने 3ते4 फवारण्या करून रोग नियंत्रण सोपे होईल झिंक आणि बोरॉन अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी


4) बागेतील वाढ खुंटण्याची समस्या

खूप प्रकारच्या बागेत प्रीब्लूम आणि नवीन पुटी निघत असताना वाडा अचानक थांबते किंवा वाढ कोमजलेली परिस्थिती पानाच्या वाट्या होत असल्यासारखी समस्या दिसते ही समस्या काही भागात होते संजीवकाचा व विद्राव्य खतांचा वापर हा घडाचा चा विकास व वेलीची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी केला जातो मात्र वरच्या पेक्षा ते जास्त असल्यास त्यात खूप अडचण येतात
जेव्हा प्रयोग शाळेत नमुने तपासण्यासाठी आले त्यावेळेस त्या वेळेवर तणनाशकाचे काही अंश असल्याचे लक्षात आले जरी तणनाशक फवारणी केली नाही तरी खत आणि रसायनांमधून त्याचा पुरवठा होऊ शकतो त्यासाठी खात्रीशीर खत आणि रसाय यांचा वापर करावा त्याचा वापर करण्यापूर्वी त्यातील घटकांची तपासणी करावी बागेत यातील काही लक्षणे दिसतात कॅनोपीनुसार 1 ते 2 ग्रॅम युरिया प्रतिलिटर पाणी याप्रमाणे 1 ते 2 वेळा फवारणी करावी त्याचप्रमाणे बागेत थोड्या थोड्या प्रमाणात पाणी वाढवावे

Leave a Comment