कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना रोजगार संधी

कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना रोजगार संधी, कृषी क्षेत्रातील रोजगार संधी, गट शेती उद्योग, भाडेतत्त्वावरती कृषी यंत्र पुरवठा (कृषी यंत्र उद्योग), प्राथमिक प्रक्रिया उद्योग, गोडाऊन किंवा बखार उभारणे, शेतमाल प्रक्रिया उद्योग, शेतीला जोडधंदा, व्यवसाय वाहतूक व्यवसाय, ट्रेडिंग व मार्केटिंग

कृषीप्रधान देश म्हणजे भारत ही व्याख्या  जगाला माहिती आहे. कारण कृषी क्षेत्र हे एक भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी असणार खूप मोठा साधन आहे.परंतु याच देशातील कृषी क्षेत्राला मागील काही वर्षात अनेक संकटांनी घेतला आहे खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले आहे.मागील काही वर्षांमध्ये शेती शेतीमध्ये खूप नुकसान झाल्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचा वाटा काही टक्क्याने घासायला आहे. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे भारतातील 55% लोकसंख्या उपजीविकेसाठी कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे. तसेच शेती या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार उपलब्ध आहेत परंतु ते रोजगार कोणते आणि ते रोजगार कसे निर्माण करायचे याबद्दल शेतकऱ्यांना अधिक ची माहिती नाही किंवा अपुरे ज्ञान असल्यामुळे शेतकरी या रोजगारांपासून काही क्षण प्रमाणामध्ये वंचित राहिलेला आहे किंवा आपण असे म्हणू की या रोजगार च्या संधी तो ओळखू शकलेला नाही. त्यामुळे ग्रामीण युवक रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित होताना दिसतो आहे. ग्रामीण भागामध्ये व्यवसायाच्या संधी खूप दडलेले आहे स्थितीत होणारे नुकसान यामुळे शेतीचे अर्थव्यवस्था बिघडल्यामुळे बेरोजगार ग्रामीण युवक रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करतो. शेती हा मागील काही वर्षात तोट्याचा उद्योग झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी फाडून त्याचा विपरीत परिणाम शेती क्षेत्रावर झालेला आहे. ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी यापुढे शेतीवर आधारित ग्रामीण उद्योगांचे जाळे उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतमाल विक्री पश्चात प्रक्रिया बाजार व्यवस्था अशा अनेक उद्योगांच्या संध्या उपलब्ध करणे काळाची गरज आहे.

कृषी क्षेत्रातील रोजगार संधी

आता आपण जाणून घेणार आहोत कृषी क्षेत्रातील रोजगार संधी यापैकी काही महत्त्वाच्या संधी खाली प्रमाणे आहे.

  1. गट शेती उद्योग
  2. भाडेतत्त्वावरती कृषी यंत्र पुरवठा (कृषी यंत्र उद्योग)
  3. प्राथमिक प्रक्रिया उद्योग
  4. गोडाऊन किंवा बखार उभारणे
  5. शेतमाल प्रक्रिया उद्योग
  6. शेतीला जोडधंदा व्यवसाय
  7. वाहतूक व्यवसाय
  8. ट्रेडिंग व मार्केटिंग

गट शेती उद्योग

शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गुणवत्तापूर्ण दर्जेदार प्रतीचा शेतमाल लागतो यासाठी आपण गट शेती हा पर्याय निवडू शकतो गट शेतीतून शेतमाल उत्पादन करणे आणि यातून स्थानिक व निर्यात बाजारपेठ यांच्याशी जोडणे या साखळीतील सर्वात मोठा फायदा किंवा संधी ग्रामीण युवकांना गट शेती उद्योगातून निर्माण होऊ शकते. जर शेतकऱ्यांनी गटशेतीला चालना देऊन एकत्रितपणे भाजीपाला व इतर उत्पादन घेतली तर निश्चितच कमी खर्चात व फायदेशीर होऊ शकते. महाराष्ट्रात गट शेतीच्या प्रयोग आला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलेला आहे आणि काही ग्रामीण युवक शेतकरी गट शेतीचे प्रयोग करत आहेत. ज्यांनी गटशेती यशस्वीरित्या केलेल्या आहे. त्यांना आर्थिक दृष्ट्या खूप फायद्याची ठरलेली आहे. कृषी क्षेत्रात दर्जेदार उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याला खूप सारी मेहनत करावी लागते. जर हीच मेहनत आपण गट शेती माध्यमातून सर्वांनी एकत्रित केली तर निश्चितच त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल यासाठी पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. 

या क्षेत्रामध्ये खूप सार्‍या संधी सुद्धा दडलेल्या आहेत.

  1. शेतीसाठी लागणारे खते औषधे बियाणे
  2. सिंचन
  3. पिकांची मशागत
  4. अन्नद्रव्य व्यवस्थापन
  5. कीड रोग व्यवस्थापन
  6. कृषी अवजारे केंद्र
  7. कृषी सेवा पुरवठा 
  8. खतांची निर्मिती आणि खतांचा व्यापार 

अशा प्रकारच्या व्यावसायिक संधी ओळखून व्यवसाय उद्योग म्हणून याकडे पाहता येईल.

भाडेतत्त्वावरती कृषी यंत्र पुरवठा (कृषी यंत्र उद्योग)

शेतीमध्ये राबण्यासाठी कष्ट करण्यासाठी शेत मजुरांची गरज असते. वाढत्या शेतमालाची मागणी आणि अपुरे शेतकामासाठी मजुरांची संख्या याच्यामुळे शेतीत नेहमीच मजुरांची कमतरता भासते. त्यामुळे आत्ताची शेती यांत्रिकीकरणावर अवलंबून आहे. शेतकरी मित्रांनो याच्यामध्येही तुम्हाला रोजगाराची संधी दडलेली आहे. याच्या मार्फत तुम्ही भाडेतत्त्वावर यंतपुरवठा हा एक चांगला व्यवसाय करू शकता शेती उपयोगी आणि जास्तीत जास्त वा वापरात असणारी यंत्रे मग ती ट्रॅक्टर चलित असतील किंवा हाताने चालविणारी असो अशा अवजारांचा आणि यंत्रांचा साठा करून शेतकऱ्यांना तुम्ही भाडेतत्त्वावरती त्यांच्या गरजेनुसार पुरवठा करू शकता आणि त्या बदल्या तुम्ही त्यांच्याकडून भाडे याकरू शकता. शेतीची कामं आहेत ज्याच्यामध्ये मशागत आली पेरणी अंतर मशागत खत पेरणी तसेच पीक काढणे अशा प्रकारच्या कामांसाठी यंत्रांचा वापर होतो आणि याच कामांमध्ये उपयोगी पडणारे यंत्र उपलब्ध करून ते तुम्ही भाडेतत्त्वावरती शेतकऱ्याने देऊन त्याबद्दल आर्थिक मोबदला मिळू शकतात. अशा प्रकारे भाडेतत्त्वावर कृषी अवजार सेंटर चालवून यातून चांगला रोजगार निर्माण होऊ शकतो.

प्राथमिक प्रक्रिया उद्योग

आज कालचे सगळेच शेतकरी हे त्यांच्या शेतीतून निघालेला उत्पादन झाल्यानंतर जशास तसे बाजारात पाठवतात आणि त्यामुळे त्यांना सर्वसाधारण भाव मिळतो. कारण त्यांच्याकडे साठवणीसाठी पुरेशी जागा नसते किंवा त्या सोयी नसतात ज्या उत्पादन साठवणुकीसाठी आवश्यक असतात. त्यामुळे निघालेले उत्पादन लगेच विक्रीसाठी पाठवले जाते ज्यामुळे त्यांना शेतातील धान्यमालाला भाव कमी मिळतो साठवणुकीसाठी लागणारे गोडाउन्स उभे करणे सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या हातातील गोष्ट नाही. त्यामुळे शेतकरी स्वस्तात जे होईल ते तर नक्कीच करू शकतात आणि उत्पादनाला भाव सुद्धा जास्त मिळेल. कोणते पर्याय आहेत उपलब्ध यासाठी. आपण काढलेले शेतातील उत्पादन व्यवस्थित स्वच्छ करून घेणे, चांगल्या प्रतीचे पॅकिंग करणे, लेबलिंग करणे, किंवा ब्रॅण्डिंग करणे अशाप्रकारे जर आपण प्राथमिक प्रक्रिया केली तर नक्कीच आपल्या शेतमालाला वीस ते पंचवीस टक्के भाव हा जास्त मिळेल.

गोडाऊन किंवा बखार उभारणे

शेतकरी मित्रांनो आपण वरच्या मुद्द्यांमध्ये समजून घेतल्याप्रमाणे की शेतकऱ्यांकडे त्यांच्या शेतीतील उत्पादने साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन किंवा वखार नसते .त्यामुळे त्यांना त्यांच्या शेतीतील शेत उत्पादने त्वरित कृषी बाजारात घेऊन जावे लागतात. त्यामुळे त्या उत्पादनाला हवा तो भाव मिळत नाही, कारण कृषी बाजारामध्ये शेतमालाची आवक साधारणतः पीक काढण्याच्या काळामध्ये जास्त होते. त्यामुळे शेतमालाचे भाव खाली जातात व शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची कमी किमतीत विक्री करावी जर शेतकऱ्यांकडे साठवणुकीची व्यवस्था असती तर शेतकऱ्यांना उत्पादने त्वरित बाजारात न्यावं लागणार नाही आणि शेतमालाची सार्वजनिक रित्या साठवून करता येईल. ज्या वेळेस शेतमालाला बाजार भाव चांगले मिळेल. तेव्हा आपण आपले उत्पादने विक्रीसाठी घेऊन जाऊ शकतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा अधिकचा भाव मिळू शकेल. तसेच गोडाऊन उभारणे वखार निर्माण करणे हा सुद्धा एक उद्योग आहे आणि म्हणूनच ही एक उद्योगासाठी संधी आहे. जे शेतकरी किंवा युवक या संधीसाठी इच्छुक आहेत यांसाठी शासकीय योजनांची मदत त्याचप्रमाणे काही प्रमाणात बँकेकडून कर्जही मिळू शकते. अशाप्रकारे ग्रामीण भागामध्ये वखारी आणि गोडावणी उभा करून शेतीमध्ये उत्पन्न वाढवू शकता आणि रोजगारही निर्माण करू शकता.

शेतमाल प्रक्रिया उद्योग

शेतमाल प्रक्रिया उद्योग ही सध्या खूप महत्त्वाची एक रोजगार निर्माण करणारी संधी आहे. तसेच आपल्या शेतमालाला जास्तीचे भाव मिळू शकतो यासाठी आपल्याला काय करायचे आहे. हे आपण जाणून घेऊ आपण जो आपले शेतमालातील उत्पादन आहे जे आपण डायरेक्ट कृषी बाजारपेठेमध्ये विकत असतो त्यामुळे आपल्याला जो भाऊ पडेल त्या भाव मध्ये विक्री करावी लागते. त्याच्यानंतर आपण पाहिले की जर आपण तोच शेतीमाल जर प्राथमिक प्रक्रिया करून विकल्यास त्याच्यामध्ये 20 ते 25 टक्के भाऊ जास्तीचे मिळू शकतो. त्याही पुढे जाऊन जर आपण आपला शेतीतील उत्पादने जर आपण गोडाऊन मध्ये ठेवून जर आपण त्यांना ज्यावेळेस भाऊ येईल त्यावेळेस जर विकले तर त्यातून आपला अधिकचा फायदा होईल. परंतु आता आपण पाहणार आहोत ज्यातून आपल्याला याच्यापेक्षा डबल फायदा होईल आणि आपल्या शेतीच्या मालाला किंवा आपल्या उत्पादनाला खूप सराव मिळेल आणि आपण शेतीतून खूप सारा नफा आणि रोजगार निर्माण करू शकतो.

जाणून घेऊयात शेतीमाल प्रक्रिया उद्योग काय आहे शेतीमाल शेतीमाल प्रक्रिया उद्योग याच्यामध्ये उत्पादनानंतर लहान लहान प्रक्रिया उद्योग करण्यासाठी ग्रामीण युवकांना फार मोठ्या संधी आहेत. ज्याप्रमाणे लोकांचा शहरीकरणाकडे जाण्याचा कल वाढलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे वेळेचे सुद्धा बंधन आलेला आहे, त्यामुळे जे शहरांमध्ये राहतात अशी लोक सध्या प्रक्रिया केलेल्या अन्न खाण्याकडे जास्त भर देत आहेत. कारण त्यांच्याकडे वेळ खूप कमी असतो सध्या जगभरात आणि देशांमध्ये प्रक्रिया केलेले अन्न सेवन प्रमाण जास्त पटीने वाढलेला आहे. त्यामुळे जगभरात लोक रेडी टू कुक रेडी & टू इट अशा प्रक्रिया केलेल्या अन्नाला जास्त प्राधान्य देत आहेत.

ज्या भागात ज्याची शेती पिकवला जातो त्याच भागात त्याच ठिकाणी अशा प्रकारच्या अन्नप्रक्रिया उद्योगाच्या जाळे निर्माण झाल्यास तेच अन्न चांगल्या प्रकारचे पॅकिंग करून बाजारात स्वस्त धर्मामध्ये विकता येईल. आणि ग्राहकाला हे स्वस्त दरात उपलब्ध होईल परंतु अशा प्रकारचा उद्योग भारतात अजून खूप कमी ठिकाणी केला जातो. परंतु यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या अग्रेसर आहेत तसेच देशातील मोठ्या कंपन्या हा उद्योग करतात. हा व्यवसाय करण्यासाठी ग्रामीण युवकांना याविषयीची माहिती असणे आवश्यक आहे आणि ती माहिती ग्रामीण युवकांना प्रशिक्षणाद्वारे दिले जाऊ शकते.

याच्यामध्ये तंत्रज्ञान व्यवस्थापन व आर्थिक नियोजन याविषयी प्रशिक्षित करून या व्यवसायाकडे आपण त्यांना चालना देऊ शकतो. या व्यवसायाच्या लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी बँकिंग क्षेत्राच्या मदतीने लघु किंवा मध्यम उद्योग उभारण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते यासाठी युवकांनी शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांकडून आर्थिक मदत घेऊन हा प्रकल्प उभारू शकतात आणि ही काळजी गरज आहे.

शेतीला जोडधंदा व्यवसाय

शेतात काम करत असताना शेतीला जर जोड व्यवसाय असेल. तर उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत होईल या संदर्भात असे शेतीशी निगडित असणारे अनेक व्यवसाय आहेत. याच्यामध्ये कृषी यंत्रांच्या वापराचे तंत्रज्ञान अवगत करणे आणि लोकांना प्रशिक्षण देणे. ज्यामुळे शेतीमध्ये यांत्रिकीकरण सेवा हा उद्योग चांगल्या प्रकारे करू शकतो अजून छोटे मोठे उद्योग आहेत ते आपण पाहूयात,

  1. यांत्रिकीकरण सेवा उद्योग
  2. हवामान अंदाज व शेती सल्ला केंद्र
  3. कृषी अवजारांची सेवा केंद्र
  4. कृषी सेवा केंद्र
  5. ट्रॅक्टर व अवजारे देखभाल
  6. कीड-रोग व्यवस्थापन
  7. जैविक खतांची निर्मिती आणि जैविक खतांचा व्यापार

वाहतूक व्यवसाय

शेतमालाला व्यवस्थित भाव मिळवा म्हणून शेतमाल सुरक्षित बाजारापर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि याच निमित्ताने वाहतूक व्यवसाय करण्याचे संधी अनेक युवकांना मिळू शकते.

शेतमाल फळे व भाज्या योग्य प्रकारे शेतावरती स्वच्छ करून चांगल्या प्रकारचे पॅकेजिंग करून व वाहनांमध्ये योग्य रीतीने लोड करून कृषी बाजारपेठेत पोहोचविणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अशी वाहन आहे त्यांच्यासाठी हा वाहतूक व्यवसाय करण्यासाठीच खूप मोठी संधी आहे.

ट्रेडिंग व मार्केटिंग

बहुतांश शेतकरी हे या संधी पासून चार हात लांबच राहणं पसंत करतात, कारण त्यांना ट्रेडिंग व मार्केटिंग करणे खूप अवघड वाटते. आणि जोखीमीचेही वाटते त्यामुळे शेतकरी या वाटे जातच नाही आणि व्यापाऱ्यांचे खिसे भरतात. हाच व्यवसाय जर शेतकऱ्यांनीच केला तर त्यांचा पैसा त्यांच्याकडेच राहील. परंतु ट्रेडिंग व मार्केटिंग या क्षेत्राचे माहिती नसल्यामुळे शेतकरी या क्षेत्रात उतरत नाही. परंतु शेतमालाचा व्यापार व विक्री करणे यामध्ये अनेक संधी दडलेले आहेत. शेतमालाची चांगल्या प्रकारे स्वच्छता पॅकिंग व ब्रँडिंग करून एक ते पाच किलोच्या पॅक मध्ये घरपोच मिळेल अशा प्रकारच्या उद्योगाला फार मोठा भाव आहे. गेला कोविड काळामध्ये अनेक सुशिक्षित युवकांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर करून या क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. जर हाच व्यवसाय जर शेतकऱ्यांनी केला तर ताजी फळे, ताजा भाजीपाला, व्यवस्थितपणे स्वच्छ करून पॅकिंग करून शहरी ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविता आला तर ट्रेडिंग आणि मार्केटिंग हा व्यवसाय तुमच्यासाठी खुला आहे. परंतु हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला काही तंत्रज्ञान शिकून घ्यावे लागतील. यासाठी लागणारे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक एज याचा अभ्यास करावा लागेल. ज्या क्षेत्रांमध्ये उद्योग व रोजगारांच्या संधी दडलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर मिळवून तो पुरवठा करणे याचा बंदोबस्त करावा लागतो आणि हे काम वाहतूक व्यवसाय करतात तुम्हाला फक्त ग्राहकांपर्यंत पोहोचून ऑर्डर्स घ्यावे लागतील. त्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत प्रत्यक्ष भेटून आणि ऑनलाइन ॲप द्वारे या व्यवसायामध्ये संधी शोधून छोट्या कंपन्या यशस्वी यशस्वी रित्या मोठ्या झालेल्या आहेत. याच्या माध्यमातून अनेक युवकांना स्वयंरोजगार तसेच रोजगार उपलब्ध करून आपण देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचा हातभार लावू शकतो.

16 thoughts on “कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना रोजगार संधी”

Leave a Comment