थंडीत कोंबड्यांचे व्यवस्थापन

कुकूटपालन 2023, थंडीत कोंबड्यांचे व्यवस्थापन,शेड मधील व्यवस्थापन, खाद्य नियोजन,स्वच्छ पाणीपुरवठा, लिटर व्यवस्थापन

थंडीत कोंबड्यांचे व्यवस्थापन

कुकूटपालन 2023,

Poultry Farming:- हिवाळ्यामधील कमी झालेले तापमान हे कोंबड्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. खूप थंडीपासून त्यांचा बचाव करण्यासाठी शेडच्या बाजूने जाळीस कोरडे पडदे लावून घ्यावेत.पडद्यांची उघडझाप सहजरित्या करता आली पाहिजे, अशा पद्धतीने पडदे लावून घ्यावे. थंड हवेच्या वेळी रात्री पडदे बंद करावे.

उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांचा उष्माघातामुळे मृत्यू होतो, तसेच हिवाळ्यात देखील कोल्डस्ट्रोक मुळे त्यांचा मृत्यू होतो. जर त्यांचे 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान आणि 28 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान जर त्यांचे असेल तर कोंबड्यांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. कोंबड्यांच्या बरोबर वाढीसाठी 18 ते 21 अंश सेल्सिअस तापमान हे योग्य असते.पण थंडीच्या काळात काही ठिकाणी तापमान हे 10 पेक्षा खूप कमी होते अशावेळी अशावेळी कोंबड्यांना शरीरात तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज भासते.

शेड मधील व्यवस्थापन

 • शेड मधील नियंत्रित तापमान 18 ते 24 अंश सेल्सिअस
 • शेड मधील आद्रता 50 ते 60 टक्के
 • हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण 21%
 • पिण्याच्या पाण्याचा सामू 6.8 ते 7.5
 • पिण्याच्या पाण्याचा हार्डनेस 60 ते 180 पीपीएम
 • शेर मधील अमोनियाचे प्रमाण 25 पीपीएम पेक्षा कमी
 • थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कोंबड्यांना त्यांच्या शेडच्या बाजूने जाळीस स्वच्छ कोरडे पडदे लावून घ्यावेत. त्याचे उघडझाप सहज रित्या करता आली पाहिजे. थंड हवेच्या वेळी रात्री पडदे बंद करून घ्यावेत व दुपारी उष्णता असते त्या वेळी पडदे उघडे ठेवावेत.
 • खेळती हवा व वायुविजन शेडमध्ये योग्यरीत्या असणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य वेळेस पण त्यांची उघडझाप वरून खाली करावेत, तसेच जर केले तर कार्बनडा-ऑक्साइडयुक्त दूषित हवा पटकन बाहेर फेकली जाते. ही दूषित हवा जर बाहेर टाकली गेली नाही तर कोंबड्यांना ऑक्सिजन युक्त हवा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे हायपोक्षी हा आजार त्यांना होऊ शकतो.
 • जलोदर चे प्रमाण हे तिसऱ्या आठवड्यापासून कोंबडा शेड वर आल्यानंतर वाढवण्यास सुरुवात करावी मृत्यमुखी कोंबडा पडण्याचे प्रमाण वाढते.आपण लावलेल्या पडद्याची उघडझाप त्याचे नियोजन योग्य प्रकारे नाही केले तर शेडमध्ये जो निमोनिया तयार होतो. तो. बाहेर फेकला जाऊ शकत नाही त्यातील निमोनियाचे प्रमाण वाढल्यामुळे श्वसनसंस्थेचे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे डोळ्यांना त्रास होतो त्यामुळे खाण्याचे प्रमाण कमी होऊन कोंबड्यांचे वजन कमी होते. तसेच औषधांचा खर्च देखील वाढतो म्हणून हिवाळ्यामध्ये शेडला जे पडदे लावले आहेत त्यांचे नियोजन व्यवस्थित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 • पूर्व पश्चिम शेड ची रचना असावी तीस फुटावर अधिक रुंदी नसावी, ज रुंदी जास्त असली तर शेडमधील हवा खेळती राहू शकत नाही

खाद्य नियोजन

 • हिवाळ्यामध्ये त्यांच्या खाण्यात योग्य तो बदल करून घ्यावा. हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराचे तापमान टिकवण्यासाठी व उबदार राहण्यासाठी कोंबड्या जास्त प्रमाणात खाद्य खातात, त्यामुळे खाद्यावर जास्त प्रमाणात खर्च होतो.तसेच जे ऊर्जा तयार होती ती तयार करण्यासाठी न लागणारे पोषण तत्वे वाया जातात.
 • कोंबड्यांच्या खात्यावर खर्च कमी होण्यासाठी ऊर्जा युक्त खाद्यपदार्थ जसे की सिग्न पदार्थ प्रथिने तेल अशाप्रकारे वाढवावे बाकीच्या पोषण तत्वाचे प्रमाण तेवढेच ठेवावे.
 • ऊर्जावर्धक घटक आहेत त्यांचा आहारात समावेश करावा व त्यांच्या प्रमाण वाढवावे आणि त्याच प्रमाणे प्रथिनांचे प्रमाण एक ते दोन टक्का कमी करणे खूप गरजेचे आहे.
 • एकही या जीवनसत्वाचे प्रमाण खाद्यामध्ये वाढवावे प्रति 40 पिल्लांना एक लहान फिडर तर प्रती 30 मोठ्या कोंबड्यांना एक मोठा फिटर वापरावा. कोंबडीच्या पाठीच्या दोन इंच वरती फिडरची उंची असावी.

स्वच्छ पाणीपुरवठा

 • कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण हे कमी होते कारण बऱ्याच वेळी पिण्याच्या पाण्याचे तापमान कमी असते. पाणी पिण्याचे प्रमाण हे त्यांचे खाद्यसेवणाच्या प्रमाणात असने आवश्यक आहे.
 • कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण हे खाद्याच्या दुप्पट असते. परंतु त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण जर कमी झाले तर मूत्रपिंडात यूरिक ॲसिड चे घणीकरण होऊ शकते. मूत्रपिंड आणि मूत्रवाहिनी मध्ये यूरिक ॲसिड जर साठवून राहिले तर त्यांना गाऊट हा आजार होतो.
 • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी हे पाणी कमी पिल्यामुळे कमी होते म्हणून हिवाल्यामध्ये कोमट पाणी देणे त्यामुळे पाण्याच्या प्रमाणात वाढ होईल.
 • 40 पिल्लांना एक लहान ड्रिंकर तर ते 30 मोठ्या कोंबड्यांना एक मोठा ड्रिंकर वापरावा कोंबडीच्या पाठीच्या दोन इंच वर ड्रिंकर ची उंची असावी व ते नेहमी निर्जंतुक आणि स्वच्छ त्यांना द्यावे.

लिटर व्यवस्थापन

 • लिटर मधील आद्रतेचे बाष्पीभवन हिवाळ्यात होत नाही. हवेतील आद्रतेमध्ये अति थंडीमुळे वाढ होते त्यामुळे कोंबड्या आजारी पडतात. त्याला कारण म्हणजे शेड मधील ओलसरपणा जिवाणू, बुरशी यासारख्या जंतूंची वाढ होते व त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.
 •  हिवाळ्यामध्ये लिटरचे गोळे होतात त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे आद्रता वाढणे, पाण्याचा पाईप मध्ये गळती होणे, शेडचे पडदे अधिक वेळ बंद असणे, शेडमधील वातावरणातील आद्रता कमी न झाल्यामुळे देखील लिटर ओले होते.
 • तुसाची निवड योग्य न करणे त्याचप्रमाणे योग्य पद्धतीने लिटरची जाडी न ठेवणे. त्यामुळे लिटर ओले होऊन खूप प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्याला एकच पर्याय ते म्हणजे लिटर मधे गोळे झाल्यास बदलून टाकावे. त्याचप्रमाणे लिटर खालीवर करणे आणि ओली लिटर जे आहेत ते काढून टाकणे.

हे ही वाचा कृषी शेत्रातील रोजगार संधी

Leave a Comment