भविष्यातील शेती आणि तंत्रज्ञान Future farming and technology

भविष्यातील शेती आणि तंत्रज्ञान, Future farming and technology,अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान, अनुवंशिकी अभियांत्रिकी, नॅनो तंत्रज्ञान, जैविक नियंत्रण तंत्रज्ञान, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान.

भविष्यकालीन कृषी क्षेत्रातील नवीन उपक्रमाविषयी आज आपण माहिती घेऊ.

भविष्यातील शेती आणि तंत्रज्ञान,Future farming and technology

भविष्यातील शेती आणि तंत्रज्ञान,Future farming and technology- कृषी क्षेत्रातील भविष्यकालीन आणि नवीन उपक्रमांविषयी माहिती आज आपण घेऊ. भारत स्वतंत्र झाला 1947 मध्ये या घटनेला 2047 ला शंभर वर्षे पूर्ण होतील.या शताब्दी वर्षापर्यंत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश हा विकसित देश करण्याकडे लक्ष देऊन या मोहिमेची सुरुवातकेली.विकसित भारत 1947 सोमवार तारीख 11 डिसेंबर रोजी युवकांचा rआवाज या नावाने केली.

विकसित देश आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला आर्थिक सामाजिक आणि तांत्रिक निकष लावावे लागतात. भारताला ते पूर्ण करण्यासाठी फार मोठी कामगिरी पार पाडावी लागणार आहे. कारण आपण जर आर्थिक विकासाच्या गतीने चाललो तर 2047 पर्यंत लक्ष पूर्ण होऊ शकत नाही. लक्ष्याचा दिशेने जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांकडे जावे लागणार आहे.

आता चालू असलेला उपक्रमांना स्ट्रॉंग करावे लागणार आहे. आणि अजून नवीन उपक्रम आपल्याला तयार करावे लागणार आहेत. आता नवीन उपक्रम म्हणजे कोणते ते आपण पाहणार आहोत. त्याचा विचार करणे आपल्याला गरजेचे आहे. नवीन आणि लक्षवेधी जे कृषी क्षेत्रातील उपक्रम आहेत त्याची माहिती आज आपण घेणार आहोत.

विकसित भारत  2047 हे देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वाधिक लोकसंख्या ज्या क्षेत्रावर आहे. त्या कृषी क्षेत्रावर आपल्याला विशेष भर द्यावा लागणार आहे. आर्थिक विकासाचा दर 9% किंवा त्यापेक्षा अधिक राखण्याची गरज आहे. त्यामुळे जर या ध्येयाचा आपण विचार केला तर कृषी क्षेत्रातील आर्थिक विकासाचा दर खूप कमी आहे. या क्षेत्रात आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.

शेती क्षेत्रातील महत्त्वाची उद्दिष्टे :

Future farming and technology – आता सध्या 14 कोटी कुटुंबे शेतीमध्ये काम करतात आणि जर आपण अंदाज लावला तर 60 टक्के लोकसंख्या शेतीतील विविध गोष्टींवर अवलंबून आहे. भारतातील 50% क्षेत्र व शेती केली जाते. एकंदरीत भारताचे क्षेत्रफळ 160 दशलक्ष हेक्टर एवढे आहे. म्हणजे आपण भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा भार पेलवतोच पण त्याच्याही पलीकडे जाण्याचे आपल्याला गरज आहे.
अन्नधान्याच्या बाबतीत भारत हरितक्रांतीनंतर स्वावलंबी झाला. एक काळ असा होता की आपण विकसित देशांनी पुरवठा केलेला अन्नधान्यावर अवलंबून होतो. पण सध्याचे परिस्थिती बदलली आहे स्वावलंबाकडे आपली वाटचाल आहे आणि ही खूप आशावादी देखील आहे.

आता आपण आपल्या गरजेव्यतिरिक्त अन्य देशांना जर परिस्थिती ओढवली तर त्यांना देखील अन्नपुरवठा करू शकतो. आपल्या शेतकऱ्यांच्या बळावर आपण एवढी मोठी झेप घेतली आहे. यामध्ये विकसित झालेल्या कृषी तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे कार्य आहे.

कृषी तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला विकसित देशांच्या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी पुढील गोष्टी साध्य करणे महत्त्वाचे आहे. अंदाजे 164 कोटी भारताची लोकसंख्या 2047 मध्ये असेल. म्हणजे सध्याच्या लोकसंख्येच्या स्थितीत 22 कोटींची भर पडेल. या विशिष्ट कालावधीत वाढलेली लोकसंख्या त्याचप्रमाणे अन्नधान्याची गरज आणि योग्य पोषण मूल्य भागवण्यासाठी कृषी तंत्रज्ञानाचा विकास करणे गरजेचे आहे.
विकसित देशासोबतच आंतरराष्ट्रीय खूप जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील.
उदा, अन्य देशांची अन्नधान्याची गरज आपत्कालीन परिस्थितीमध्ये घेण्याची क्षमता आपल्या देशात निर्माण करणे.

आपल्या देशामध्ये जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे. शाश्वत पद्धतीने उपयोग करून झेप घेणे.वाढत्या भारताच्या लोकसंख्येच्या आकडेवारी मध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युवकांचे यात सर्वाधिक संख्या असणार परंतु आताच्या युवकांना शेतीमध्ये विशेष आवड वाटत नाही. अशा युवकांना शेतीकडे आकर्षीने ही आपली जबाबदारी आहे.

प्रमुख आव्हाने :

नैसर्गिक संसाधने जी कमी व खराब होणारी आहेत: इंधन जमीन हवा पाणी इत्यादी.

इतर देशांवरील शेती निवेष्ठांसाठी अवलंबित्व : रसायने खते यंत्रसामग्री लागवड साहित्य इत्यादी.

इच्छा नसणारे व शेतीसाठी कमी होत जाणारे मनुष्यबळ.

भारतीय उपखंडातील हवामान बदल आणि हवामानातील वैधता आणि त्याच प्रमाणे हवामानातील अनियमितता इत्यादी.

मागणी बाजार पुरवठा यातील अनिश्चितता.

त्यामुळे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या आव्हानांचा सामना करण्यासाठी वाढवावा लागेल. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना ते वापरण्यायोग्य आणि वापरण्यासाठी सुलभ असतील.

कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान पुढील प्रमाणे आहेत

भविष्यातील शेती आणि तंत्रज्ञान, Future farming and technology

•अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान
•अनुवंशिकी अभियांत्रिकी
•नॅनो तंत्रज्ञान
•जैविक नियंत्रण तंत्रज्ञान
•ब्लॉकचेन तंत्रज्ञान
•जैवतंत्रज्ञान
•डिजिटल तंत्रज्ञान
  इत्यादींचा अंतर्भाव यामध्ये आहे अशी वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञाने वापरणे आपल्याला गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना ती वापरण्यात काही एक अडचण येणार नाही.

हे ही वाचा कृषी शेत्रातील रोजगार संधी

Leave a Comment