नव्या ‘पेटंटेड’ द्राक्षाच्या मालाकडेच वळावे

New grapes varieties, नव्या ‘पेटंटेड’ द्राक्षाच्या मालाकडेच वळावे, Grapes farming and management.

नव्या ‘पेटंटेड’ द्राक्षाच्या मालाकडेच वळावे

New grapes varieties:- द्राक्ष उत्पादनात भारत हा जगातील आघाडीचा देश आहे.जागतिक बाजारपेठेत देखील त्यांनी चांगले स्थान मिळवले. परंतु आता संपूर्ण जगातील द्राक्ष उत्पादक देश यांनी पारंपरिक वाण दहा ते पंधरा वर्षात बदलून टाकला आणि नव्या पेटंटेड वाणाच्या दिशेने वळाले जागतिक बाजारपेठेत आपले हे स्थान टिकवायचे असेल तर त्या दृष्टीने वाटचाल करावी लागणार हे निश्चित.

Grapes farming and management:- महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक हे सारखे वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जात आहेत. त्यामध्ये बदलते हवामान आणि बाजारपेठ यांचा समावेश आहे. उत्पादन घेण्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास आणि जगातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे राज्यातील द्राक्ष उत्पादकांचे वैशिष्ट्य आहे. पाच लाखांहून अधिक रोजगार निर्मिती दरवर्षी या पिकातून होते. इटली, चीन, ब्राझील, युरोपमधील स्पेन, अमेरिका, दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया उत्तर व दक्षिण गोलार्धातील देश वेगवेगळ्या वातावरणात द्राक्षाचे उत्पादन करतात. यातील काही देशात फक्त चार महिने द्राक्षाची शेती करता येते आणि उरलेल्या महिन्यात द्राक्षाचे आयात केली जाते. भारत, ब्राझील येथे आठ महिने द्राक्ष शेती करू शकतो या देशांची जास्तीत जास्त द्राक्ष पुरवठा करण्याची क्षमता असते. येथील उपलब्ध हवामानात चांगल्या पद्धतीने द्राक्षबाग येते आणि खर्च देखील कमी येतो. जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक अनुकूलतेमुळे त्यामुळे येणाऱ्या काळात या दोन देशांचे भविष्य चांगले आहे.

ग्राहकांची मागणी ओळखणे


New grapes varieties:- जागतिक बाजारपेठ जर आपल्या बाजूने वळून घ्यायचे असेल तर त्यांना जे हवे ते द्यावे लागणार ज्या जाती नैसर्गिक ब्लूम आहेत त्यांचा आकार मोठा व चवही चांगली टिकते अशा द्राक्षांना खूप मागणी आहे अशा प्रकारच्या द्राक्षाचे उत्पादन कुठे झाले यामध्ये ग्राहकाला रस नसतो तर द्राक्षाचे गुणवत्ता टिकवून ठेवण्याची क्षमता चव सेफ्टी फूड चे निकष अशा द्राक्षांकडे जगभरातील ग्राहक पाहतो अशाप्रकारे आपले द्राक्षाचे उत्पादन घेणारे देश नेमके काय करत आहेत? त्यांची स्ट्रॅटर्जी कशा प्रकारची आहे जेणेकरून बाजारपेठ आपल्या ताब्यात घेता येईल हे समजणे फार महत्त्वाचे आहे.

भरपूर क्षमता पण अनेक आव्हाने


Grapes farming and management:- आपल्याकडे क्रिमसन वगळता सर्व वाणां मध्ये संजीवकाचा वापर होतो. नैसर्गिक द्राक्षाची चव मिळत नसल्या कारणामुळे बाजारपेठेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. जर चव टिकून ठेवायचे असेल तर सजीवकांचा कमीत कमी वापर करणे किंवा तो होणार नाही, अशा प्रकारची काळजी घेणे हे आपल्यापुढे महत्त्वाचे आव्हान आहे. आपले उत्पादकता खूप छान आहे. नव्या वाणांची साथ जर आपल्याला मिळाली तर आपण आपले काम अजून खूप चांगल्या प्रकारे करू शकू. किमान पुढील दोन नवीन वाणांच्या प्रोटोकॉलची तयार करण्यावर काम करावे लागेल. भारत हा जागतिक निर्यात आकडेवारीवर चौथ्या क्रमांकावर आहे.जर आपण ठरवलं तर 2030 पर्यंत आपण पहिल्या क्रमांकावर जाऊ द्राक्ष उत्पादकांची एवढी ताकद नक्कीच आहे.

नवे वाण स्पर्धा जिंकण्यासाठी हवेत

जगभरातील द्राक्ष शेतीचे चित्र हे वाहन पैदास कार्यक्रम या संकल्पनेने बदलले दर्जेदार मालाची निर्मिती यातून होते. जगभरातील द्राक्ष उत्पादक देश याच जोरावर जगाच्या बाजारात बाजी मारतात. तीसहून जास्त वर्ष संशोधन सांघिक प्रयत्न,अधिक मेहनत यामधून तयार झालेल्या पेटंटेड वाणानी जगाचे मार्केट ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. सह्याद्री शेतकरी या उत्पादक कंपनीने असे पेटंटेड वाण भारतात आणले. त्यातील काही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहेत. बाकी दोन वर्षात उपलब्ध होतील. भारतात अजूनही पारंपारिक वाणांचा उपयोग होतो. जागतिक स्पर्धेत जर आपल्या टिकायचे असेल काळाची पावले ओळखावी अधिक सक्षम व नव्यावानाकडे वळावे दर्जेदार वाणाची निर्मिती येत्या काळात आपल्याकडेच होईल. त्यामुळे जागतिक दर्जाचा ब्रीडिंग प्रोग्राम राबवावा लागेल.

Leave a Comment