पाण्याच्या कमतरतेत फळबागेचे व्यवस्थापन

पाण्याच्या कमतरतेत फळबागेचे व्यवस्थापन, अल्पमुदत्तीसाठी करायचा उपाय योजना, दीर्घ मुदतीसाठी करायचा उपाय योजना, अच्छादनाचा वापर, अच्छादनाचा वापर, मडका सिंचन, सलाईन बाटल्यांचा वापर , खोडास बोर्डो पेस्ट लावणे, झाडाचे फळ पानोळा संख्या कमी करणे, जलशक्तीचा वापर.

पाण्याच्या कमतरतेत फळबागेचे व्यवस्थापन

सरकारकडून राज्यातील 218 तालुक्यांमधील 1228 मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. काही ठिकाणी तर दुष्काळ व पाण्याच्या कमतरतेची परिस्थिती मोठ्या प्रमाणात आढळली आहे म्हणजे तर या भागात सिंचनासाठी पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असेल. शेतकऱ्यांना पावसाळा सुरू होईपर्यंत फळबागा जपून त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे.अशा परिस्थितीत फळबागेचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे याची माहिती आज आपण घेणार आहोत.

अल्पमुदत्तीसाठी करायचा उपाय योजना●

 • अच्छादनाचा वापर
 • मडका सिंचन
 • जलशक्तीचा वापर
 • सलाईन बाटल्यांचा वापर 
 • खोडास बोर्डो पेस्ट लावणे
 • झाडाचे फळ पानोळा संख्या कमी करणे

दीर्घ मुदतीसाठी करायचा उपाय योजना

 • मोसंबी व्यवस्थापन
 • ठिबक सिंचनाचा वापर
 • ठिबक सिंचन संच नसलेल्या शेतीतील    उपायोजना

अल्पमुदतीसाठी करायचा उपाय योजना●

अच्छादनाचा वापर

झाडातील पानातून होणारे बाष्पोत्सर्जन आणि त्याच प्रमाणे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन या क्रियेमुळे बागेतील पाणी झपाट्याने कमी होते. या दोन्ही क्रियांना प्रतिबंध करणे गरजेचे आहे. त्यासाठी पॉलिथिन फिल्म आणि सेंद्रिय पदार्थांच्या आच्छादनाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कायम टिकून राहतो 80  ते 100मायक्रोन झाडाची फिल्म आपल्या आर्थिक क्षमतेनुसार किंवा शेतातील पिकांच्या अवशेषांचे सेंद्रिय आच्छादन याचाही शेतकऱ्यांना वापर करता येतो. त्याचप्रमाणे पालक पाचोळा गव्हाचे किंवा भाताचे कोरडे लाकडी भुसा, उसाचे पाचट, वाळलेले गवत, गिरीपुष्प झाडांच्या फांद्या याचा चार ते सहा इंच जाडीचा थर ड्रीप खाली देणे. त्यामुळे काय होते की तंतुमय मुळ्या कायम ओलसर राहतात व कार्यरत राहतात. अच्छादन करण्यापूर्वी कीडनाशकांची मुक्ती धुरळावे. कारण त्यामुळे वाळवीचा प्रादुर्भाव कमी होईल.

मडका सिंचन

मडका सिंचनाचा वापर हा कमी खर्चिक आहे. फळझाडांसाठी याचा वापर कमी खर्चिक राहू शकतो. 5 ते 6 लिटर क्षमतेचे कमी वयाच्या लहान फळ झाडांसाठी त्याचप्रमाणे 15 लिटर क्षमतेचे मोठ्या झाडांसाठी मडक्यांची निवड करावी. त्याच्या तळाला छोटा छिद्र करून त्यामध्ये सुती कपड्याची वात लावावी, त्यास झाडाच्या बुंध्याजवळ पुरून घ्यावे. जेणेकरून मडक्याचे तोंड जमिनीवर राहिल.मडक्याचे तोंड पाण्याने भरून झाकून ठेवावे. मडक्याच्या रचनेमुळे त्याचे पाणी सतत पाजरात राहते. त्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण होतो. त्यामुळे झाडाच्या मुळांना सतत पाणी मिळत राहते. मडक्यातील पाणी कमी झाले की ते पुन्हा भरून ठेवावे.

काळजी

सछिद्र मडके असावे.

जनावरांकडून मडके फुटणार नाही याची काळजी घेणे.

जलशक्तीचा वापर

गांडूळ खतासोबत पाच ते दहा किलो कुजलेले शेणखत हे 30 ते 50 ग्रॅम मिसळून जलशक्ती वापरल्यास, प्रति झाड वापरल्यास पाणी खूप दिवस मुळांजवळ राहण्यास मदत भेटते. पाणी जिथून देतात तिथे त्याच्या मध्ये हायड्रोजन वापरण्यात येते. शंभर पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता जलशक्ती मध्ये असते.

काळजी

जलशक्ती पावडर मुळाजवळ योग्य प्रमाणात द्यावे.

जलशक्तीचा वापर सारखा करू नये.

सलाईन बाटल्यांचा वापर

थोडे थोडे पाणी ठिबक सिंचनासारखे वापरण्यासाठी आणि अगदी थेट झाडाच्या मुळांजवळ देण्यासाठी या बाटल्यांचा उपयोग केला जातो. सलाईन मधील बटनांमुळे पाण्याचा पडण्याचा वेग कमी जास्त करता येतो. सलाईन ची बाटली भरून झाडाच्या फांदीला लटकवणे व त्याची नळी मुळाजवळ जमिनीतील थरात ठेवावे.

काळजी

सतत मुळांजवळ पाणी पडते का याची खात्री करून घ्यावी.

कचरा पडलेले तसेच गढूळ पाणी सलाईनच्या बाटलीमध्ये वापर करू नये.

खोडास बोर्डो पेस्ट लावणे

पाण्याच्या कमतरतेत उन्हाळ्याच्या दिवसात मोसंबी खोडास बोर्डो पेस्ट लावण्याचे अनेक फायदे होतात ,(एक किलो मोरचूद एक किलो केळीचा चुना दहा लिटर पाणी) त्यामुळे उष्णतेचे संरक्षण होते.

व्यवस्थापन

पेस्ट लावताना स्वच्छ ब्रशचा उपयोग करणे.

घटक द्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर करणे.

तयार झालेले जे मिश्रण आहे त्यामध्ये लोखंडी खिळा व चाकू बुडवला असता त्यावर तांबडा थर दिसणार नाही याची काळजी घेणे.

झाडाचे फळ पानोळा संख्या कमी करणे

 पर्णरंध्रामधून झाडाच्या पानातील पाणी बाहेर टाकले जाते पानाची व फळांची संख्या झाडाची छाटणी करून कमी करावी मोसंबी तील पानसोट काढून टाकणे.

दीर्घ मुदतीसाठी करायचा उपाय योजना●

ठिबक सिंचनाचा वापर


काटकसर पणे वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा उपयोग केला जातो पानांच्या मुळाशी हवी तेवढे पाण्याची मात्रा पुरवली जाते.

घ्यावयाची काळजी

 • वारंवार ड्रीप तपासणी
 • रोज ठिबक ची गरज नाही
 • वापसा झाल्यानंतर ठिबकचा वापर
 • ठिबक सिंचनात क्षारयुक्त पाणी न वापरणे

मोसंबी व्यवस्थापन

 • पुढील आंबे बहर पाण्याची जर खूप कमतरता असली तर घेऊ नये
 • बागेची मशागत करावी
 • दहा ते वीस लिटर पाणी ठिबक सिंचनाद्वारे देणे
 • डिसेंबर पर्यंत तीस लिटर पाणी द्यावे तसेच जानेवारी फेब्रुवारीत 40 लिटर पाणी द्यावे
 • प्लास्टिकचा वापर आच्छादनासाठी केला तर प्रतिदिवशी दहा लिटर पाणी एप्रिल मे महिन्यामध्ये मिळाले तर झाडांची वाढ चांगली होते
 • वरील पर्याय जर निवडले तर शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागा वाचवण्यास खूप मदत होईल

ठिबक सिंचन संच नसलेल्या शेतातील उपाययोजना

ज्या शेतकऱ्यांकडून ठिबक संच नाही त्यांनी पुढील प्रकारे उपाययोजना यावर लक्ष द्यावे

 • 45 सेमी रुंदीची सरी एक ते तीन वर्षाच्या फळझाडांच्या ओळीजवळ तयार करून घ्यावी सिंचनाचे पाणी या सरीतून सोडणे वाळलेला गवताचा 2.5 ते 5 सेमी सरित व आयात किंवा वाळलेल्या पानाचा थर पसरून द्यावा
 • चार ते सहा वर्ष फळझाडांचे वय असल्यास त्या झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूस खोडापासून एक पॉईंट पंचवीस मीटर रुंद दोन सऱ्या काढणे आणि त्या सरी मधून पाणी देणे अच्छादना तून सरी जाकावेत
 • सात वर्ष फळझाडांच्या वय असल्यास दोन ओळीत एक मीटर रुंदीच्या चार सऱ्या काढून घेणे या सरीत आलटून पालटून पाणी देणे अच्छादन पसरणे या सगळ्यांमध्ये महत्त्वाचे आहे
 • 20 ते 30 सेमी कोलीचे खळगे खुरप्याने किंवा कुशाने लावलेल्या कलमाभोवती करून घ्यावे चार ते पाच दिवसाच्या अंतराने हाताने खळग्यात पाणी भरून घ्यावे
 • 50 ते 60 लिटर पाणी प्रतिदिन ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ्यात आहे अशा शेतकऱ्यांनी आंबे बहर घ्यावा अन्यथा न घेणे बरेच

Leave a Comment