पिकविमा नुकसान भरपाई साठी होणार तंत्रज्ञानाद्वारे तपासणी

Crop insurance compensation 2023, पंतप्रधान पिक विमा योजना 2023, पिकविमा नुकसान भरपाई साठी होणार तंत्रज्ञानाद्वारे तपासणी.

पंतप्रधान पिक विमा योजना:

शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांना माहीतच आहे की पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळत असते पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाई च्या तपासणीसाठी सरकारने नवीन धोरण आखले आहे इथून पुढे सरकार पिकविमा नुकसान भरपाई साठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणार आहे.

पिकविमा नुकसान भरपाई साठी होणार तंत्रज्ञानाद्वारे तपासणी

ड्रोन उपग्रह द्वारे पिकाची पाहणी केली जाणार आहे तसेच या तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे निश्चित उत्पादनानुसार पिक विमा भरपाई मिळणार आहे.पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत सरासरी नुकसान 2 पद्धतीमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे पिकांच्या सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान वापरून आणि 70 टक्के पीक कापणी प्रयोगांतर्गत उत्पादन निश्चित केल्या जाणार आहे या पद्धतीचा वापर करून पिक विमा भरपाईची रक्कम ठरवली जाणार आहे

पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा भरपाई करण्यासाठी इथून पुढे तंत्रज्ञानाचा वापर करून निश्चित केले जाणार आहे त्यासाठी सरकार ड्रोन, उपग्रह या तंत्रज्ञानाद्वारे राज्यातील लागवडीखालील क्षेत्र मोजून पीक लागवड केलेल्या पिकांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाईल तसेच तांत्रिक उत्पादनाचे भारांकण पुढील तीन वर्षात 50 टक्क्यांवर नेण्यात येणार आहे.

सरकार पिकविमा नुकसान भरपाई साठी तंत्रज्ञानाचा वापर का करत आहे?

प्रधानमंत्री पिक विमा योजन या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान भरपाई मिळते परंतु या योजनेचा काही शेतकरी गैरवापर करताना दिसतात कारण सरकारद्वारे काढलेल्या नुकसानाचे आणि उत्पादनाची आकडेवारी विश्वासार्ह नसल्याचे केंद्र सरकारने अनेकदा स्पष्ट सांगितले आहे कारण शासन पिक विमा कंपन्यांकडून विमे उतरवले जातात जेव्हा शासनाने सादर केलेली आकडेवारी पिक विमा कंपन्या मान्य करत नाहीत त्यामुळे पिक विमा मिळवण्यास शासनाला अडचणी येतात. त्यामुळेच सरकार पिक विमा नुकसान भरपाई साठी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे जो की पुढील तीन वर्षात 10% टक्क्यावरून 30 % तंत्रज्ञान आधारित उत्पादन निश्चित करण्यात येणार आहे


सरासरी उत्पन्नाची गणना कशी असेल

शेतकरी मित्रांनो उत्पन्नाची गणना कशी असेल आपण माहिती पाहणार आहोत त्यातून आपल्याला सरासरी उत्पन्न नुकसान भरपाई किती मिळेल याविषयी आपण थोडक्यात पाहू पीक कापणी प्रयोग अंतर्गत मिळालेला उत्पादनाला 70 टक्क्यांनी गुणल्यानंतर येणारा आकडा आणि तांत्रिक उत्पादनाला 30 टक्क्यांनी गुणल्यानंतर येणारा आकडा त्यांची बेरीज करून येणारा निश्चित करण्यात येईल

हे ही वाचा कृषी शेत्रातील रोजगार संधी

सूत्र

पीक कापणी प्रयोगाअंतर्गत मिळालेले उत्पादन ×70%+ तांत्रिक उत्पादन ×30%= सरासरी उत्पन्न

उदाहरण: समजा पिक कापणी प्रयोगानंतर जर 1000 किलो हेक्टरी उत्पादन आले आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन 1300 किलो आल्यास तांत्रिक उत्पादन हे 1300 किलो निश्चित केले जाईल त्यातून 1000 kg गुणिले 70% आणि 1300kg गुणिले 30% यांची बेरीज करून म्हणजे 700 आणि 390 यांची बेरीज 1090 किलो हे सरासरी उत्पादन निश्चित केला जाईल

सूत्र : पीक कापणी प्रयोगाअंतर्गत मिळालेले उत्पादन ×70%+ तांत्रिक उत्पादन ×30%= सरासरी उत्पन्न

सूत्रनुसार
पीक कापणी प्रयोगांतर्गत मिळालेले उत्पादन 1000 kg×70%=700 kg
तांत्रिक आधारित उत्पादन 1300 kg×30%=390 kg

सूत्रनुसार 700 kg+390 kg = 1090 kg

1090 किलो हेक्टरी सरासरी उत्पन्न गृहीत धरले जाईल.

सरासरी उत्पादनाची गणना करताना इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे पहिल्या वर्षीय योजनेची अंमलबजावणी करताना पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पादन हे तांत्रिक उत्पादनापेक्षा कमी आहे असे गृहीत धरून सरासरी उत्पादन काढण्यात येईल त्यातून कापणी पशात उत्पादनाचा अंदाज काढला जाईल

ड्रोन, उपग्रह सारखी आधुनिक तंत्रज्ञान वापरून कशाचे होणार सर्वेक्षण

सरकार आता पिकविमा तून होणाऱ्या नुकसान भरपाई वर करडी नजर ठेवून असणार आहे यामध्ये प्रामुख्याने,

  • पेरणी किंवा लागवणीची उगवण न होणे,
  • हंगामातील प्रतिकूल परिस्थिती,
  • काढणीनंतर होणारे नुकसान,
  • स्थानिक नैसर्गिक आपत्ती

अशा घटकांवर पिकाचे क्षेत्र अचूकपणे मोजून लागवड केलेल्या पिकांचे आरोग्याची नियमित संरक्षण केले जाईल यामुळे सरकारची फसवणूक करून बोगस पिक विमा नुकसान भरपाई घेणाऱ्यांना आळा घालता येईल.

तंत्रज्ञान वापरण्याचे फायदे

  • शेतकऱ्यांना इथून पुढे बोगस किंवा कमी उत्पादन दाखवता येणार नाही
  • पीक विम्याचे रक्कम यापुढे याच आधारे निश्चित होणारया
  • वर्षीसाठी पिकविमा कंपन्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे
  • या तंत्रज्ञानाचा वापर भात सोयाबीन कापूस नुकसान निश्चितीसाठी होणार

2022 23 मधील खरीप पिक विमा 2022.

शेतकरी96 लाख 61 हजार
विमा सुरक्षित क्षेत्र57.63 लाख हेक्टर
शेतकरी हप्ता656.4 कोटी
राज्य हिस्सा अनुदान
1880.77 कोटी
केंद्र हिस्सा अनुदान 1877.72 कोटी
एकूण विमा हप्ता 4414.53 कोटी
2022 23 मधील खरीप पिक विमा 2022.


रब्बी हंगाम 2022- 23


शेतकरी
7 लाख 34 हजार
विमा सुरक्षित क्षेत्र 5.34 लाख हेक्टर
शेतकरी हप्ता 32.93 कोटी
राज्याचा अनुदान 121.80 कोटी
केंद्र हिस्सा अनुदान 121.80 कोटी
एकूण विमा हप्ता 276 कोटी
रब्बी हंगाम 2022- 23

click here for more information on official website Pradhan Mantri Fasal Bima Yojana

Leave a Comment