Micronutrient Management : रब्बी पिकांसाठी का महत्वाचे आहे सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापण? सुक्ष्म अन्नद्रव्य कशास म्हणतात, जस्त कमतरतेची लक्षणे, लोह कमतरतेची लक्षणे,जस्ताच्या कमतरतेवर करायचा उपाय योजना,लोहाच्या कमतरतेवर करावयाच्या उपायोजना.
सूक्ष्म अन्नद्रव्य कशास म्हणतात?
अत्यंत कमी प्रमाणात पिकांना अन्नद्रव्यांची गरज असते त्यास सूक्ष्म अन्नद्रव्य असे म्हणतात.
Micronutrient Management : रब्बी पिकांसाठी का महत्वाचे आहे सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापण?
Micronutrient Management: महाराष्ट्रामध्ये जास्त करून 39% जस्त आणि 23%लोह या प्रकारच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमी आढळते. जस्त 0.6 पीपीएम पेक्षा कमी आणि लोह 4.5 पीपीएम पेक्षा कमी असे माती परीक्षणानुसार आढळून आले तर त्याची कमतरता आहे असे समजावे.
जास्त क्षार चुनखडी युक्त आणि कमी सेंद्रिय कर्ब आणि त्याचप्रमाणे जास्त विम्ल प्रकारचा सामू अशा जमिनीमध्ये जास्त करून याची कमतरता दिसते. या कमतरतेची लक्षणे वेगवेगळे पिकांवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे याचा विपरीत परिणाम पिकाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर होतो.
Micronutrient Management: पिकांच्या वाढीत आणि उत्पादनात त्यांना फार महत्त्व आहे. जरी घटकांची गरज कमी प्रमाणात असली तरी पिकांच्या मूलभूत प्रक्रियेमध्ये ही अन्नद्रव्ये महत्त्वाची कार्य पार पाडतात.
उदा संप्रेरक निर्मितीचे कार्य हरितद्रव्य निर्मिती फळ व फुलधारणेस मदत वनस्पतीचे उत्प्रेरके जस्त कमतरतेची लक्षणेप्रथिने तयार करण्यास मदत इ.
अत्यंत सूक्ष्म प्रमाणात पिकांना अन्नद्रव्यांची गरज भासते. त्यांची गरज जरी कमी असली तरी पिकांच्या वाढीत व उत्पादनात त्यांना खूप महत्त्व आहे. पिकाच्या मूलभूत प्रक्रियेमध्ये हे अन्नद्रव्य महत्त्वाचे कार्य करतात.
त्यामुळे काय होते तर पिकाला जर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमी भासली तर मुख्य व दुय्यम पिकास पुरवलेल्या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे उत्पादनात घट होऊ शकते.
आता आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कमतरतेची लक्षणे या रब्बी हंगामातील पिकात कोण कोणती उपाययोजना करू शकतो. याची माहिती आज आपण घेणार आहोत.
ज्वारी व मका
जस्त कमतरतेची लक्षणे
तिखट हिरवा रोपांचा कलर दिसणे.
फिकट पिवळ्या उभ्या रंगाचे चट्टे पानांच्या खालच्या भागात दिसते.आणि काही दिवसानंतर त्याचा कलर मध्ये बदल होतो. ते फिकट तपकिरी किंवा राखाडी कलरची होतात आणि त्या पेशींचा काही भाग नष्ट देखील होतो.
लोह कमतरतेची लक्षणे
पेशी समूहाचा काही भाग शिरांच्या मधल्या भागात केवडा होऊन नष्ट होतो. पानांच्या संपूर्ण भागांवर शिरा सहजपणे दिसतात.
गहू
जास्त कमतरतेची लक्षणे
पिकांची वाढ खुंटणे जर याची कमतरता जास्त प्रमाणात असेल तर पाने पांढरा कलर चे होऊन मरणे.
वनस्पतीची उंची व पानांचा आकार कमी होणे जर खूपच जास्त कमतरता असेल.
पानांवर पांढरे तपकिरी जळाल्यासारखे डाग दिसतात.
पानांचा मधला भाग झिजल्यासारखा वाटतो.
लोह कमतरतेची लक्षणे
पिवळ्या व हिरव्या कलरच्या पट्ट्या छोट्या पानांवर दिसणे.
त्याचप्रमाणे मध्यवर्ती केवडा दिसणे .
पाते पिवळे होणे.
जुन्या पानांवर केवढा किंवा हरित रोग पसरणे.
हरभरा
जस्त कमतरतेची लक्षणे
झिंक ची जर कमतरता असेल तर रुपे खुंटतात त्यांना शाखा पण कमी असतात.
परिपक्वता कालावधीत पिकाच्या वाढ होते.
लहानपणी फिकट हिरवी व गुलाबी कलरची होऊन ती लालसर तपकिरी कलरची पडतात.
पानाच्या देठावर व कडांवर विकृती दिसते.
खूप कमतर जर असेल तर पानांचा कलर गडद कास्य रंगाचे होते आणि पेशी समूहाचा भाग देखील नष्ट होतो.
लोह कमतरतेची लक्षणे
नवीन पानांवर सर्वात पहिले लक्षणे आढळून येतात. नवीन पाने गडद पिवळी होऊन पांढरी होतात जुनी पाने गडद हिरवी राहतात.
पानांचा अर्धा भाग जळाल्यासारखे डाग नवीन पानांमध्ये पडतात.
हे डाग संपूर्ण पानांवर पसरतात त्यामुळे काय होते पाने मरतात नाहीतर गळतात.
कांदा
जस्त कमतरतेची लक्षणे
ही कमतरता सहज समजते शिरांमधील हरित रोग पाने कमजोर होऊन स्पष्ट दिसतो.
जस्ताच्या कमतरतेला कांदा अधिक संवेदनशील असतो. वेणीसारखी पानांची पाती दिसतात. पिवळसर रंगाची कोवळी पाने होऊन जुन्या पानावर शेंड्याच्या बाजूने ती मरू लागतात.
हरितद्रव्य केवडा पाने जमिनी कडच्या भागावर मृत पावतात.
लोह कमतरतेची लक्षणे
संपूर्ण नवीन पानांवर पिवळसर पणा दिसतो सगळ्यात लहान पानातील मधील भागात केवडा स्वरूपात हरित रोग तयार होतो आणि पाने मृत होतात.
लोहाचे गतिशीलता कमी झाल्यामुळे नवीन पानांवर त्याची कमी दिसते.
जस्ताच्या कमतरतेवर करायचा उपाय योजना :
मका.
पेरणी दरम्यान 10 किलो प्रति एकर झिंक सल्फेट शिफारस खतासोबत किंवा शेणखत 40 किलो आठवडाभर मुरवून देणे.
उभ्या पिकांमध्ये जर कमतरता आढळून आली तर अंतराने चिलेटेड जस्त 20 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी आठवड्याभराच्या अंतराने दोन वेळा फवारणी करून घेणे.
गहू
पेरणी दरम्यान आठ किलो प्रति एकर झिंक सल्फेट शिफारस खतासोबत किंवा शेणखतासोबत देणे.
उभ्या पिकात जर कमतरता दिसली तर 35 दिवसांनी चिलेटेड जस्त 20 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी यानुसार आठवडेभराच्या अंतराने दोन वेळा फवारणी करून घेणे.
ज्वारी व कांदा
पेरणी दरम्यान आठ किलो प्रति एकर झिंक सल्फेट शिफारस खतासोबत किंवा शेणखत स्लरी मध्ये मुरवलेले जस्त पाण्यासोबत देणे.
(आठ किलो जिंक सल्फेट+ 40 किलो ताजे शेण + 200 लिटर पाणी)
उभ्या पिकाचे कमतरता आढळून आली तर तीस दिवसांनी चिलेटेड जस्त 20 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे आठवड्याभराच्या अंतराने दोन वेळा फवारणी करून घेणे.
लोहाच्या कमतरतेवर करावयाच्या उपायोजना :
पेरणी दरम्यान दहा किलो प्रति एकर फेरस सल्फेट शिफारस खतासोबत किंवा चाळीस किलो शेणखतात आठवडाभर मुरवून देणे.
उभ्या पिकात कमी दिसून आली की लगेच तीस-पस्तीस दिवसांनी चिलेटेड लोह 15 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी त्यानुसार आठवडाभराच्या अंतराने दोन वेळा फवारणी करणे.
अशाप्रकारे जर अन्नद्रव्यांची कमतरता भासली तर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर जमिनीतून करणे पुढे उभा पिकात लक्षणे त्याच्या आढळून आले तर चिलेटेड खतांचे फवारणी दोन आठवड्याच्या अंतराने करणे.
हे ही वाचा कृषी शेत्रातील रोजगार संधी