सौर पंप 2023/प्रधानमंत्री कुसुम योजना 2023
प्रधानमंत्री कुसुम योजने साठी ऑनलाईन अर्ज असा करा
केंद्र सरकारने प्रधानमंत्री कुसुम योजना 2021 सुरू केली आहे या योजनेचे मुख्य उद्देश असा आहे की या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना सौर उर्जेवर करून त्यांना पाहिजे तेव्हा विज उपलब्ध करणे शेतकऱ्यांना अन्नधान्य पिकवताना आणि शेती करताना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी बाजार भाव साथ देत नाही आणि या सगळ्याच्या पुढे सर्वात मोठा असलेला विजेचा अडथळा या सर्व अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारा पंप अनुदाना मार्फत देण्यात येतो. आता आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री कुसुम योजना ऑनलाइन अर्ज कसा करायचा
उद्दिष्ट
या योजनेचे उद्दिष्ट 2022 पर्यंत 30800 मेगापॅटची सौर ऊर्जा क्षमता जोडण्याचे उद्दिष्ट आहे.
या योजनेत तीन घटक असतात
- घटक A: दहा हजार मेगा बॅट सौर ऊर्जा क्षमता दोन मेगाबाइट क्षमतेच्या वैयक्तिक प्लांटच्या लहान सौर ऊर्जा प्रकल्पांच्या स्थापनेद्वारे
- घटक B: वीस लाख स्टॅन्ड अलोन सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप बसवणे
- घटक C: 15 लाख ग्रिड कनेक्टेड कृषी पंपाचे शौरीकरण
शासनाने यासाठी 31/03/2026 पर्यंतची डेडलाईन ठेवली आहे
शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर उर्जेवर चालणारे सौर पंप उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल वर चालणारे पंपा ऐवजी सौर उर्जेवर चालणारे सौर पंप देणार आहेत.
आता पण जाणून घेऊयात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज कसा करायचा त्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा ही विनंती
प्रधानमंत्री कुसुम योजना 2023 योजनेची थोडक्यात माहिती
योजना | प्रधानमंत्री कुसुम योजना 2023 |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
लाभार्थी | देशातील शेतकरी |
हेतू | दिवसा वीज उपलब्ध करून देणे |
अधिकृत वेबसाईट | https://pmkusum.mnre.gov.in/landing.html |
प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो मित्रांनो इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे आपण सौर उर्जेवर चालणारा वैयक्तिक पंप किंवा सौर ऊर्जा निर्माण करायला प्लांट उभा करू शकतो आपण आपल्या जमिनीवरती मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारू शकतो किंवा भाडेतत्त्वावर जमीन देऊ शकतो
या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आणि भाडेतत्त्वावर जमीन देण्यासाठी अर्ज करता येतो ज्या अर्जदारांनी आपली जमीन भाड्याने देण्यासाठी नोंदणी केली आहे यांची यादी RREC द्वारे अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केली जाईल तसेच ज्या नागरिकांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी भाडेतत्त्वावर जमीन घ्यायची आहे तेRREC च्या वेबसाईट वरून अर्जदारांची यादी मिळू शकतात त्यानंतर ते नोंदणीकृत अर्जदारांशी संपर्क साधू शकतात आणि प्लांट उभारणीसाठी अर्ज करू शकतात
शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने खूप विचारपूर्वक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना चालू केली आहे ज्या क्षेत्रामध्ये शेती उत्तम आहे त्या ठिकाणी सौर पंप ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे परंतु भारतातील काही राज्य काही भाग असे आहेत ज्या ठिकाणी कायम दुष्काळ असतो अशा जमिनीत पीक घेणे शक्य नसते किंवा पाण्याची कमतरता असते अशा जमिनीवरती आपण सोलार प्रकल्प उभारून त्यातून निर्माण होणारी वीज आपण महावितरण कंपनीला विकू शकतो किंवा जर हा प्रकल्प उभारण्यासाठी तेवढी आर्थिक परिस्थिती नसेल तर तो शेतकरी ती शेती भाडेतत्त्वावर ती देऊ शकतो आणि त्याच्या बदल्यात तो जागेचं भाडं अर्जदाराकडून घेऊ शकतो अशा प्रकारे प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला दुहेरी लाभ मिळणार आहे त्यांना सौर पॅनल मुळे मोफत वीज मिळणार आहे तसेच या सर्व पॅनलमधून जी अतिरिक्त वीज निर्माण होईल
असा करा ऑनलाईन अर्ज
प्रधानमंत्री कुसुम योजना साठी अर्जदार ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो आता आपण पाहणार आहोत ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा सर्वप्रथम अर्जदाराला केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल या अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर मुख्य पृष्ठ आपल्यासमोर उघडेल ज्याला आपण होम पेज म्हणतो या होम पेजवर आपल्याला नोंदणीचा पर्याय दिसेल ऑनलाइन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचआहे त्यानंतर आपल्याला ऑनलाइन आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल ऑनलाइन आयडी व पासवर्ड तयार झाल्यानंतर आपल्यासमोर एक अर्ज येईल त्या अर्जामध्ये आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायचे आहे जसे की तुमचे नाव पत्ता आधार क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी ही सगळी माहिती न चुकता भरायचे आहे आणि पुन्हा एकदा खात्री करून घ्यायची आहे माहितीपूर्ण तपासून पाहिल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करायचं तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर त्याबाबतचा एसएमएस येईल
पीएम कुसुम योजना अंतर्गत कोणत्या विविध प्रकारच्या प्रणाली समर्थित आहेत ?
घटक A केंद्रित ग्राउंड/ स्टीlt माऊंटेड ग्रीड जोडलेले सौर किंवा इतर अक्षय उर्जेवर आधारित दोन मेगावॅट क्षमतेपर्यंतचे ऊर्जा प्रकल्प भरणे
घटक B 7.5 एचपी पर्यंत क्षमतेचे स्टॅन्ड अलोन सौर कृषी पंप बसविणे
घटक C 7.5 एचपी पर्यंत क्षमतेच्या विद्यमान ग्रीडशी जोडलेल्या कृषी पंपचे सावरीकरण
पी एम पासून योजनेचा घटक अ काय आहे?
या घटकांतर्गत ५०० किलो वॅट ते दोन मेगाव्हेट क्षमतेचे सौर किंवा इतर अक्षीय ऊर्जा आधारित ऊर्जा प्रकल्प प्रामुख्याने मापिक किंवा अशे ती शेतीच्या जमिनीवर स्थापित केले जाऊ शकतात या योजनेअंतर्गत शेत जमिनीची परवानगी देखील देण्यात आली आहे बशरथे की सोलर प्लांट slit फॅशनमध्ये( म्हणजे सोलर पॅनल स्थापनेसाठी वाढलेली रचना) आणि पॅनलच्या ओळींमध्ये पुरेसे अंतर ठेवून शेतीच्या क्रियाकल्पांवर परिणाम होणार नाही याची खात्री केली जाईल.
पीएम कुसुम योजनेच्या घटक अंतर्गत कोण पात्र आहे?
वैयक्तिक शेतकरी,शेतकऱ्यांचा गट, सहकारी पंचायत,शेतकरी उत्पादक संस्था, पाणी वापर करता संघटना. ज्या जमिनीवर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे ती जवळच्या वीज केंद्रापासून पाच किमीच्या अंतरावर असावी
निर्माण झालेली वीज कोण खरेदी करेल?
निर्माण झालेली अतिरिक्त वीज स्थानिक वितरण कंपन्या खरेदी करतील.
सौर पंप बसवण्यासाठी काही अनुदान आहे का?
देशातील ईशान्येकडील राज्य डोंगरी राज्य केंद्रशासित प्रदेश आणि बेट केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे प्रत्येकी 30 टक्के अनुदान दिले जाईल आणि उर्वरित 40% शेतकरी सौर पंप स्थापित करण्यासाठी गुंतवणूक करेल वर नमूद केलेल्या टक्केवारीतील सबसिडी बेंच मार्क खर्च किंवा निविदा खर्च यापैकीचे कमी असेल त्यावर लागू आहे ईशान्येकडील राज्य हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू कश्मीर लडाख आणि द्वीपसमूह केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्र सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाईल आणि किमान 30 टक्के सरळ राज्य सरकार सौर पंप बसवण्यासाठी पुरवेल शेतकऱ्याला उर्वरित 20 टक्के गुंतवणूक करावी लागेल
मला याबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल?
अधिक माहितीसाठी कृपया https://mnre.gov.in/solar/schemes/ ला भेट द्या किंवा टोल फ्री क्रमांक18001803333 वर कॉल करा
1 thought on “प्रधानमंत्री कुसुम योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज असा करा”