पशुपालन योजना महाराष्ट्र 2023| पशुपालन कर्ज योजना महाराष्ट्र 2023| पशुपालन व्यवसायासाठी 50 लाखांपर्यंत अनुदान| पशुपालन लोन | अर्ज प्रक्रिया | Poultry Farming Application Process
पशुपालन अनुदान योजना 2023 शेतकरी मित्रांनो आपण शेती करत पशुपालन नक्कीच करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना पशुपालनाची जास्तीत जास्त माहिती असते आणि हीच एक शेतकऱ्यांची खूप मोठी कला आहे याच अभ्यासाच्या जोरावर सरकारने पशुपालन अनुदान योजना देशामध्ये लागू केली आहे कारण जे शेतकरी पशुपालन करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा जे शेतकरी पशुपालनाकडे एक व्यवसाय म्हणून पाहत आहेत अशा शेतकऱ्यांना ही एक सुवर्णसंधी आहे असे म्हणायला काही हरकत नाही कारण पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज असते यासाठी सरकार देखील अशा व्यवसायिकांना आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून पशुपालन अनुदान योजना राबवली गेली आहे या योजनेअंतर्गत सरकार पशुपालनासाठी शेतकऱ्यांना 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान देत आहे तर या पशुपालन योजनेमध्ये कोणते पशु आणि पक्षी समाविष्ट केले आहेत तर ते आपण जाणून घेऊ. पशुपालन योजनेअंतर्गत कुक्कुटपालन,शेळी, गाई, म्हशी, डुक्कर इ. यासारख्या पशुपालनासाठी सरकार अनुदान देत आहे
सर्वप्रथम आपण माहिती घेतली पशुपालन अनुदान योजना काय आहे ते आता पण पाहणार आहोत या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे अर्ज कसा करायचा योजनेची योजनेसाठी पात्र कोण असेल आणि अनुदान किती मिळेल याबद्दल सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे हा लेख पूर्ण वाचावा ही विनंती
पशुपालन योजना महाराष्ट्र 2023
शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायासाठी सरकार 50 लाखांपर्यंतचे भरीव रक्कम अनुदान म्हणून देत आहे परंतु ही आर्थिक मदत वेगवेगळ्या पशुपालनासाठी वेगवेगळी रक्कम ठरवण्यात आली आहे त्याबद्दल आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसायाला शेतीचा जोडधंदा न पाहता या व्यवसायाला मुख्य व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे त्यासाठीच तर सरकार एवढी मोठी मदत अनुदान म्हणून देत आहे या योजनेअंतर्गत पशुपालन व्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना 50 टक्के अनुदान देण्यात येते तसेच उर्वरित 50 टक्के रक्कम सरकार त्यांना बँकेकडून कमी दरात कर्जही मिळवून देण्यास मदत करते
50 लाख अनुदान हे कोणत्या पशुसाठी किती असेल?
सरकार जरी 50 लाख अनुदानामार्फत देत असेल तरी त्याची वर्गवारी करण्यात आली आहे की कोणत्या पशु साठी किती अनुदान मिळेल
शेळीपालन व्यवसायासाठी 50 लाखन पर्यंत अनुदान घेऊ शकता
चारा आणि धन्य व्यवस्थापनासाठी सुद्धा 50 लाखापर्यंत आर्थिक अनुदान मिळेल
डुक्कर पालन व्यवसायासाठी 30 लाखांपर्यंत अनुदान मिळेल
कुक्कुटपालन व्यवसायासाठी 25 लाख अनुदान मिळेल
अशाप्रकारे वरील पशु प्रमाणे अनुदान देण्यात येईल परंतु तुमच्या डोक्यात एक प्रश्न आला असेल की जर मला एवढे रक्कम नको असेल तर आम्हाला कमी पासून सुरुवात करायची असेल तर त्यासाठी सरकारने वेगवेगळे वर्गवारी केली आहे तर ती कशी असेल हे आपण सविस्तरपणे पुढे वाच पाहणार आहोत
पशुपालन लोन योजना 2023 बद्दल संपूर्ण माहिती पशुपालन पशुपालन लोन डॉक्युमेंट आणि अर्ज प्रक्रिया
पशुपालन अनुदान योजना पशुपालन व्यवसायासाठी सरकारकडून मिळवा 50 लाखापर्यंत अनुदान
पशुपालन अनुदान योजना आज सोबत सादर करायचे कागदपत्र :
शेतकरी मित्रांनो पशुपालन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अर्ज करायचा आहे. कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन योजनेतील अनुदानाचे स्वरूप खालील प्रकारे आहे
याच्यामध्ये 50 लाखाचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे जसे की शेळ्यांची संख्या किती असेल त्यावरती वरती किती रुपये अनुदान मंजूर होईल याची एक रूपरेषा ठरलेली आहे.
500 शेळ्या / मेंढ्या व 50 बोकड / नर मेंढे | 50 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च गृहीत धरला जातो |
400 शेळ्या / मेंढ्या व 40 बोकड / नर मेंढे | 40 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च गृहीत धरला जातो |
300 शेळ्या / मेंढ्या व 30 बोकड / नर मेंढे | 30 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च गृहीत धरला जातो |
200 शेळ्या / मेंढ्या व 20 बोकड / नर मेंढे | 20 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च गृहीत धरला जातो |
100 शेळ्या / मेंढ्या व 10 बोकड / नर मेंढे | 10 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च गृहीत धरला जातो |
अनुदानाची 50% रक्कम राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर आणि बँक वित्तीय संस्था यांनी कर्जाचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना वितरित केल्यानंतर शासनामार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.
उर्वरित 50% अनुदानाची रक्कम प्रकल्प पूर्ण होऊन राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर लाभधारकाच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
आता या प्रकल्प उभारण्यासाठी रकमेची गरज असते. पशुपालन प्रकल्पासाठी खूप सारा खर्च सुद्धा असतो. याच्यामध्ये दोन प्रकारे आपण खर्च करून भागू शकतो
- लाभार्थी बँकेकडून कर्ज घेऊ शकतात.
- लाभार्थी स्वतः खर्चातून प्रकल्प उभा करू शकतो
लाभार्थी जर बँक कर्ज न घेता स्वतः खर्च करून प्रकल्प उभारणार असेल तर अशा प्रकल्पांच्या बाबतीमध्ये ज्या बँकेत लाभार्थ्याचे खाते असेल त्या बँकेद्वारे प्रकल्पाचे मूल्यांकन करणे आवश्यक ठरते. अर्ज मंजूर झाल्यानंतर राज्य अंमलबजावणी एजन्सीने अनुदान वितरित करण्याबाबत शिफारस केल्यानंतर आणि प्रकल्पाच्या एकूण भांडवली खर्चांपैकी लाभार लाभधारक आणि 25% खर्च स्वतः केल्यानंतरच मा शासनामार्फत अनुदानाचे 50 टक्के रक्कम लाभ धारकाच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. उर्वरित पन्नास टक्के अनुदानाची रक्कम प्रकल्प पूर्ण होऊन राज्य अंमलबजावणी प्रकल्पाची शहानिशा केल्यानंतर बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
बँकेकडून पशुपालन लोन कसे घ्यायचे
आता आपण पाहणार आहोत पशुपालन बँकेकडून लोन कसे घ्यायचे. बँकेतून लोन घ्यायचं म्हणजे तुम्हाला थोडी जास्त कसरत करावी लागेल. जी व्यक्ती बँकेच्या नियमानुसार त्यांना जे हवे ते डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स देतील तेव्हाच बँक तुमचं लोन मंजूर करेल.
पशुपालन लोन घ्यायची प्रक्रिया कशी असते
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपणाला आपल्या नजीकच्या कृषी विभागाला जाऊन कृषी विभाग उपसंचालक यांना भेटायचं आहे त्यांना भेटून आपण ज्या योजनेसाठी भेटण्यास आलो आहोत त्याबद्दल सविस्तर माहिती त्यांना द्यायची आहे तसा त्यांना अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर आपण आपले पशु कुठे ठेवणार आहोत आणि त्यांना केलेल्या सुविधांची त्यांना माहिती द्यायची आहे त्यांना ज्या ठिकाणी आपण हा प्रकल्प उभारणार आहोत त्या ठिकाणी त्यांना समक्ष दाखवायची आहे.
पशुपालन योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे
- प्रकल्प अहवाल
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- फोटो
- अनुभवाचे प्रमाणपत्र
- ऑडिट रिपोर्ट
- आयकर रिटर्न्स
- जमिनीचे कागदपत्रे
- बँकेचा रद्द केलेला धनादेश
- आपल्याकडे जीएसटी नोंदणी केलेली असेल जीएसटी क्रमांक देखील द्यायचा आहे
- ज्या जमिनी वरती आपल्याला प्रकल्प उभा करायचा आहे त्या जमिनीची सर्वप्रथम माहिती द्यायची आहे जसे की त्या जागेचा मालक कोण आहे. जमीन किती आहे
- जर ती जागा भाडेतत्त्वावरती असेल तर त्याचे भाडे करार असणे आवश्यक आहे
- प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती द्यायची आहे की खर्च किती येणार आहेत आपण किती पशू विकत घेणार आहोत आणि आणि लोन म्हणून भेटणार रक्कम आपण कसे खर्च करणार आहोत याच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला द्यायची आहे
- बँकेकडून आपल्याला किती कर्ज हव आहे
- कर्ज कोणत्या पशुपालनासाठी हवा आहे
- आणि कर्ज घेणाऱ्या व्यक्तीपाशी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
पशुपालन योजनेसाठी कृषी अधिकारी उपसंचालक यांच्याकडून मंजुरी घेणे
आपल्याला पशुपालन योजनेसाठी लोन घेण्यासाठी कृषी अधिकारी उपसंचालक यांच्याकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कृषी विभागात जाऊन आपल्याकडचे असणारे सगळे महत्त्वाचे कागदपत्रे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देऊन आपली योजना मंजूर करून घेणे आवश्यक आहे.
आपल्या योजनेचे मंजुरी पत्र घेऊन त्यांनी सांगितलेलं बँकेमध्ये पशुपालन कर्ज या योजनेसाठी अर्ज करायचा आहे
पशुपालन कर्ज योजना महाराष्ट्र 2023
बँकेकडून पशुपालन कर्ज घेण्यासाठी प्रक्रिया
पशुपालन कर्ज घेण्यासाठी सर्वात प्रथम आपणाला उपसंचालक कृषी अधिकारी यांनी सांगितलेल्या बँकेमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर बँक अधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांना आपण घेत असलेल्या योजनेबद्दल माहिती द्यायची आहे आणि त्यांना पटवून द्यायचे आहे. मंजुरी पत्र त्यांना दाखवून कर्ज मंजूर करून घ्यायचे आहे.
पशुपालन कर्ज घेण्यासाठी बँकेकडून मागितले जाणारे कागदपत्रे
- बँकेचे पासबुक
- ओळखीचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- पासपोर्ट साईज फोटो
हे सगळे कागदपत्रे बँकेत जमा करून बँकेला लागणारे सर्व कागदपत्राचे पूर्तता करायचे आहे. लोन साठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स हे बँकेवरती अवलंबून आहे त्यांना जे हवे आहेत ते आपल्याला द्यावे लागतील.बँकेच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपले कर्ज मंजूर करून घ्यायचे आहे.
पशुपालन अनुदान योजना बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करू शकता.