हिवाळ्यात जनावरांचा योग्य आहार आणि आरोग्य व्यवस्थापन

हिवाळ्यात जनावरांचा योग्य आहार आणि आरोग्य व्यवस्थापन • गोठ्यातील व्यवस्थापन • वासरांवरील परिणाम • आहार व्यवस्थापनामध्ये बदल • कास तसेच सडांचे आरोग्य राखणे • हिवाळ्यामधील आजार • प्रज्योत्पादनाची काळजी

हिवाळ्यातनावरांचा योग्य आहार आणि आरोग्य व्यवस्थापन

  • गोठ्यातील व्यवस्थापन
  • वासरांवरील परिणाम
  • आहार व्यवस्थापनामध्ये बदल
  • कास तसेच सडांचे आरोग्य राखणे
  • जनावरांचे हिवाळ्यामधील आजार
  • प्रज्योत्पादनाची काळजी

जनावरांना हिवाळ्यात जास्त खाद्य देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांच्या चयापचय क्रियेत वाढ होते. त्यांच्या शरीरात उष्णता आणि अधिक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियमित राहते.

    अति थंड वातावरणामुळे हिवाळ्यात जनावरांचे स्नायू आखडले जातात. त्यामुळे त्यांचे त्वचा करकरीत होते आणि तसेच ते लंगडतात. त्याचप्रमाणे अनेक वेळा त्यांच्या जनावरांचे पोट गच्च होते आणि बिघडून रवंत क्रिया मंदावते. दूध काढत असताना सडावर भेगा पडल्यामुळे रक्त येते. त्याचप्रमाणे अनेकदा जनावरं दूध काढू देत नाहीत. ऊर्जेची गरज थंडीच्या दिवसात जनावरांना जास्त वाढते म्हणून या काळात त्यांना चाऱ्याची गरज जास्त पडते.

चाऱ्याच्या कमतरतेमुळे जनावरे अशक्त होतात ते जनावर व्यवस्थित पान्हा सोडत नाहीत. त्यामुळे दुधाचा उत्पादनात घट होते तसेच त्याच्या दर्जावर विपरीत परिणाम होतो. चिकाची प्रत खालवली जाते पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा पाणी कमी पिल्यामुळे त्यांच्या दूध उत्पादनात घट होते.

खूप थंडीच्या काळात ताण येऊन कुपोषण झाले तर अशक्त वासरे जन्मतात. ही गुरे थंडीचा सामना करण्यासाठी थंडीच्या काळात जाड होतात. शरीरातील उष्णता या काळात जनावरे वाढवतात. तसेच पशुधनाची हृदयवती वाढते हृदय प्रवाह वाढून हात पाय गोट्यापासून बचावतात.

गोठ्यातील व्यवस्थापन

1)वेळेत गोट्याच्या छतावर गवत अंथरून घेणे, जनावरांना सूर्यप्रकाशात बांधावेत. त्यामुळे त्यांचा आजारी पडण्याचा धोका कमी होईल. जनावरांना गोठ्यात थंड हवा लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे गोठ्यामध्ये नेहमी खोडा चारा देणे.

2) गोठ्यातील वातावरण अति थंडी असल्यास उबदार करणे परंतु व्यवस्थित धूर बाहेर जाईल याची काळजी घेणे. ओलसरपणा जनावरांच्या आरोग्यासाठी वेगळा परिणाम करू शकतो. थंड जागेवर डायरेक्ट त्यांना बसू देऊ नका बोर्डिंगचे किंवा गोण पाठ याचे व्यवस्था करणे.

3) ओलाव्यापासून जनावरांना दूर बांधणे. थंडीमध्ये त्यांच्यासाठी शेकोटी करून त्यापासून निघणाऱ्या धुरापासून त्यांना वाचवणे. जनावरांना शेकोटीचा धूर आणि ओलसरपणा यामुळे निमोनिया होऊ शकतो. गोठ्यातील जमीन उतार देणे जेणेकरून मूत्र आणि सांडलेले पाणी नालीतून वाहून जाऊ शकेल. गोठा नेहमी कोरडा ठेवणे. त्यातील हवा नेहमी कोरडी असली पाहिजे त्याची सोय करून घेणे.

4) कळपा मध्ये जनावरांना जे अशक्त आहेत त्यांना व्यवस्थित पोषण भेटत नाही. अशक्त जनावरांना वेगळे करणे. जेणेकरून त्यांची ऊर्जा टिकवून ठेवण्याची क्षमता सुधारता येईल आणि पोषण चांगले देता येईल याचे नियोजन करता येईल. जनावरांचे रोगप्रतिषक्ती वाढवणे त्यासाठी खाद्यपूरक आणि खनिजांसह भरपूर चारा देणे.

वासरांवरील परिणाम

1)थंड वातावरणामध्ये  म्हणजे हिवाळा व वसंत ऋतुत त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊन, तापमान कमी होण्याची दाट शक्यता असते. जनावरांमध्ये खूप थंडीमुळे ते गारठून मरण्याची शक्यता असते. म्हणून वासरांच्या गोठ्यात जाड कोरडा पेंढा किंवा भुसा पसरावा.

2) थंड हवा गोठ्यामध्ये लागणार नाही याची आपण काळजी घ्यावी. वासराला खाण्यासाठी अतिरिक्त खाद्य देणे जेणेकरून थंड वातावरणात स्वतःला उत्तर ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेची भरपाई होईल.

3) वासरांच्या आहारात सारखा बदल न करणे. जे वासरे खाद्य खात नाही म्हणजेच तीन आठवड्यांपेक्षा छोटी आहेत अशांसाठी ब्लॅंकेट वापरणे.

आहार व्यवस्थापनामध्ये बदल

1) थंडीमध्ये जनावरांना त्यांची ऊर्जा जपून ठेवणे गरजेचे असते. तसेच चाऱ्याची प्रत हिवाळा सुरू होण्यापूर्वी तपासने त्यामुळे त्यांचा कुपोषणापासून बचाव होईल.

2) जनावरांनी हिवाळ्यात अन्नाचे सेवन जास्तीत जास्त करणे कारण त्यामुळे त्यांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होईल. प्राण्यांना जर उष्णता हवी असेल तर ऊर्जाशिवाय हे अवघड काम आहे. त्यामुळे त्यांचे तापमान कमी होऊन मृत्यू होईल.

3) थायरॉईडचे कार्य आणि चरबी चयापय थंड वातावरणात वाढू शकते

4) जनावरांना त्यांच्या खाण्यामधून पेंड आणि गूळ द्यावा. जेणेकरून त्यांचे शरीराचे तापमान आटोक्यात राहील, जनावरांचा खाण्याचा साठा व्यवस्थित असणे गरजेचे आहे.

5) जंतू नाशके जनावरांना दिली जावीत, त्यांना मोहरीचे तेल द्यावे त्याचप्रमाणे गुळासोबत त्यांना इतरही आहार द्यावा.

6) जनावरांना रोगप्रतिकारक शक्ती हवी असेल तर त्यांना 3:1 या प्रमाणात हिरवा व सुकलेला चारा देणे. त्यांना सारखे लापशी खायला देणे. कोमट पाणी देणे. सात ते आठच्या दरम्यान रात्री त्यांना चारा देणे. कारण ऊर्जा निर्मितीसाठी सहा ते आठ तास चयापचय होण्यासाठी लागतात. कारण दोन ते सहाच्या दरम्यान निर्माण होणारे ऊर्जा त्यांना वापरता येईल कारण खूप प्रमाणात त्यावेळी थंडी असते.

7) थंडीत जनावरांची चयापचय क्रिया अधिक वाढते. त्यामुळे शरीरात हवी तेवढी ऊर्जा निर्माण करून तापमान व्यवस्थित ठेवण्यात मदत होते. जनावरांना ज्यावेळेस आपण चारा चारतो. त्यावेळेस त्यांच्या चारण्याच्या जागी व्यवस्थित चारा आहे का ते पाहणे महत्त्वाचे आहे. कारण त्यांना चारा व्यवस्थित उपलब्ध नसेल तर फिरल्यामुळे अशक्त होण्याची शक्यता असते.

8) थंड वातावरणामुळे जनावरे अधिक पाणी पीत नाहीत. नऊच्या पुढे जनावर बाहेर बांधून ठेवने त्यानंतर त्यांना मीठ पीठ टाकून पाणी पाजणे. त्यामुळे पाणी पिण्याचे वाढते. हिवाळ्यामध्ये त्यांना कोमट पाणी देणेही महत्त्वाचे असते. गोट्यातलं वातावरण उबदार ठेवले तर त्यामुळे जनावरे जास्त पाणी पिऊ शकतात.

10) दुसऱ्या कीटकापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांचा गोठा साफ ठेवावा. जनावरांच्या गोठ्यात निरगुडी, तुळस, गवती चहा याच्या जुड्या लटकाव्यात त्यामुळे गोठ्यात दुसरे कीटक आकर्षित होणार नाहीत. गोट्याच्या स्वच्छतेसाठी कडुनिंबाचे तेल वापरणे.

कास तसेच सडांचे आरोग्य राखणे :

सडांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी ग्लिसरीन चा वापर करणे. त्यामुळे ते मऊ राहतील आणि भेगा पडणार नाहीत. सडांना जर भेगा पडल्यासारखे वाटले तर लगेच उपचार करणे. दूध काढण्याच्या वेळी सडांना कोमट पाण्याने धुऊन घेणे.

ड्रीप द्रावणात हिवाळ्याच्या दिवसात एनपीई वापरू नये जर एनपीई नसलेले द्रावण आपण वापरले तर सड आणि कास्याची त्वचा 3•4 पटीने मऊ होते. हिवाळ्यामध्ये जनावरांच्या सडांना त्याच्या टोकाला रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे जनावर पान्हा सोडत नाहीत.फर्स्ट बाईट टाळण्यासाठी प्रोपाइलिन ग्लायकॉल वापरणे. पहिलारू कालवडीमध्ये कासेचा एडिमा आढळतो. एडिमामुळे पाना व्यवस्थित सुटत नाही त्यामुळे कासदाह होतो.

जनावरांचे हिवाळ्यामधील आजार :

1)थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना निमोनिया अतिसार आणि लाळ्या इत्यादी आजारांचा धोका निर्माण होतो. सर्वप्रथम थंडीपासून जनावरांचे संरक्षण करणे. त्यामुळे जो आजारांचा धोका संभवतो. तो कमी होईल आणि त्यापासून त्याचे संरक्षण होईल.

2) दिलेल्या माहितीनुसार किंवा तक्त्यानुसार प्रत्येक वेळी जनावरांचे लसीकरण करणे. जनावरांना जर जास्त करून झाले नसेल तर पटकन त्यांचे लसीकरण करून घेणे खूप आवश्यक आहे.

3) जनावरांना पचन होईल असा सकस आहार देणे. त्यांची रोग प्रतिकार शक्ती टिकवून ठेवणे जेणेकरून त्यांना रोगाशी लढता येईल.

4) वातावरणामुळे जे काही बदल झाले आहेत. त्याचा ताण जनावरांमध्ये येऊ नये त्यामुळे त्यांच्या आहारात जीवनसत्व युक्त द्रावण, पावडर तसेच इलेक्ट्रॉलाईटचा समावेश करणे फार गरजेचे आहे.

प्रज्योत्पादनाची काळजी :

थंडीच्या काळामध्ये जनावरे वितात पण अशा काळामध्ये जनावरे शरीराचे तापमान व्यवस्थित राखण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेचा वापर करतात. त्यांना जर पुरेसे खाद्य मिळाले नाही तर जनावरे माजाची लक्षणे ऊर्जेच्या कमतरतेमुळे दाखवत नाहीत.

     या काळात जनावरांचा आहार जर सकस नसेल तर त्यामुळे त्यांना उठता न येणे, झार अडकणे त्याचप्रमाणे जनावरे अडली अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे थंडीच्या काळामध्ये जनावरांना व्यवस्थित पोषण पशुखाद्य देणे, त्यांच्या आहारामध्ये बायफॉस्फेट चा वापर करणे, हायब्रीड नेपियर प्रवर्गातील चारा त्याचप्रमाणे त्यांना द्विदल चाऱ्याचा पुरवठा करणे.

हे ही वाचा कृषी शेत्रातील रोजगार संधी

5 thoughts on “हिवाळ्यात जनावरांचा योग्य आहार आणि आरोग्य व्यवस्थापन”

  1. бесплатные консультации юриста для всех вопросов о законодательстве|юридическое обслуживание бесплатно на законодательные темы
    бесплатная юридическая поддержка для физических лиц и компаний по всем вопросам заказывай бесплатную консультацию юриста от знающих специалистов|Получи бесплатную консультирование от квалифицированных юристов по наболевшим проблемам
    Консультации юриста без оплаты для бывших лиц
    горячая линия юридической помощи бесплатно http://www.konsultaciya-yurista-499.ru/.

    Reply
  2. Ищете арбитражный юрист? Вы на правильном пути!|
    Профессиональная помощь арбитражного юриста в любой ситуации!|
    Не знаете, как защитить себя? Обращайтесь к нам!|
    Лучшие результаты с нами, арбитражный юрист гарантирует!|
    Ищете арбитражного юриста, который оказывает услуги максимально дешево? Мы готовы вам помочь!|
    Наш опыт и знания позволят найти выход из любой ситуации.|
    Бесплатная консультация от арбитражного юриста в компании название компании.|
    Нужна компетентная юридическая поддержка?|
    Обращайтесь к нам и будьте уверены в правильности решения.|
    Высокие результаты – гарантия успеха! – это арбитражный юрист название компании.|

    Поможем выиграть сложный судебный спор.
    арбитражный управляющий юрист токарев arbitrazhnyj-yurist-msk.ru.

    Reply

Leave a Comment