(PMKY) Pm Kisan Yojana 2023 | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना2023 | अर्ज प्रक्रिया,पात्रता,संपूर्ण माहिती मराठी|

Pm Kisan Yojana 2023| पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2023| पी एम किसान सन्मान निधी चेक 2023 | किसान सन्मान निधी योजना लिस्ट | पी एम किसान सन्माननिधी योजना अप्लाई.

Pm Kisan Yojana 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत पी एम किसान योजना त्याच्या आधी आपण जाणून घेऊया भारतातील शेती आणि शेती करण्यासाठी येणाऱ्या अडचणी. आपणा सर्वांना माहीतच आहे भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे भारतातील शेतीला खूप महत्त्व आहे परंतु वारंवार येणाऱ्या नैसर्गिक किंवा प्राकृतिक अडचणींमुळे शेती ही संकट सापडते. शेती करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हवामान जमीन आणि जमिनीची रचना आहे कारण एखाद्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत कोणते पीक येऊ शकते हे पूर्णपणे यावरील घटकांवरती अवलंबून असते जर शेतीला आवश्यक असणारे पाणी पाऊस जमीन आणि जमिनीतील सुपीकता याच्यावर शेतीचे परिणाम चांगले दिसून येतात. शेती हा एक व्यवसाय आहे या दृष्टिकोनातून शेतकरी कधीही शेतीकडे पाहत नाही त्यामुळे तो जीवापाड प्रेम करून शेती जोपासत असतो परंतु येणाऱ्या नैसर्गिक अडचणीमुळे शेतीत नुकसान भरपूर होते. त्यामुळे केंद्र सरकार नेहमीच राज्यातील नागरिकांच्या दृष्टीने व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने विविध कार्यक्रम तसेच योजना राबवते. याच दृष्टिकोनातून केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना राबवली आहे. याच्यामार्फत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये चार टप्प्यांमध्ये आर्थिक सहायता म्हणून दिले जातात

आपण या लेखातून पीएम किसान योजना काय आहे. योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा. पी एम किसान निधीचा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा झाला की नाही हे कसं बघायचं. याची संपूर्ण माहिती घेणार आहोत

पी एम किसान योजना / पंतप्रधान किसान सन्मान निधी

Pm Kisan Yojana 2023 / पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही १ डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. देशातील शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच या योजनेसाठी देशातील सगळ्यात शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांना समाविष्ट केले असले तरी काही व्यक्तींना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे.


या योजनेतून वगळण्यात आलेल्या व्यक्ती कोण आहेत.

  1. घटनात्मक पदावरील व्यक्ती उदाहरणार्थ राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश इत्यादी
  2. आजी-माजी लोकप्रतिनिधी उदाहरणार्थ आमदार खासदार महापौर
  3. सरकारी कर्मचारी
  4. कर दाते,डॉक्टर, इंजिनियर्स, वकील, सनदी लेखापाल
  5. वरील सर्व व्यक्तींना या योजनेतून वगळण्यात आले आहे

 पी एम किसान सन्मान निधी माहिती सारणी

योजनेचे नावपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २३
योजना कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
लाभार्थीदेशातील अल्पभूधारक शेतकरी
हेतूशेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता करणे
अधिकृत वेबसाईटhttps://pmkisan.gov.in/
योजनेचा प्रकारकेंद्र सरकारची योजना
आर्थिक लाभRs 6000
 पी एम किसान सन्मान निधीमाहिती.

पी एम किसान योजनेसाठी नाव नोंदणी कशी?

Pm Kisan Yojana 2023 शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत अर्ज करण्याच्या पद्धती. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत

  1. तलाठी कार्यालय
  2. CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर
  3. PM KISAN PORTAL
PM KISAN YOJANA | पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी कराल?


शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत ऑनलाईन नोंदणी कशी करायची.

Pm Kisan Yojana 2023 PM KISAN वर गुगलवर सर्च करावा लागेल. त्यानंतर गव्हर्नमेंट ची अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर येईल त्याच वेबसाईटला ओपन करायचे आहे. त्याच्यामध्ये उजवीकडे तुम्हाला फार्मर कॉर्नर हा ऑप्शन दिसेल त्याच्यातील पहिलाच पर्याय आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचा आहे.

त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला आधार क्रमांक आणि captcha टाकायचा आहे. आणि कंटिन्यू पर्यायावर्तिक क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमच्यासमोर record not found with given details असा मेसेज येईल. याचा अर्थ तुमचा आधार क्रमांकाची यासाठी यापूर्वी नोंदणी झालेली नाही. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेसाठी नाव नोंदणी करायचे आहे. जेव्हा तुम्ही नाव नोंदणीसाठी पेज वरती एस या पर्यावरणातील क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल.

यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची आहे. यात सुरुवातीला तुमचे राज्य निवडायचे आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे पुढे Sub District and block या दोन्ही ठिकाणी तुम्हाला तुमच्या तालुक्याचे नाव निवडायचा आहे आणि मग गावाचं नाव सिलेक्ट करायचा आहे. आता जेव्हा वैयक्तिक माहिती भरायची आहे त्यावेळेस आपणाला शेतकऱ्याचे नाव लिहायचं आहे शेतकऱ्यांनी नाव लिहिताना आधार कार्ड वरती जसे नाव आहे जशास तसे नाव लिहायचं आहे. जर स्पेलिंग मिस्टेक झाली तर तर तुमचा फॉर्म पूर्ण होऊ शकत नाही. यानंतर तुम्हाला लिंग निवडायचे आहे.

मग तुम्ही कोणत्या प्रयोगात मोडता. फार्मर टाईप विचारायला त्या ठिकाणी तुमच्या शेतकरी चा प्रकार निवडा तयार जसे की तुम्ही एक ते दोन हेक्टर च्या दरम्यान येता की त्यापेक्षा जास्त येतात ते तुमच्याकडे शेती जास्त असेल तर othes मध्ये टाकायचा आपण आधार कार्ड दिलेला असतो त्यामुळ identify proof number नंबर आपोआप जनरेट होतो.

पुढील ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे ज्याच्यामुळे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती बरोबर भरायची आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चूक नकोय. याच्यामध्ये तुम्हाला बँकेचा आयएफएससी कोड बँकेचे नाव आणि बँक खाते क्रमांक टाकायचा आहे. आणि त्यानंतर पत्ता टाकायचा आहे.

याच्यापुढे तुम्हाला submit for other authentication या पर्यायावर ती क्लिक करायचा आहे. या पर्यावरण क्लिक केलं की yes Aadhar Authenticated successfully असा मेसेज येईल याचा अर्थ तुमचा आधार वेरिफिकेशन यशस्वी रित्या झाला आहे.

यानंतर फार्मर डिटेल्स भरायचे आहेत जसे की मोबाईल नंबर जन्मतारीख आई किंवा वडिलांचे नाव लिहायचं असतं. त्यानंतर land holding मध्ये जमिनीचा मालकीचा प्रकार सांगायचा असतो. जर शेती एकट्याने करत असेल तर सिंगल या पर्यायावर क्लिक करायचे आहे जर सामूहिक किंवा ग्रुप शेतीचे करत असेल तर जॉईंट या पायावरती क्लिक करायचा आहे.

पुढे Add या पर्यावरणात क्लिक करून शेत जमिनीची माहिती द्यायचे आहे जसे सर्वे किंवा खाता नंबर, सातबारा, ८ अ चा जो खाते क्रमांक आहे तो टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे किती शेत जमीन आहे ते हेक्टर मध्ये लिहायचा आहे सातबारावर जितकी जमीन दिसते तोच आकडे टाकायचा. ही सगळी माहिती भरून झाली की add बटन दाबलं की तुमच्या माहितीची नोंद केली जाते.

जर एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीत वेगवेगळ्या गट क्रमांक आणि खाते क्रमांक मध्ये विभागले असली तर त्याने काय करायचं घाबरून जाऊ नका त्यासाठी तुम्हाला पुढील माहिती भरावी लागणार आहे. आता पुन्हा तुम्ही ऍड या बटनावरती क्लिक करून ती माहिती देखील भरू शकता. विचारलेली सगळी माहिती भरून झाल्यानंतर certify that all the given details are correct या कॉलम मध्ये टिक करायचा आहे.सरते शेवटी तुम्ही सेल्फ डिकवेशन फॉर्म वर क्लिक करून तुम्ही माहिती वाचू शकता. तुम्ही भरलेला फॉर्म एकदा व्यवस्थित बघून सगळ्यात शेवटी Save या पर्यावरण क्लिक करायचा आहे

त्यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल त्यावर लिहिलेला असेल **** हा तुमचा identity proof number आहे आणि तुम्ही यशस्वीरीत्या नोंदणी केली आहे. अर्ज भरून झाला की काही दिवसानी तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती बघू शकता.

हे हि वाचा(MMKY)महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना 2023 (Maharashtra mukhyamantri Kisan Yojana 2023).

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हप्ता जमा झाला की नाही हे कसे पाहायचे?

Pm Kisan Yojana 2023 हप्ता तुमच्या खात्या जमा झाला की नाही हे पाहण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे एसएमएस आणि दुसरा म्हणजे वेबसाईटवर चेक करणे.
तुमच्या खात्यात पी एम किसान चा हप्ता जमा झाला की नाही हे एसएमएस द्वारे कळविण्यात येत किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः चेक करू शकता.
वेबसाईटवर चेक करण्यासाठी तुम्हाला पी एम किसान या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे फार्मर कॉर्नर हा पर्याय निवडून तेथील बेनिफिशियल स्टेटस या पर्यायावर ती तुम्हाला क्लिक करावे लागेल. तुमचा आधार नंबर बँकेचे खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर गेट डाटा या पर्यायावर क्लिक करून हप्ते विषयीचे सविस्तर माहिती मिळेल. दिलेल्या माहितीमध्ये शेतकऱ्यांचे नाव गाव आधार क्रमांक खाते क्रमांक किती तारखेला नोंदणी केली ही वैयक्तिक माहिती पाहायला मिळते किती हफ्ते शेतकऱ्याला मिळाले. त्याविषयी माहिती देखील हप्त्यानुसार दिलीअर्ज भरून झाला की काही दिवसानी तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती बघू शकता. असते.
खाली दिलेल्या लिंक चा वापर करून देखील तुम्ही लिस्ट पाहू शकता
https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

पी एम किसान 2023 14 वा हप्ता :

Pm Kisan Yojana 2023 मित्रांनो सरकार तर्फे आयोजित पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता लवकरच मिळणार आहे. सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबवल्या जातात, त्यापैकीच ही एक योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणारी दिसत आहे.

Pm Kisan Yojana 2023 या योजनेमार्फत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत 13 हप्ते देण्यात आलेले आहेत आणि 14 हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे या योजनेची खासियत म्हणजे पंतप्रधान किसान सन्माननिधी मार्फत मिळणारी आर्थिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते कारण केंद्रीय कृषिमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार याच्यामध्ये मध्ये स्थान ची भूमिका नाही. दर वेळेप्रमाणे यावेळेसही शेतकरी चौदाव्या हप्त्याची वाट आतुरतेने पाहत आहे आणि या वेळेस सरकारही लवकरच या योजनेचा 14 वा हप्ता जारी करेल अशी आशा आहे, कारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मे महिन्यात निसर्गाने शेतकऱ्यांचे हाल करून सोडले आहेत.

अवकाळी पावसामुळे आणि त्यासोबत पडणाऱ्या गारांमुळे शेतीतील पिकांचे खूप नुकसान झालेले आहे असे जरी असले तरी शासनाकडून अजून तरी अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा किंवा शेतीतील उपयोगी वस्तू किंवा खते बियाणे विकत घेता यावीत आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे याच उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे.

पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या यादीत आपले नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.as

Leave a Comment