जनावरांच्या आहारातील महत्त्वाचे घटक, Important ingredients in animal feed, healthy animal feed
जनावरांच्या आहारातील महत्त्वाचे घटक
जनावरांच्या पोटामध्ये ऍसिटिक ऍसिड ची निर्मिती कमी प्रमाणात होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या पोटात तंतुमय पदार्थांचे पचन न होणे किंवा आहार योग्य प्रमाणात न मिळणे दुधातील फॅट वर आपल्याला याचा परिणाम दिसू शकतो त्यांच्या खाद्यातील प्रथिनांची संख्या कमी झाल्यास आणि तंतुमय घटकांची पचन क्षमता कमी झाल्यास फॅट कमी होते
जनावरांच्या आहारातील महत्त्वाचे घटक खालील प्रमाणे आहे.
- हिरवा आहार
- कोरडा चारा
- चाऱ्याचा योग्य आकारमान
- पचण्यासाठी सोपी कर्बोदके
- होलाटाइल फॅटी ऍसिड
- प्रथिने आणि एस एन एफ
- ऊर्जेची पूर्तता
- फॅट चा समावेश
- उष्णतेचा ताण.
आता आपण पाहू सविस्तरपणे त्यांची माहिती
हिरवा आहार
हिरव्या चाऱ्याच्या अतिवापरामुळे फॅटचे प्रमाण कमी होऊ शकते कारण त्यामुळे त्यांचे पोट बिघडण्याची शक्यता असते आहारामध्ये त्यांच्या हिरवा चारा व कोरडा चारा या दोघांचाही समावेश करावा कोरडा चारा आपल्याकडे नसल्यास हिरवा चारा वाळवून आपण त्यांना देऊ शकतो
चाऱ्याचा योग्य आकारमान
चारा योग्य प्रमाणात कुट्टी झालेला नसल्यास त्यांच्या पचनक्रियेवर परिणाम होऊन फॅट कमी होऊ शकते
पचण्यासाठी सोपी कर्बोदके
करबोदकांची पाचकता आणि पचनता चांगल्या गतीने होते अशा प्रकारच्या घटकांचा समावेश आहारात केल्यामुळे चाऱ्याची पाचकता कमी होते त्यामुळे ऍसिटिक आम्लाची निर्मिती कमी होऊन दुधातील फॅट मध्ये घट होत
होलाटाइल फॅटी ऍसिड
संमिश्र अन्नघटकांचे रूपांतर किण्वन प्रक्रियेमुळे साध्या घटकांमध्ये होते त्यातूनच होलाटाइल फॅटी ऍसिड ची निर्मिती होते मुळे जनावरांमध्ये ऊर्जा आणि फॅट वाढण्यास मदत होते काही कारणामुळे आम्लाचे निर्मिती कमी झाली तर त्याचा परिणाम दुधातील घटकांवर दिसतो
प्रथिने आणि एस एन एफ
आहारातील प्रथिने कमी होण्यासाठी एस एन एफ हा महत्त्वाचा घटक आहे
दुधातील फॅट हे खाद्य घटकांचा आकार बारीक असेल तर कमी होऊ शकते त्यामुळे जनावरांना खुराक आणि हिरवा चारा योग्यरीत्या योग्य प्रमाणात देणे आवश्यक आहे
ऊर्जेची पूर्तता
खाद्यातून ऊर्जेचे पूर्तता न झाल्यास दुधामध्ये फॅटचे प्रमाण कमी होते
फॅट चा समावेश
कर्बोदकांपेक्षा 2.25 पटीने जास्त ऊर्जा ही फॅट मध्ये असते फॅट हा एक खूप महत्त्वपूर्ण घटक ठरतो जेव्हा उन्हाळ्यात खाद्यपदार्थांचे सेवन घटते जास्त उर्जेमुळे आहारातील ऊर्जेची घनता वाढते दूध उत्पादनावर याचा परिणाम आपल्याला दिसतो
आहारामध्ये जास्त फॅट समावेश करणे शक्यतो टाळावे याचा परिणाम जनावरांच्या पचनसंस्थेवर होऊ शकतो यावर दुसरा उपाय म्हणून आपण बायपास फॅट वापरू शकतो
उष्णतेचा ताण
उष्ण हवामानामुळे पदार्थांचे सेवन कमी होते आणि फॅट देखील कमी होते
उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी गोटा आणि आहाराचे व्यवस्थापन योग्यरीत्या करावे
खाद्य घटकात अचानक बदल झाल्यामुळे फॅट आणि एसएनएफ यांच्यावर त्याचा प्रभाव पडू शकतो