जमिनीची सुपीकता, उत्पादकता म्हणजे काय?

जमिनीची सुपीकता, उत्पादकता म्हणजे काय? जमिनीची सुपीकता म्हणजे काय? जमिनीची उत्पादकता म्हणजे काय? जमिनीची सुपीकता कशावरून अवलंबून असते? सुपीकता वाढवण्यासाठी लागणारे महत्त्वाचे घटक. जमिनीचे गुणधर्म. भौतिक गुणधर्म. जैविक गुणधर्म. रासायनिक गुणधर्म.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत. जमिनीची सुपीकता म्हणजे काय? जमिनीची उत्पादकता म्हणजे काय? जमिनीची सुपीकता कशावरून अवलंबून असते? सुपीकता वाढवण्यासाठी लागणारे महत्त्वाचे घटक. जमिनीचे गुणधर्म. भौतिक गुणधर्म,जैविक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म याविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचावा ही विनंती.

पूर्वीच्या पारंपरिक शेती आणि आत्ताच्या आधुनिक शेतीतील फरक आणि नुकसान.

शेतकरी मित्रांनो आपण ऐकून आहोत, की पूर्वीची शेती हे फक्त सेंद्रिय खतावर ती असायची त्यामुळे त्याच्यातून उत्पादनही भरपूर मिळत असे. शेतीतून सोन पिकवल जाते असे,अशी जुन्या लोकांची मन आहे. फक्त शेतकरीच हा जमिनीला तिचे माता मानतो. कारण त्याला माहित आहे जर आपण शेतीमध्ये जमिनीमध्ये व्यवस्थित सुपीकता ठेवली तर आपल्याला जमिनीतून भरपूर उत्पन्न मिळेल. परंतु आजकालची परिस्थिती वेगळीच आली आहे. लोक शेती करायला टाळतात कारण जमिनीतून हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही.

तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का? जमिनीतून उत्पादन आता कमी का मिळत आहे. कधी तुम्ही जमिनीला समजून घेतला आहे का? जमिनीला काय हवे आहे काय नकोय. आपण याचा विचार कधीच केला नाही. आपल्याला पाहिजे कमी मेहनती मध्ये जास्त उत्पन्न परंतु. याच अट्टाहासपाई आपण शेतीची जमिनीची सुपीकता कमी करून बसलो आहोत. त्यामुळे उत्पादनावरती त्याचा फटका बसला आहे.जोपर्यंत आपण सेंद्रिय खते वापरणार नाही, तोपर्यंत जमिनी जमिनीची सुपीकता वाढणार नाही. त्यामुळे उत्पादनही वाढणार नाही. कारण जवळजवळ सर्वच शेतकरी हे आता रासायनिक खतांवरती अवलंबून आहेत.

कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना रोजगार संधी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रासायनिक खतामुळे जमिनीवरती खूप वाईट परिणाम होऊ लागले आहेत. ज्याच्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आहे.रासायनिक खते ही सेंद्रिय खतांना कधीच पर्याय होऊ शकत नाहीत. रासायनिक खतामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणू नष्ट होतात. जमिनीतील सूक्ष्म जीवाणू हे शेतीसाठी आणि जमिनीच्या सुपीकतेसाठी खूप महत्त्वाचे घटक आहेत. जे आता खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत त्याचं कारण आहे रासायनिक खते. आपल्याला रासायनिक खते कमी करून सेंद्रिय खते वाढवावे लागतील.

जमिनीची सुपीकता, सेंद्रिय खते आणि सूक्ष्मजीवाणू.

शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित आहे. उन्हाळ्यानंतरचा पडणारा पहिला पाऊस आणि त्या पावसामुळे येणाऱ्या मातीचा सुगंध आपण सर्वांनी अनुभवलेला आहेच. परंतु हे कधी आपल्या लक्षात आलं नाही की हा वास येतो कशामुळे.या वासाचं महत्त्व काय आहे. आता हल्ली पाऊस पडून गेल्यानंतर सुगंधित वासही कमी झाला आहे. पाऊस पडल्यामुळे येणारा मातीचा सुगंध हा उन्हाळ्यात तृप्ता अवस्थेत असलेल्या ऍक्टिनोमायसीट्स या सूक्ष्म जीवाणू मुळे येते.या सूक्ष्मजीवांना पावसाची ओल मिळाल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांच्या कुजविण्याचे क्रिया सुरू करतात. त्यातून जिओसमीन 2 मिथिल आयसोबोर्निओल(Geosmin 2 methyl isoborneol) हा सुगंधित वायू उत्सर्जित होतो.  जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे सूक्ष्म जीवाणू असतात. हे सूक्ष्मजीवाणू जमिनीमध्ये वेगवेगळे काम करतात ज्यांनी आपल्याला फायदा होतो. त्यातील महत्त्वाचे काम म्हणजे वनस्पतींना किंवा पिकांना मातीतील अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणे.

या सूक्ष्मजीवांना जगण्यासाठी मुख्य अन्न म्हणजे सेंद्रिय पदार्थ आणि त्याचीच कमतरता त्यांना भासते. कारण आपण रासायनिक खत वापरतो रासायनिक खते वापरत असल्यामुळे अनेक जमिनी या जीवानूवरहीत म्हणजेच मृतप्राय अवस्थे कडे जात आहेत. परंतु आपण अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी रासायनिक खते,पाणी यांचा अनियोजित पद्धतीने वापर करतो. सेंद्रिय खतांची वापर न करता केवळ रासायनिक खतांचा वापर आपण करत आहोत. सेंद्रिय खतांमध्ये अन्नद्रव्य ही अल्प प्रमाणात असतात तसेच कर्ब मोठे प्रमाणात असते.

जमिनीतून उत्पादनाचा दर्जा वाढविण्यासाठी अनेक महत्त्वाचे एंजाइम्स संप्रेरके आणि जीवनसत्वे महत्त्वाचे असतात. हे सगळे आपल्याला सेंद्रिय खतातून मिळत असल्यामुळे पीक उत्पादनाचा दर्जा वाढतो. तसेच वनस्पतीची किंवा पिकांची गोडी, रंग, आणि रोग आणि कीड प्रतिकारक शक्ती ही सेंद्रिय खते वापरल्यामुळे वाढते. तसेच याचे खूप सारे फायदे आपल्या जमिनीला होतात. सेंद्रिय खतामुळे जमिनीला होणारे फायदे खूप आहेत. सेंद्रिय खतांमुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.

जमिनीची सुपीकता ही खालील घटकांवर अवलंबून असते.

  1.  भौतिक गुणधर्म
  2. जैविक गुणधर्म
  3. रासायनिक गुणधर्म

आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

जमिनीची सुपीकता म्हणजे काय?

जमिनीची सुपीकता म्हणजे पिकांना किंवा वनस्पतींना आवश्यक असणारे अन्नद्रव्य पुरविण्याची क्षमता म्हणजे जमिनीचे सुपीकता.

जमिनीची उत्पादकता म्हणजे काय?

जमिनीचे उत्पादकता म्हणजे जमिनीतून एका वेळेस मिळालेले सरासरी उत्पन्न होय.

शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे. जमिनीची सुपीकतेवरती जमिनीचे उत्पन्न अवलंबून असते. सुपीकता आणि उत्पादकता या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी  गंमत म्हणजे जास्त उत्पादन देणारी जमीन ही सुपीकच असते परंतु सुपीक जमीन मात्र जास्त उत्पन्न देईलच असे नाही. त्याच्यामागे खूप कारणे आहेत जसे की सुपीक जमीन असली तरी जास्त उत्पन्न घेण्यासाठी जमिनीचे पायाभूत गुणधर्म पाणी, रोग आणि कीड तसेच तन अशा अन्य व्यवस्थापनाकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, नाहीतर असे होईल आपण जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा किंवा खतांचा पुरवठा केला म्हणजे आपला अपेक्षित उत्पन्न मिळेल असे नाही.

जमिनीच्या सुपीकतेचे प्रकार

जमिनीचे सुपीकता वाढविण्यासाठी आपल्या जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा लागेल त्यानेच जमिनीची सुपीकता वाढायला मदत होत.

जमिनीच्या सुपीकितेचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात.

  1. रासायनिक सुपीकता
  2. भौतिक सुपीकता
  3. जैविक सुपीकता

रासायनिक सुपीकता

रासायनिक सुपीकता ही जमिनीचा सामू (PH), मातीमध्ये उपलब्ध असणाऱ्या क्षारांचे प्रमाण व पिकांसाठी किंवा वनस्पतींसाठी लागणारे अन्नद्रव्ये यांची उपलब्धता यावर अवलंबून असते.

भौतिक सुपीकता

जमिनीची भौतिक सुपीकता ही जमिनीची जलधारण शक्ती, घनता, सच्छिद्रता, पाण्याचे वहन आणि निचरा तसेच घडण इत्यादी घटकांवरती अवलंबून असते.

जैविक सुपीकता

जैविक सुपीकता ही जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे संख्या किती आहे यावरती अवलंबून आहे.

जमिनीत असणाऱ्या सूक्ष्मजीवांमुळेच वनस्पतींना आणि पिकांना अन्नद्रव्य मिळत असते कारण सूक्ष्मजीवांचे महत्वाचे कामच वनस्पतींना किंवा पिकांना मातीतील अन्नद्रव्य उपलब्ध करून देणे आहे.

शेतकरी मित्रांनो पिकांचे उत्पादन आणि दर्जा वाढवण्यासाठी वर वाचल्याप्रमाणे तिन्ही घटकांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जमिनीत असणारा सेंद्रिय कर्ब हा सुपीकितीचा निर्देशांक मानला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा भर जास्तीत जास्त जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवण्यावर असला पाहिजे. रासायनिक सुपिकतेसाठी काही प्रमाणामध्ये आपण रासायनिक खते देऊ शकतो परंतु जैविक आणि भौतिक सुपीकतेसाठी आपल्याला फक्त सेंद्रिय खतांचा वापर करावा लागेल.

सेंद्रिय खतांचा वापर करूनही अनेक वेळा सेंद्रिय कर्ब वाढल्याचे दिसून येत नाही याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील वाढते तापमान असल्याने शेतात वापरलेल्या सेंद्रिय खतांचे / पदार्थांचे विघटन खूप जलद गतीने होते. सेंद्रिय खतांचे विघटन हे मुख्यतः तापमान, जमिनीत ओलावा, प्राणवायू व जीवनाचे संख्या यावर अवलंबून असते. या सगळ्या घटकांकडे जर आपण बारकाईने लक्ष दिले नाही तर मात्र सेंद्रिय कर्ब वाढण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. जमिनीमध्ये जर सेंद्रिय खतांचा किंवा पदार्थांचा  वापर जास्त असेल तर जमिनीतील  सेंद्रिय कर्बांची पातळी वाढण्यासाठी व जिवाणूची वाढ होण्यासाठी फायद्याचे ठरते. आपण वापरत असलेले सेंद्रिय खत कशा पद्धतीने वापरले पाहिजेत याचे विषय आपण थोडी माहिती जाणून घेऊ. जेणेकरून आपल्या खातांमधील कार्बनचे प्रमाण जास्तीत जास्त राहील व नत्राचा ऱ्हास कमी होईल.

जमिनीतील  सेंद्रिय कर्बांची पातळी वाढण्यासाठी व जिवाणूची वाढ होण्यासाठी फायद्याचे उपाय.

  • सेंद्रिय खते शेतात टाकल्यानंतर ती बराच काळ उघड्यावर राहिल्यास त्यातील नत्राचा ऱ्हास होतो. आपल्याला पीक घेण्याच्या अगोदर काही दिवस सेंद्रिय खते शेतात टाकायचे असतात.
  • सेंद्रिय खते तयार करत असताना खड्डा मातीने झाकणे गरजेचे असते तो खड्डा मातीने न झाकल्यासही नत्रांचा ऱ्हास होतो.
  • सेंद्रिय खतांचे जैविक आणि रासायनिक दृष्ट्या विघटन जलद गतीने होते त्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते. तसेच संख्याही कमी राहते त्यामुळेच सेंद्रिय खते वापरूनही आपल्याला चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळत नाही.

मित्रांनो आपण पाहिल्या वरती पाहिल्याप्रमाणे सूक्ष्म जीवाणू मातीमध्ये असणे किती महत्त्वाचे आहे. हेच सूक्ष्म जिवाणू पिकांना अन्नद्रव्य पुरवण्याचे काम करत असतात त्यांचे मुख्य काम म्हणजे सेंद्रिय घटकांचे विघटन करून त्यांचे रासायनिक स्वरूपात रूपांतर करणे. जसे की उदाहरणार्थ आपण जेव्हा शेतामध्ये युरिया वापरतो त्या युरियाचे रूपांतर जोपर्यंत नायट्रेट (NO3) मध्ये होत नाही, तोपर्यंत त्यातील पोषणद्रव्य पिकांना/ वनस्पतींना मिळत नाहीत. नायट्रोबॅक्टर आणि नायट्रोसोमोनास हे जिवाणू युरिया चे नायट्रेट मध्ये रूपांतर करण्यास मदत करतात. अशा पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणू असणे खूप गरजेचे आणि महत्त्वाचे आहे, जे की रासायनिक खतातील अन्नद्रव्ये पिकांना पुरवण्यासाठी मदत करतात.

जमिनीच्या सुपीकतेसाठी मातीचे गुणधर्म कोणते असावेत

जमिनीच्या सुपीकतेसाठी खालील प्रमाणे मातीची गुणधर्म असावेत.

  1. भौतिक गुणधर्म 
  2. जैविक गुणधर्म 
  3. रासायनिक गुणधर्म

या गुणधर्मांबद्दल आपण आता सविस्तर माहिती घेऊ.

भौतिक गुणधर्म

  • जमिनीची घनता 1.1 ते 1.4 ग्रॅम/घन सेमी दरम्यान असावी . त्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि हवा खेळती राहते.
  • जमिनीची जलधारण शक्ती चांगली असावी परंतु काळ्याजमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होणारी असावी.
  • मातीची संरचना किंवा घडण मऊ असावी त्यामुळे मातीची धूप कमी होते.

जैविक गुणधर्म

जमिनीतील सेंद्रिय कर्ब हे सूक्ष्मजीव आणि जिवाणूंसाठी खूप महत्त्वाचे असतात सेंद्रिय कर्बांच्या सूक्ष्मजीवांच्या वाढीस आणि संख्येत वाढ होण्यास मदत होते. सूक्ष्म जीवाणू आणि जिवाणूमुळे अन्नद्रव्यांचे उपलब्धतेत वाढ होते. त्यामुळे सेंद्रिय खतांमुळे पिकांना अन्नद्रव्य मिळण्यास व उत्पादन वाढण्यास मदत होते.

रासायनिक गुणधर्म

आपण रासायनिक गुणधर्मांमध्ये पाहणार आहोत की जमिनीच्या सुपीकितेसाठी जमिनीतील कोणते घटक किती प्रमाणात असले पाहिजेत.

घटकप्रमाण
जमिनीचा सामू6.5 ते 7.5 असावा.
विद्युत वाहकता (क्षारता)0.10 ते 0.50 डेसीसायमन प्रति मीटर पर्यंत असावी.
मुक्त चुनखडीचे प्रमाण5 ते 10 % पर्यंत (मध्यम) असावे.
सेंद्रिय कर्बाचे प्रमाण0.6% पेक्षा जास्त असावे
जमिनीमध्ये नत्र280 किलो/ हेक्टर पेक्षा जास्त असावे
स्फुरद15 किलो / हेक्टर पेक्षा जास्त असावे
रासायनिक 150 किलो / हेक्टर पेक्षा जास्त असावे
अन्नद्रव्यांमध्ये उपलब्ध लोह4.5 मिलिग्रॅम / किलो पेक्षा जास्त असावे
अन्नद्रव्यांमध्ये उपलब्ध जास्त0.6 मिलीग्राम / किलो पेक्षा जास्त असावे
अन्नद्रव्य मध्ये उपलब्ध बोरॉन0.5 मिलिग्रॅम / किलो पेक्षा जास्त असावे
सुपीकितेसाठी जमिनीतील कोणते रासायनिक घटक किती प्रमाणात असले पाहिजेत.

शेतकरी मित्रांनो या लेखांमधून तुम्हाला जमिनी सुपीकता आणि उत्पादकता म्हणजे काय तसेच त्याच्यासाठी महत्त्वाचे असणारे घटक व त्यांच्याविषयी महत्वाची माहिती मिळाली असेल अशी आशा करतो, धन्यवाद.

Leave a Comment